Crop Insurance : पीकविमा योजनेत शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन

पंतप्रधान पीक विमा योजनेसाठी (खरीप हंगाम २०२२) जिल्ह्यातील १० पिकांसाठी ४ लाख ३० हजार ३२३ हेक्टर शेतीक्षेत्र विमा संरक्ष‍ित करण्यात आले आहे.
Crop Insurance
Crop InsuranceAgrowon
Published on
Updated on

नगर ः अतिवृष्टी, दुष्काळ, नैसर्गिक आपत्तीमुळे (Natural Calamity) नुकसानीची भरपाई मिळावी यासाठी पंतप्रधान पीकविमा (Crop Insurance Scheme) राबवण्यात येत आहे. योजनेत सहभागी होण्यासाठी ३१ जुलैची अंतिम मुदत असून या योजनेत शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाने (Department Of Agriculture) केले आहे.

पंतप्रधान पीक विमा योजनेसाठी (खरीप हंगाम २०२२) जिल्ह्यातील १० पिकांसाठी ४ लाख ३० हजार ३२३ हेक्टर शेतीक्षेत्र विमा संरक्ष‍ित करण्यात आले आहे. नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पूर, क्षेत्र जलमय होणे, भूस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, कीड व रोग आदीने नुकसान झाल्यास एका वर्षाकरिता सर्व अधिसूचित पिकांसाठी ७० टक्के असा जोखीमस्तर निश्‍चित करण्यात आला आहे. विमा कंपनीने सादर केलेला विमा हप्ता दरही एक वर्ष कालावधीसाठी राहणार आहे.

Crop Insurance
Crop Insurance : पीकविमा योजनेसाठी महसूल विभागाचा पुढाकार

नगर जिल्ह्यात भातासाठी (तांदूळ) आठ मंडलांतील ५१ हजार ७६० हेक्टर क्षेत्रविमा संरक्षित आहे. १०३५.२० रुपये हप्ता रक्कम भरावी लागेल. बाजरीसाठी ९७ मंडलांत ३३ हजार ९१३ हेक्टर क्षेत्रविमा संरक्षित असून, ६७८.२६ रुपये हप्ता आहे. भुईमुगासाठी ८६ मंडळांत ३८ हजार हेक्टर क्षेत्र संरक्षित असून, ७६० हप्ता आहे. सोयाबीनसाठी ६३ मंडलांत ५७ हजार २६७ हेक्टर क्षेत्रविमा संरक्षित असून, ११४५.३४ रुपये हप्ता आहे. मुगासाठी ५९ मंडळांतील २० हेक्टर हजार क्षेत्रविमा संरक्षित असून, ४०० रुपये हप्ता आहे. तुरीसाठी ७९ मंडलांत ३३ हजार ८०२ संरक्षित असून, ७३६.०४ रुपये हप्ता आहे.

उडदासाठी १५ मंडलांतील २० हजार हेक्टर संरक्षित असून, ४०० हेक्टरी हप्ता आहे. कापसासाठी ६६ मंडलांतील ५९ हजार ९८३ हेक्टर क्षेत्र संरक्षित असून, २९९९.१५ रुपये हेक्टरी हप्ता आहे. मक्यासाठी ७ तालुक्यांतील ३५ हजार ५९८ क्षेत्र विमा संरक्षित असून, प्रतिहेक्टर ७११.९६ रुपये हप्ता आहे. कांद्यासाठी ११ तालुक्यांतील ८० हजार हेक्टर क्षेत्र संरक्षित असून, प्रतिहेक्टर ४००० रुपये हप्ता रक्कम भरावी लागेल. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने योजनेत सहभागी असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com