E-Shram Card Yojana : असंघटीत क्षेत्रातील मजुरांसाठी ई-श्रम कार्ड योजना ; असा करा ऑनलाईन अर्ज

Latest Government Scheme देशात मोठ्या प्रमाणावर लोक असंघटीत क्षेत्रामध्ये काम करतात. अशा असंघटीत क्षेत्रात गुंतलेल्या मजुरांना एकत्र जोडण्यासाठी ई-श्रम पोर्टल सुरू करण्यात आले आहे.
E-Shram Card Yojana : असंघटीत क्षेत्रातील मजुरांसाठी ई-श्रम कार्ड योजना ; असा करा ऑनलाईन अर्ज
Published on
Updated on

E-Shram Card Yojana : देशात मोठ्या प्रमाणावर लोक असंघटीत क्षेत्रामध्ये काम करतात. अशा असंघटीत क्षेत्रात गुंतलेल्या मजुरांना एकत्र जोडण्यासाठी ई-श्रम पोर्टल सुरू करण्यात आले आहे. या योजनेंतर्गत मजुरांना सरकारकडून आर्थिक मदत केली जाते. सरकारकडून थेट मजुरांच्या खात्यावर आर्थिक मदत पाठविली जाते. तसेच या योजनेचा लाभ घेणाऱ्या मजुरांना विम्याचा लाभही दिला जातो.

योजनेचे फायदे

असंघटीत क्षेत्रात काम करणाऱ्या मजुर आणि कामगारांसाठी ई-श्रम कार्ड ही योजना राबविली जाते. या योजनेत नोंदणी केलेल्या मुजराचा मृत्यू झाल्यास अथवा संपूर्ण अपंगत्व आल्यास सरकारकडून दोन लाख रुपयांची मदत केली जाते.

E-Shram Card Yojana : असंघटीत क्षेत्रातील मजुरांसाठी ई-श्रम कार्ड योजना ; असा करा ऑनलाईन अर्ज
Galyukta Shiwar Scheme : गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार मोहिमेस भोगाव येथे सुरवात

तसेच अपघातामध्य मजुराला अंशत: अपंगत्व आल्यास या योजनेंतर्गत एक लाख रुपयांची आर्थिक मदत केली जाते.

आयकर भरणारे कामगार या योजनेचा लाभ घेवू शकत नाहीत. जर तुम्ही संघटीत क्षेत्रामध्ये काम करत असाल, तरीही या योजनेचा तुम्हाला लाभ घेता येणार नाही. EPFO आणि ESIC चे सभासदही ई-श्रम कार्ड बनवू शकत नाही.

E-Shram Card Yojana : असंघटीत क्षेत्रातील मजुरांसाठी ई-श्रम कार्ड योजना ; असा करा ऑनलाईन अर्ज
Horticulture Scheme : फळबाग लागवड योजना ; अनुदानासह शेकऱ्यांना देणार मोफत रोपे

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड

  • आधार लिंक असलेला मोबाईल क्रमांक

  • बँक खात्याचा तपशील

  • शैक्षणिक कागदपत्रे

  • व्यवसाय कौशल्य प्रमाणपत्र

अर्जा कसा व कोठे करायचा

  • www.eshram.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करता येईल.

  • येथे दिलेला Register On E Shram हा पर्याय निवडा

  • आपला मोबाईल क्रमांक टाका. यानंतर मोबाईलवर आलेला OTP टाका.

  • OTP पडताळणीनंतर तुमची संपूर्ण वैयक्तिक माहिती भरा.

  • शैक्षणीत पात्र, वार्षिक उत्पन्न, व्यावसायिक कौशल्ये या बद्दलची माहिती भरा.

  • तसेच तुमच्या बँकेच्या खात्याची माहिती टाका.

  • यानंतर सर्व तपशील काळजीपूर्वक तपासा आणि सबमीट या बटणावर क्लिक करा.

  • अशा प्रकारे तुम्ही घरी बसल्या तुमचे ई-श्रम कार्ड ऑनलाईन बनवू शकता.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com