Karj Mafi Yadi : कर्जमाफी अनुदान लाभार्थींची चौथी यादी प्रसिद्ध; यादीत नाव कसं शोधायचं?

Latest Marathi News: चौथ्या यादीत नाव असणाऱ्या शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण (केवायसी) करून घेणे आव्हसीक आहे.
Latest Marathi News Karj Mafi Yadi 2023
Latest Marathi News Karj Mafi Yadi 2023Agrowon

Farmer Subsidy : शेतकऱ्यांना ५० हजार प्रोत्साहनपर अनुदानाची चौथी यादी मंगळवारी (ता.१४) रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

महात्मा फुले कर्जमाफी योजनेत (Mahatma Phule Loan Waiver Scheme) नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Chief Minister Eknath Shinde) केली होती.

लाभार्थी शेतकऱ्यांच्या नावांच्या तीन याद्या आत्तापर्यंत प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यामुळे चौथ्या यादीकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून होते.

लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ३१ मार्च २०२३ च्या पूर्वी थेट ५० हजार रुपये जमा करण्यात येतील, अशी माहिती देण्यात आली आहे. राज्यातील पात्र लाभार्थींचा मृत्यू झाला आहे अशा पात्र लाभार्थींची नावे या यादीत सामाविष्ट करण्यात आले आहेत.

तसेच पात्र शेतकऱ्यांचे एकापेक्षा अधिक कर्ज खाते होते अशा शेतकऱ्यांची नावेही चौथ्या यादी आली आहेत.

Latest Marathi News Karj Mafi Yadi 2023
Farmer Loan Waive : राज्य शासनाने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी

चौथ्या यादीत नाव असणाऱ्या शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण (केवायसी) करून घेणे आव्हसीक आहे. अन्यथा प्रोत्साहनाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करणे गरजेचे आहे.

पात्र लाभार्थी ही यादी mjpsky च्या पोर्टलवर पाहू शकतात. त्यासाठी जवळच्या सीएससी सेंटरवर जाऊन ही यादी पाहता येईल. तसेच मोबाइलवरूनही ही यादी पाहता येते. mjpsky पोर्टलवर लॉगिन करून शेतकरी यादीत स्वत:चे नाव तपासू शकतात.

Latest Marathi News Karj Mafi Yadi 2023
Farmer Loan Waive : भूविकास बँकेची ९६४ कोटींची कर्जमाफी

दरम्यान, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा २७ जुलै २०२२ रोजी राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com