Rabi Crop Insurance: रब्बीतील साडेअकरा हजार हेक्टर पिकांना विमा संरक्षण

रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा, करडई आदी पिकांना विमा योजना लागू आहे. पीकविमा प्रस्ताव सादर करण्याच्या विहित मुदतीत जिल्ह्यातील सर्व पाच तालुक्यांतील शेतकऱ्यांनी जनसुविधा केंद्र, बँकांमार्फत विमा प्रस्ताव सादर केले आहेत.
Crop Insurance
Crop InsuranceAgrowon

हिंगोली ः पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत (Crop Insurance Scheme) यंदाच्या (२०२२-२३) रब्बी हंगामात (Rabi Season) जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी १८ हजार ५१७ विमा प्रस्ताव सादर केले आहेत.

शेतकऱ्यांनी ६७ लाख ३३ हजार २३४ रुपये विमा हप्ता भरून ११हजार ६७३ हेक्टरवरील पिकांसाठी ४४ कोटी ८८ लाख ८३ हजार ४७५ रुपयाचे विमा संरक्षण घेतले आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या (Agriculture Department) सूत्रांनी दिली.

Crop Insurance
Crop Insurance : आंबा, काजूचा ३२ हजार शेतकऱ्यांनी उतरविला विमा

रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा, करडई आदी पिकांना विमा योजना लागू आहे. पीकविमा प्रस्ताव सादर करण्याच्या विहित मुदतीत जिल्ह्यातील सर्व पाच तालुक्यांतील शेतकऱ्यांनी जनसुविधा केंद्र, बँकांमार्फत विमा प्रस्ताव सादर केले आहेत.

Crop Insurance
Crop Insurance : विमा कंपनीने दिलेला शब्द पाळला नाही

शेतकरी हिश्‍शाचा ६७ लाख ३३ लाख २३४ रुपये, राज्य आणि केंद्र सरकारच्या हिश्याचा प्रत्येकी २०४ कोटी ६० लाख २८३ रुपये मिळून एकूण ४७६ कोटी ५३ लाख ८०१ रुपये एवढा विमा हप्ता आहे. विमा कंपनीने पीकनिहाय विमा संरक्षित क्षेत्राची माहिती उपलब्ध करुण दिली नाही, असे सूत्रांनी सांगितले.

रब्बीचे पीकविमा प्रस्ताव स्थिती

तालुका विमा प्रस्ताव विमा हप्ता(लाखात विमा संरक्षित क्षेत्र (हेक्टरमध्ये)

  • हिंगोली ९९४ ३.४० ५५५

  • कळमनुरी ५६२० २५.१९ ४४५१

  • वसमत २७१९ ९.२८ १६१९

  • औंढा नागनाथ ५६६८ १८.५९ ३२००

  • सेनगाव ३४१६ १०८५ १८४६

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com