Government Scheme : एका अर्जावर १४ योजनांचा लाभ

पाण्याचा अपव्यय होऊ नये, शेतकऱ्यांना शेतीसाठी शासनाकडून आर्थिक मदत व्हावी, फळबागांचे क्षेत्र वाढावे, ठिबक, तुषार सिंचन वाढावे, शेततळ्यांच्या माध्यमातून सिंचनाखालील क्षेत्रात वाढ व्हावी, शेतकऱ्यांना सबसिडीतून ट्रॅक्टर, अवजारे मिळावीत, आदी योजना केंद्र व राज्य सरकारकडून राबविल्या जात आहेत.
Government Scheme
Government SchemeAgrowon

सोलापूर : केंद्र व राज्य सरकारच्या (Central, State Government Scheme) एकूण १४ योजनांचा लाभ शेतकऱ्यांना (Farmer Scheme) आता एकाच अर्जांवर मिळणार आहे.

‘डीबीटी’मध्ये (MHDBT Scheme) कृषी योजनांचा समावेश झाल्याने शेतकऱ्यांना प्रत्येक योजनांसाठी स्वतंत्र अर्ज करण्याची गरज पडत नाही. भरलेल्या अर्जात शेतकरी पुन्हा बदल करून इतर योजनांचाही लाभ घेऊ शकतात.

पाण्याचा अपव्यय होऊ नये, शेतकऱ्यांना शेतीसाठी शासनाकडून आर्थिक मदत व्हावी, फळबागांचे क्षेत्र वाढावे, ठिबक, तुषार सिंचन वाढावे, शेततळ्यांच्या माध्यमातून सिंचनाखालील क्षेत्रात वाढ व्हावी, शेतकऱ्यांना सबसिडीतून ट्रॅक्टर, अवजारे मिळावीत, आदी योजना केंद्र व राज्य सरकारकडून राबविल्या जात आहेत.

अर्जांची संख्या आणि शासनाकडून प्राप्त झालेले अनुदान, यावरून दरवर्षी वेगवेगळ्या टप्प्यांवर लॉटरी काढून लाभार्थी निवडले जातात. अर्जदार शेतकऱ्याला योजनांचा लाभ मिळेपर्यंत त्या अर्जाची वैधता राहते, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी दिली.

‘या’ आहेत कृषी विभागाच्या योजना

१) राष्ट्रीय एकात्मिक फलोत्पादन (मल्चिंग, कोल्ड स्टोरेज, सामुहिक शेततळे, प्राथमिक प्रक्रिया केंद्र, शेडनेट, रेपरव्हॅन)

२) मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना (शेततळे, ठिबक, तुषार)

३) बिरसामुंडा कृषी क्रांती योजना (अनुसूचित जमाती शेतकऱ्यांसाठी विहिरी, पाईपलाईन, विहीर दुरुस्ती, आवजारे)

Government Scheme
Water Scheme : पाणी योजनेचा २५०० हेक्टरला फायदा

४) राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान (बियाणे, पॉवर टेलर, मळणी यंत्र, रोटावेटर, पंप, पाईप वगैरे)

५) डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वालंबन योजना (अनुसूचित जाती शेतकऱ्यांसाठी विहिरी, पाईपलाईन, विहीर दुरुस्ती, आवजारे)

६) भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना (दोन हेक्टरपर्यंत फळबाग लागवडीसाठी १०० टक्के अनुदान)

७) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर भाजीपाला रोपवाटिका योजना (५० टक्के अनुदान, नर्सरीसाठी शेडनेट, पॉलिटनेल, प्लास्टिक करेट)

८) राष्ट्रीय कृषी विकास योजना (शेततळे अस्तीकरण, शेडनेट, पॉलीहाऊस, कांदा चाळ)

९) राज्य कृषी योजना (ट्रॅक्टर, आवजारे) , कृषी यांत्रिकी उपअभियान (ट्रॅक्टर, आवजारे)

१०) राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना (ट्रॅक्टर एक लाख व सव्वालाख अनुदान व आवजारे ४० टक्क्यांपर्यंत अनुदान)

‘डीबीटी’मुळे शेतकऱ्यांना एका अर्जावर १४ योजनांचा लाभ मिळू शकतो. प्रत्येक योजनेसाठी स्वतंत्र अर्ज करण्याची गरज नाही. लॉटरी पद्धतीने लाभार्थी निवडले जातात. शेतकऱ्यांना कोणकोणत्या योजनांचा लाभ घ्यायचा आहे, त्याची निवड त्यांनी अर्ज भरताना करावी..
बाळासाहेब शिंदे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com