

Satara News : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत पर्यावरणपूरक जीवन पद्धती अभियानांतर्गत हवामान बदल व त्यावर मात करण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत तंत्रज्ञान मोहिमेंतर्गत मंगळापूर येथे खरीप पीक हंगाम नियोजन व सोयाबीन व इतर पीक तसेच कृषी विभागाच्या विविध योजनांविषयी कार्यशाळा पार पडली.
या कार्यक्रमामध्ये बदलत्या हवामानानुसार शेती करणे व त्यावर मात करण्यासाठी पर्यावरणपूरक जीवन पद्धतीचे महत्त्वपूर्ण तंत्रज्ञान तसेच सेंद्रिय शेती काळाची गरज व माती परीक्षणानुसार संतुलित सेंद्रिय खत मात्रा पद्धती व जमिनीचे आरोग्य याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
कृषी विज्ञान केंद्र बोरगाव येथील शास्त्रज्ञ डॉ. भूषण यादगीरवार यांनी खरीप हंगामाच्या दृष्टीने सोयाबीन पिकाच्या उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान व त्या पिकाआधारित प्रक्रिया उद्योग व आले पीक प्रक्रियेविषयी मार्गदर्शन केले.
तसेच विषय विशेषज्ञ श्री. सकटे यांनी शेतकरी गटाच्या माध्यमातून दूध प्रक्रिया उद्योग व पशुपालन तसेच कमी खर्चात पशुखाद्याच्या नियोजनाविषयी मार्गदर्शन केले. प्रकल्प संचालक आत्मा विकास बंडगर यांनी विविध योजनांविषयी मार्गदर्शन केले.
कोरेगावचे मंडल कृषी अधिकारी संकेत धुमाळ यांनी कृषी विभागातील विविध योजनांचे मार्गदर्शन व सौ. गायकवाड यांनी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमाविषयी मार्गदर्शन केले.
‘शासन आपल्या दारी’ योजनेंतर्गत शेतकरी गट निर्मितीबद्दलची माहिती कोरेगाव आत्मा बिटीएमचे दिलीप जाधव, तसेच कृषी सहाय्यक अनंत कर्वे यांनी प्रधानमंत्री अन्न प्रक्रिया उद्योग महत्त्व यावर मार्गदर्शन व कार्यक्रमाचे नियोजन केले.
या कार्यक्रमास सरपंच महादेव घोरपडे यांनी पर्यावरण विषयीचे महत्त्व सांगितले. या प्रसंगी कृषी सहाय्यक मनोज माने, प्रकाश चव्हाण, ज्ञानेश्वर जाधव व शेतकरी व महिला शेतकरी गट उपस्थित होते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.