Tembhu Upsa Irrigation Project : ‘टेंभू’च्या बंदिस्त पाईपलाईनची कामे पूर्णत्वास

Tembhu Irrigation Project : टेंभू उपसा सिंचन प्रकल्पाचे एकूण निर्मित क्षेत्र ८० हजार ४७२ हेक्टर आहे. त्यापैकी उघडा कालव्याने ७ हजार ३२० हेक्टरवरील क्षेत्र सिंचनाखाली आले आहे.
Tembhu Irrigation Scheme
Tembhu Irrigation Scheme Agrowon
Published on
Updated on

Tembhu Irrigation Sangli News : टेंभू उपसा सिंचन प्रकल्पाचे एकूण निर्मित क्षेत्र ८० हजार ४७२ हेक्टर आहे. त्यापैकी उघडा कालव्याने ७ हजार ३२० हेक्टरवरील क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. तर ७३ हजार १५२ हेक्टर क्षेत्राला बंदिस्त पाईपलाईनद्वारे पाणी देण्याचे काम पूर्ण झाले आहे.

निर्मित क्षेत्रापैकी उघडा कालवा आणि बंदिस्त पाईपलाईनद्वारे ५२ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. काही भागांत बंदिस्त पाईपलाईनची अपूर्ण असलेली कामे पूर्ण करण्याचे काम सुरू आहे.

सांगली जिल्ह्यातील कडेगाव, तासगाव, खानापूर, आटपाडी आणि कवठे महांकाळ, सातारा जिल्ह्यातील कराड व सोलापूर जिल्ह्यातील सांगोला अशा सात तालुक्यांतील २१० गावांतील लाभ क्षेत्राला पाणी देण्यासाठी टेंभू उपसा जलसिंचन योजना तयार करण्यात आली.

टेंभू योजनेमुळे २४० गावांतील ८० हजार ४७२ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. टेंभू योजनेच्या कालव्यांसाठी लागणाऱ्या जमिनीचे संपादन करणे त्या शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला देण्यासह अन्य अडचणी निर्माण झाल्या होत्या.

Tembhu Irrigation Scheme
Tembhu Irrigation : ‘टेंभू सिंचन’ची उद्दिष्टापेक्षा अधिक पाणीपट्टी वसूल

२०१८ मध्ये बंदिस्त पाईपलाईनचे काम सुरू झाले असून हे काम पूर्ण करण्यासाठी प्रकल्पाने काटेकोर नियोजन केले. त्यामुळे पाच ते सहा वर्षांत बंदिस्त पाईपलाईनचे काम पूर्णत्वाकडे पोहोचले आहे. दुष्काळी पट्ट्यात शेतीला टेंभू सिंचनाच्या पाण्याचा आधार मिळाला आहे.

यामुळे बागायती क्षेत्रातदेखील वाढ झाली. टेंभू योजनेवर एकूण ४ हजार ८८ कोटीपैकी मार्च २०२३ अखेर ३ हजार ४८७ कोटी इतका खर्च झाला आहे. उर्वरित ६०१ कोटींची कामे प्रगतिपथावर आहेत. बंदिस्त पाईपलाईनद्वारे पाणी देण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.

असे मिळणार २२ टीएमसी पाणी

धरण उचलले जाणारे पाणी (टीएमसी)

कोयना - १८.४६

वांग- ०.९७

तारळी - १.६७

कृष्णा नदीचे पुराचे पाणी - ०.९०

तालुका निर्मित क्षेत्र (हेक्टरमध्ये)

कराड - ६००

कडेगाव - ९ हजार ३२५

तासगाव - ८ हजार ५००

खानापूर - १८ हजार १७५

आटपाडी - १६ हजार

कवठे महांकाळ- ९ हजार ४३४

सांगोला - १८ हजार ४३८

एकूण - ८० हजार ४७२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com