Nursery Subsidy : रोपवाटिका अनुदानात वाढ

राज्यात रोपवाटिका उभारणीसाठी शेतकऱ्यांना आता पावणे तीन लाख रुपयांपर्यंत अनुदान देण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. यामुळे रोपवाटिका उद्योगाला बळकटी मिळणार आहे.
Nursery Subsidy
Nursery SubsidyAgrowon

पुणे ः राज्यात रोपवाटिका (Agriculture Nursery) उभारणीसाठी शेतकऱ्यांना आता पावणे तीन लाख रुपयांपर्यंत अनुदान (Nursery Subsidy) देण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. यामुळे रोपवाटिका उद्योगाला (Nursery Business) बळकटी मिळणार आहे.

राज्याच्या कृषी व्यवस्थेला बळकटी देण्यात रोपवाटिका क्षेत्राचा वाटा मोठा आहे. या व्यवसायाला परिश्रमातून समृध्द करणाऱ्या रोपवाटिकाचालकांना अलीकडे ‘अॅग्रोवन एक्सलन्स अवॉर्ड' देऊन सन्मानित करण्यात आले होते. या सोहळ्याच्या निमित्ताने ‘अॅग्रोवन’च्या व्यासपीठावर रोपवाटिका अनुदानवाढीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. त्यामुळे मापदंडात सुधारणा करण्याच्या प्रक्रियेला वेग मिळाला.

Nursery Subsidy
Nursery : खात्रीशीर रोपांसाठी गावडे पाटील नर्सरी

राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना यावर्षीही राबविली जाणार होती. मात्र, अनुदान भरीव नसल्यामुळे योजनेला प्रतिसाद मिळत नव्हता. “२०२१-२२ व २०२२-२३ या दोन वर्षांमध्ये एक हजार नव्या रोपवाटिका उभारण्यास शासनाने मंजुरी दिली आहे.

त्यासाठी २३ कोटी २३ लाख रुपये अनुदान वाटले जाणार आहे. मात्र, आता प्रत्येक रोपवाटिकेला दोन लाख ७८ हजार रुपयांपर्यंत अनुदान देण्यास मान्यता देण्यात आली आहे,” अशी माहिती सूत्रांनी दिली.

Nursery Subsidy
Nursery: भाजीपाला पिकांची रोपवाटिका कशी कराल ?

रोपवाटिकांचे प्रस्ताव यापूर्वी मंजूर झाले असल्यास जुन्या निकषांप्रमाणे अनुदान मिळेल. मात्र, २२ ऑगस्ट २०२२ पासून पूर्वसंमती दिलेल्या रोपवाटिकांना नव्या मापदंडानुसार जादा अनुदान द्यावे, अशा सूचना महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळाचे प्रकल्प व्यवस्थापक उदय देशमुख यांनी राज्यातील सर्व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत.

योजना ‘महाडीबीटी’ प्रणालीवर

फलोत्पादन संचालक डॉ. कैलास मोते यांनी अलीकडेच योजनेचा आढावा घेतला. रोपवाटिका उभारणी योजनेच्या अनुदान वाटपाला गती देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याला लक्षांक व निधीची तरतूद कळविण्यात आली आहे. ही योजना ‘महाडीबीटी’ प्रणालीवर पारदर्शक पद्धतीने राबविली जाणार आहे.

...असे मिळणार अनुदान

घटक...क्षेत्र किंवा संख्या...मापदंड...प्रकल्प खर्च...अनुदान रक्कम

- फ्लॅट टाइप शेडनेटगृह (३.२५ मीटर उंच, सांगडा उभारणी)...१००० चौ.मी...४७५ रुपये प्रति चौ.मी....४,७५,००० लाख रुपये...२,३७,५०० रुपये

- प्लॅस्टिक टनेल...१००० चौ.मी...६० रुपये प्रति चौ.मी...६०,००० रुपये...३०,००० रुपये

- पॉवर नॅपसॅक स्प्रेअर...१...७,६०० रुपये...७,६०० रुपये...७,८०० रुपये

- प्लास्टिक क्रेटस्६...२...२०० रुपये...१२,४०० रुपये...६,२०० रुपये.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com