Jalyukt Shivar : नगर जिल्ह्यातील राहात्यात ‘जलयुक्त’मध्ये २१ गावांची निवड

Jalyukt Shivar News : राहाता तालुक्यातील २१ गावांची निवड करण्यात आली. त्यासाठी या गावांत ८ एप्रिल ते ११ मे या कालावधीत शिवार फेऱ्यांचे आयोजन करण्यात आले. विविध सरकारी विभागांच्या समन्वयाने ही योजना राबविण्यात येईल.
Jalyukt Shiwar
Jalyukt ShiwarAgrowon
Published on
Updated on

Jalyukt Shivar Abhiyan : राहाता तालुक्यातील २१ गावांची निवड करण्यात आली. त्यासाठी या गावांत ८ एप्रिल ते ११ मे या कालावधीत शिवार फेऱ्यांचे (Shivar Feri) आयोजन करण्यात आले. विविध सरकारी विभागांच्या समन्वयाने ही योजना राबविण्यात येईल.

पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना राबविण्यात येईल. जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियान नव्याने राबवले जात आहे. या योजनेत राहाता

तालुक्यातील पाथरे बुद्रुक, तिसगाव, लोणी बुद्रुक, रांजणगाव खुर्द, सावळीविहीर बुद्रुक, हनुमंतगाव, लोहगाव, हसनापूर, सावळीविहीर खुर्द, ममदापूर, भगवतीपूर, दुर्गापूर, नांदुर्खी खुर्द, नांदुर्खी बुद्रुक, साकुरी, दाढ बुद्रुक, रांजणखोल, नांदूर बुद्रुक, अस्तगाव, डोऱ्हाळे व शिंगवे या गावांची जलयुक्त शिवार योजना २.० साठी निवड करण्यात आली.

Jalyukt Shiwar
Jalyukt Shiwar Abhiyan : वाशीम जिल्ह्यातील १६६ गावांची ‘जलयुक्त’ अभियानात निवड

कृषी विभागाची विविध कामे, शेततळे, गॅबियन बंधारे, ड्रीप स्प्रिंक्लर सिंचन, खोलीकरण करणे, पाणीसाठा वाढविणे, पाझर तलावांतील गाळ काढणे, सिमेंटचे नवीन बांध बांधणे, जुन्या नाल्यांचे पुनरुज्जीवन करून त्यांना ऊर्जितावस्था प्राप्त करून देणे, या कामांची या शिवार फेऱ्यांच्या माध्यमातून चर्चा करण्यात आली.

शिर्डी उपविभागीय अधिकारी माणिक आहेर, उपविभागीय जलसंधारण अधिकारी प्रतिभा खेमनर, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, तहसीलदार अमोल मोरे, पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता देविदास धापटकर आदी या शिवार फेऱ्यांत सहभागी झाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com