Crop Insurance : वाशीतील सात हजार तक्रारी विमा कंपनीकडून रद्द

या वर्षी पेरणीनंतर प्रामुख्याने सोयाबीन पिकावर गोगलगायीने हल्ला चढवला तर नंतर येलो मोझॅक, पापडी, करपा, सततचा पाऊस यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे न भरून निघणारे नुकसान झाले.
Crop Dmaage
Crop DmaageAgrowon
Published on
Updated on

वाशी ः पिकांचे नुकसान झाल्यानंतर (Crop Damage) हक्काचा पीकविमा (Crop Insurance) मिळवण्यासाठी पिकाच्या नुकसानीची क्रॉप इन्शुरन्स मोबाईल ॲपच्या (Crop Insurance App) माध्यमातून ऑनलाइन पूर्वसूचना (Crop Damage Intimation) (तक्रार) विमा कंपनीला देणाऱ्या तब्बल सात हजार तीनशे चार शेतकरी खातेदारांच्या तक्रारी संबंधित विमा कंपनीकडून (Crop Insurance) विविध कारणामुळे रिजेक्ट करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मात्र याबाबत कंपनीने शेतकऱ्यांना कसलीच माहिती दिलेली नसल्याने नुकसान झालेल्या पिकांच्या पंचनाम्यासाठी कर्मचारी कधी येणार याकडे हे शेतकरी डोळे लावून बसलेले आहेत.

Crop Dmaage
Crop Insurance News : विमा कंपनी कर्मचाऱ्यांकडून शेतकऱ्यांकडे पैशाची मागणी

तालुक्यातील एकूण २३ हजार २१३ शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत आपल्या विविध पिकांचा पीकविमा भरून पिके संरक्षित केलेली आहेत. या वर्षी पेरणीनंतर प्रामुख्याने सोयाबीन पिकावर गोगलगायीने हल्ला चढवला तर नंतर येलो मोझॅक, पापडी, करपा, सततचा पाऊस यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे न भरून निघणारे नुकसान झाले.

Crop Dmaage
Crop Insurance : पीकविमा योजनेअंतर्गत १३ लाखांवर नुकसानीची पूर्वसूचना

झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले असून वर्षभराचा कुटुंबाच्या उदर निर्वाहाचा खर्च कसा भागवायचा हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. ज्या शेतकऱ्यांनी पीकविमा भरून पिके संरक्षित केली आहेत. नुकसानीची ऑनलाइन तक्रार केली आहे आशा शेतकऱ्यांना पीकविमा मिळून काही प्रमाणात आर्थिक मदत मिळेल अशी अपेक्षा आहे.

मात्र ज्या शेतकऱ्यांनी नुकसानीची ऑनलाइन तक्रार विमा कंपनीकडे नोंदविल्यानंतर विविध कारणामुळे कंपनीने तक्रारी रिजेक्ट केलेल्या आहेत. तक्रार रिजेक्ट केल्यानंतर शेतकऱ्यांना कसलीही माहिती देण्यात आलेली नाही.

यामुळे शेतकऱ्यांना पिकांचे नुकसान होऊनही पीकविमा मिळण्यास अडचण येणार असल्याने विविध कारणाने रिजेक्ट केलेल्या शेतकऱ्यांच्या सर्व तक्रारी ग्राह्य धरून नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून पीकविम्याची लाभ देण्याची गरज आहे. तालुक्यात महसूल मंडळनिहाय तक्रार दाखल केलेल्या शेतकऱ्यांची संख्या तर कंसात रिजेक्ट झालेल्या तक्रारी संख्या.वाशी ७६४३ (१९८९), पारगाव ८०८५ (२२६९),तेरखेडा ७४८५ (३०४६).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com