Electricity : शेतकऱ्यांना दिवसा १२ तास वीज देण्याचा प्रयत्न ः फडणवीस

शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. त्यांच्या जीवनात परिवर्तन घडविण्यासाठी प्रयत्नशील आहे.
Electricity
ElectricityAgrowon
Published on
Updated on

सोलापूर : ‘‘शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. त्यांच्या जीवनात परिवर्तन घडविण्यासाठी प्रयत्नशील आहे. येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना विजेची कोणतीही अडचण भासणार नाही. यासाठी विजेचे सर्व फीडर सौरऊर्जेवर आणणार आहे. यातून चार हजार मेगावॉट विजेचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यातून शेतकऱ्यांना १२ तास वीज देण्याचा प्रयत्न करणार आहे,’’ अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी शुक्रवारी (ता. ४) दिली.

बार्शी येथे विविध विकासकामांच्या ऑनलाइन लोकार्पण आणि भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार सुभाष देशमुख, विजयकुमार देशमुख, राजेंद्र राऊत, सचिन कल्याणशेट्टी, राम सातपुते, राणा जगजितसिंह पाटील, सुरेश धस, माजी आमदार प्रशांत परिचारक, रणवीर राऊत, मुख्याधिकारी चव्हाण आदी उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, ‘‘सोलर फीडरसाठी शेतकऱ्यांची जमीन हेक्टरी ७५ हजार रुपये भाड्याने घेणार आहे. यातून शेतकऱ्यांना शाश्‍वत भाडे मिळेल. याबरोबरच ३० वर्षांनी जमीन परत दिली जाईल. यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडेल. गेल्या तीन महिन्यांत सात हजार कोटींची मदत अतिवृष्टिग्रस्त शेतकऱ्यांना केली आहे. एनडीआरएफ निकषाच्या दुप्पट पैसे आणि दोन हेक्टरऐवजी तीन हेक्टरपर्यंत मदत देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.’’

Electricity
e-crop survey : ई-पीकपाहणी अॅपद्वारे पीक पेऱ्याची नोंद असलेला सातबारा ग्राह्य धरावा

‘‘पूर्वी ६५ मिलि पावसाच्या अटीमध्ये बदल करून सातत्याने सात-आठ दिवस पाऊस पडून शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्यास मदत देण्याच्या निर्णयामुळे अनेक शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. यापोटी बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना ८० कोटींची मदत देण्यात आली आहे,’’ असेही फडणवीस म्हणाले.

‘बार्शी उपसा’साठी ७०० कोटी रुपये

बार्शी उपसा सिंचन योजनेसाठी ७०० कोटींची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. येत्या तीन वर्षांत ही योजना पूर्णत्वाला येईल. यामुळे १२ हजार २५० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येईल. जानेवारीपासूनच या कामाला सुरुवात होईल. त्यामुळे बार्शी तालुक्याचा चेहरामोहरा बदलणार असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com