पाणलोट क्षेत्र विकासासाठी सर्वांनी पुढे यावे ः पोपटराव पवार

समन्यायी पाणी वाटपाचे पुरस्कर्ते, पाणी पंचायतीचे प्रवर्तक कै. विलासराव साळुंखे यांच्या २० व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पवार बोलत होते.
Watershed MAnagement
Watershed MAnagementAgrowon

पुणे ः सिंचन धोरणाच्या उसावरील (Sugarcane) प्रेमामुळे पाण्यापासून वंचित राहिलेल्या महाराष्ट्रातील बहुसंख्य कोरडवाहू शेतकऱ्यांच्या (Dry land Farmer) समस्यांना तोंड फोडले. शाश्वत पाणलोट क्षेत्र विकास (Watershed Development) कार्यक्रम राबवून मृद् व जल संधारणाच्या माध्यमातून भूजल पातळीत वाढ केली आहे. एकेकाळच्या दुष्काळग्रस्त पण आता जलसंपन्न हिवरेबाजार उभारू शकतो. पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम राबवण्यासाठी पुढारी, प्रशासन, खासगी उद्योग क्षेत्र आणि स्वयंसेवी संस्थांनी एकत्रित विचार आणि कृती करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन पद्मश्री पोपटराव पवार (Popatrao Pawar) यांनी केले.

समन्यायी पाणी वाटपाचे पुरस्कर्ते, पाणी पंचायतीचे प्रवर्तक कै. विलासराव साळुंखे यांच्या २० व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पवार बोलत होते.

यावेळी जलसंवाद मासिकाच्या वतीने काढण्यात आलेल्या विलासराव साळुंखे स्मृती विशेषांकाचे प्रकाशन पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. प्रदीप पुरंदरे, साखर आयुक्त शेखर गायकवाड, विशेषांकाचे संपादक डॉ. दत्ता देशकर, फोरम ऑफ इंटलेक्च्युअल्स सतीश देशमुख, पर्यावरणीय अर्थतज्ज्ञ प्रा. विजय परांजपे, शेतीतज्ज्ञ पांडुरंग शितोळे, ज्ञान प्रबोधिनीचे सुभाष देशपांडे, शरद मांडे, संतोष गोंधळेकर, भवतालचे संपादक अभिजित घोरपडे, प्रसाद रसाळ, लेखिका श्रीमती वीणा गवाणकर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पुरंदरे म्हणाले,‘‘ राज्यात सिंचनविषयक ९ कायदे अस्तित्वात असले तरी त्यापैकी आठांसाठी नियमच अद्याप बनवण्यात आलेले नाहीत. धरणांच्या पाण्याचा वापर अतिशय अकार्यक्षमतेनी होतो आहे, कालवा व्यवस्थापन खूप मागास आहे. तर उसासारख्या जास्त पाणी पिणाऱ्या पिकाकडे सिंचन व्यवस्था झुकलेली आहे. केवळ पुरवठा व्यवस्थापनाला प्राधान्य देणाऱ्या सिंचन प्रणाली हद्दपार करण्याची गरज आहे.‘‘

साखर आयुक्त गायकवाड म्हणाले,‘‘महाराष्ट्राने यावर्षी ऊस गाळपात उत्तर प्रदेशला मागे टाकत देशातच आघाडी घेतली आहे असे नाही तर चीन, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान या देशांपेक्षा जास्त साखर उत्पादन घेतले आहे. केवळ जलसंधारणाच्या कामातून पाण्याची समस्या दूर होईल का? असा प्रश्‍न पस्थित केला.

दरम्यान कै. भास्करराव म्हस्के यांच्या स्मरणार्थ त्यांच्या कुटुंबियांच्या वतीने पाणी क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेस देण्यात येणारा पुरस्कार ग्राम गौरव प्रतिष्ठान (पाणी पंचायत) ला देण्यात आला. हा पुरस्कार संस्थेच्या वतीने कल्पनाताई साळुंखे, कार्यकारी विश्वस्त डॉ. सोनाली शिंदे व संस्थेच्या कार्यकर्त्यांनी स्वीकारला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सोनाली शिंदे यांनी केले. तर समारोप सतीश देशमुख यांनी केला. सूत्रसंचालन प्रसाद सेवेकरी यांनी केले. सामुदायिक पसायदान गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com