Food Grain : जळगाव जिल्ह्यात २८ लाख लाभार्थ्यांना मिळणार मोफत धान्य

पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत मोफत धान्य लाभाच्या योजनेची मुदत सप्टेंबरपर्यंत होती. या योजनेस पुन्हा तीन महिने म्हणजे डिसेंबर २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
Ration Shop
Ration ShopAgrowon
Published on
Updated on

जळगाव ः पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत (Garib Kalyan Yojana) मोफत धान्य (Free Food Grain) लाभाच्या योजनेची मुदत सप्टेंबरपर्यंत होती. या योजनेस पुन्हा तीन महिने म्हणजे डिसेंबर २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यासाठी राज्य शासनाने मोफत धान्यवाटपासाठी गहू (Wheat) आणि तांदळाचा साठा (Rice Stock) जिल्हा प्रशासनाकडे मंजूर केल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यांनी दिली.

Ration Shop
Agriculture Produces Rate : खेळ शेतीमालाचे दर पाडण्याचा

राज्यासह देशभरात मार्च २०२० मध्ये कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला. यानंतर देशभरात निर्बंध लावण्यात आले होते. यादरम्यान गोरगरीब सर्वसामान्यांच्या रोजगारावर परिणाम झाला होता. त्यांची अन्नधान्याची गैरसोय टाळण्यासाठी केंद्र सरकारने मोफत धान्य देण्याचे जाहीर केले.

Ration Shop
Agriculture : कष्टाला शिक्षणाची जोड देत वाढवले उत्पन्नाचे स्रोत

त्यानुसार अंत्योदय व प्राधान्य गटातील सुमारे २८ लाख लाभार्थ्यांना रेशन दुकानदारांच्या माध्यमातून मार्च-एप्रिल २०२० पासून मोफत धान्यवाटप करण्यात आले. यात राज्य शासनाने मे व जून २०२१ मध्ये मोफत धान्यवाटपाची योजना जाहीर केली होती. या योजनेची मुदत सप्टेंबर २०२२ पर्यंत वाढविण्यात आली होती.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान गरीब कल्याण योजनेस टप्प्याटप्प्याने सप्टेंबर २०२२ पर्यंत मुदतवाढ दिली होती. त्यानंतर आता या योजनेस पुन्हा तीन महिने डिसेंबर २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यासोबत शासनाने मोफत धान्यवाटपासाठी गहू व तांदळाचा साठासुद्धा मंजूर करण्यात आला आहे. अंत्योदयअंतर्गत सुमारे सहा लाख ३० हजार, तर प्राधान्य गटात २१ लाख ४७ हजारांहून अधिक असे सुमारे २८ लाख योजनानिहाय जिल्ह्यातील लाभार्थी आहेत.

असे होणार वितरण

पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत मोफत पाच किलो तांदूळ दिला जात होता. त्यात बदल होऊन तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ असे वितरित करण्यात आले आहे; परंतु ऑक्टोबरपासून पीएमजीकेएवाय फक्त अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजनांसाठी आहे. केशरी एपीएल शिधापत्रिकाधारकांसाठी नाही. अंत्योदय गटातील लाभार्थ्यांना एक किलो गहू व चार किलो तांदूळ, तर प्राधान्य गटातील लाभार्थ्यांना चार किलो गहू व तीन किलो तांदळाचे वितरण केले जाणार आहे, असे श्री. सूर्यवंशी यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com