Shasan Aaplya Dari : ‘शासन आपल्या दारी’साठी समन्वय ठेवावा : पांडेय

Government Activities : शासन आपल्या दारी हा महत्त्वाचा उपक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कन्नड येथे शुक्रवारी (ता.२६) होणार आहे.
Collector Astik Kumar Pandey
Collector Astik Kumar PandeyAgrowon
Published on: 
Updated on: 

Kannad News : शासन आपल्या दारी हा महत्त्वाचा उपक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कन्नड येथे शुक्रवारी (ता.२६) होणार आहे. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणांनी समन्वय ठेवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडे (Collector Astik Kumar Pandey) यांनी केले आहे.

हा कार्यक्रम कन्नड-धुळे रस्त्यावरील शाम पिरथानी यांच्या शेतात एक लाख स्क्वेअर फूट जागेवर मंडप उभारण्यात येत आहे. नियोजनासाठी आयोजित बैठकीत श्री पाण्डेय म्हणाले की, कार्यक्रमास सिल्लोड, सोयगाव, खुलताबाद, वैजापूर, कन्नड या पाच तालुक्यातील एक लाख लाभार्थी येणार आहेत.

गर्दीच्या व्यवस्थापनासाठी पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया, पोलिस अधिकारी मुकुंद आघाव, सपोनि सचिन खटके, तातेराव भालेराव व ट्रॅफिक पोलिस यंत्रणेशी संवाद साधला.

Collector Astik Kumar Pandey
Minister Sandipan Bhumre : ‘शासन आपल्या दारी’चा पालकमंत्र्यांनी घेतला आढावा

या ठिकाणी ४००० वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था असून छत्रपती संभाजीनगर व कन्नड नगर परिषदेचे फिरते शौचालय तसेच १२ पाण्याचे टँकर व इतर सुविधा देण्याची सूचना जिल्हाधिकारी यांनी केली.

याप्रसंगी जिल्हा परिषदेचे सीईओ विकास मीना, अप्पर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे, गट विकास अधिकारी चंद्रहार ढोकणे, तहसीलदार विद्याचरण कडवकर, डॉ संजय मुळे, नगरपरिषदेचे प्रशासक नंदकिशोर भोंम्बे, जिल्हा कृषी अधीक्षक प्रकाश देशमुख, उपविभागीय कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बरदे, तालुका कृषी अधिकारी बाळराजे मुळीक, विशेष कार्यकारी अधिकारी उदय देवळांकर, नायब तहसीलदार मोनाली सोनवणे, नायब तहसीलदार हारून शेख, मंडळ अधिकारी सतीश भदाने आदींची उपस्थिती होती.

या कार्यक्रमाचे नोडल अधिकारी म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते यांची नेमणूक करण्यात आली आहे. जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख भरतसिंग राजपूत यांनी केले.

याप्रसंगी केतन काजे, डॉ. मनोज राठोड, अब्दुल जावेद, जयेश बोरसे, पांडुरंग घुगे, मनोज देशमुख, सुरेश डोळस, कैलास अकोलकर, गोकुळसिंग राजपूत, राजेंद्र शेलार, मुख्यमंत्री कार्यालयाचे अधिकारी संदीप गिट्टे आदींची उपस्थिती होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.