Jaljeevan Mission : ‘जलजीवन मिशन’मध्ये गैरव्यवहार झाल्याची तक्रार

Nagar Zilha Parishad : नगर जिल्हा परिषदेत ‘जलजीवन मिशन’च्या निविदा प्रक्रियेत काही राजकीय लोकांच्या सांगण्यावरून अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गैरप्रकार केल्याने यात कोट्यवधींचा गैरव्यवहार झाला आहे.
Jaljeevan Mission
Jaljeevan MissionAgrowon

Nagar Zilha Parishad News : नगर जिल्हा परिषदेत ‘जलजीवन मिशन’च्या निविदा प्रक्रियेत काही राजकीय लोकांच्या सांगण्यावरून अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गैरप्रकार केल्याने यात कोट्यवधींचा गैरव्यवहार झाला आहे. त्यामुळे याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

प्रत्येक कुटुंबाला पाणी मिळावे, यासाठी जलजीवन योजना राबवली जात आहे. मात्र जिल्ह्यात या योजनेत गैरव्यवहार होत असल्याचे दिसून येत आहे. ‘जलजीवन मिशन’ अंतर्गत सुमारे ८५० कोटी रुपयांच्या निविदा प्रक्रियेत झालेल्या गैरव्यवहाराबाबत सर्वांत आधी बापूसाहेब यशवंत पवार या व्यक्तीने तक्रार केली होती.

त्यानंतर दोन महिन्यांपासून ते अचानक गायब असल्याचे जाधव यांनी म्हटले आहे. या कामांच्या निविदा प्रक्रियेत गेल्या वर्षभरात पाणीपुरवठा विभागाचे अनेक अधिकारी बदलले.

Jaljeevan Mission
Jalyukt Shivar : नगर जिल्ह्यातील राहात्यात ‘जलयुक्त’मध्ये २१ गावांची निवड

सोयीचे अधिकारी, कर्मचारी घेण्यात आले. या निविदा ‘मॅनेज’ करण्यासाठी एका पक्षाच्या आमदाराच्या पीए असलेल्या ठेकेदाराने फिल्डिंग लावली. प्रशासनाच्या विरोधात कागदपत्रे व पुराव्यानिशी तक्रार होऊन शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, विभागीय आयुक्त कार्यालयाने चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश देऊनही जिल्हा परिषद प्रशासनाने कोणतीही चौकशी केली नाही.

यातील अनेक निविदांमध्ये ‘बोगस वर्क डन’ जोडले आहेत. ज्या ठेकेदारांना ‘वर्क ऑर्डर’ देण्यात आल्या, त्यात फक्त ३० टक्केच ठेकेदारांना कामाचा अनुभव आहे.

बीड कॅपॅसिटी वाढवून दाखविणे किंवा ती संपलेली असूनही विभागाने त्यांना पात्र करणे, ठराविक ठेकेदार एका टेंडरला पात्र व दुसऱ्याला अपात्र असणे, वर्क इन हँडचे पत्र देऊन पात्र ठेकेदारांना अपात्र करणे, टेंडर नोटीसमधील अटी बदलणे असे प्रकार झाले आहेत.

जिल्हा परिषदेत सध्या पदाधिकारी नसल्याने अधिकाऱ्यांवर कोणाचाही वचक राहिलेला नाही. त्यामुळे हे प्रकार वाढत आहेत. त्यामुळे प्रत्येक टेंडरच्या गैरव्यवहारांची शासनस्तरावर चौकशी करावी, अशी मागणी जाधव यांनी केली.

‘बिले अदा करू नयेत’

जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही, तोपर्यंत ‘जलजीवन मिशन’अंतर्गत कोणत्याही कामाची बिले ठेकेदारांना अदा करू नयेत, असे गिरीश जाधव यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com