डॉ. नागेश टेकाळेशेती हा किती आनंदी व्यवसाय आहे हे फक्त चार पुस्तके कसे तरी शिकलेल्या शंकरने मला सांगितले. तो म्हणतो, ‘‘माझा बांध आडवा पसरलेला आहे, पण त्यामुळेच मी आज ताठ उभा आहे, ना कसले कर्ज ना कसली चिंता!’’ .Sustainable Farming Practices: प्रत्येक लहान मोठ्या जमिनीस बांध हा हवाच. पूर्वी तो आवश्यक होता, सध्या मात्र तो असावा की नसावा, असला तर किती रुंद असावा यावर चर्चा सुरू ठेवून दोन्हीही बाजूंनी बांध कोरण्याचे उद्योग सुरू असतात.बांध म्हणजे अडचण, उगीच वावराची जमीन वाया जाते अशी एक समजूत. शूर सैनिक इंच इंच लढवू म्हणत मायभूमीचे रक्षण करतात तर किसान इंच इंच जमीन ओढू, असे म्हणत बांधाचे रूपांतर पाय वाटेत करतात. पूर्वी शेताच्या बांधावरून बैलगाडी सहज जात असे, आता चित्र बदलले आहे. शेतीचा भला मोठा रुंद बांध म्हणजे फळे देणाऱ्या अनेक वृक्षाचे, पक्ष्यांचे हक्काचे निवासस्थान. बांधावर गावठी बोर असे..Sustainable Farming: कृषी तंत्र विद्यालय ठरेल शाश्वत शेतीसाठी आदर्श मॉडेल.आवळा, हादगा, शेवगा, कढीपत्ता हमखासच असे. मध्य प्रदेशामधील होशिंगाबाद जिल्ह्यातील शंकर यादवच्या शेताला मी भेट दिली आणि काय आश्चर्य, त्याच्या शेतातील चारही बांधावर तब्बल एक हजार सीताफळांनी गर्दी करून आतील अडीच तीन एकर शेताला सुरक्षित केले होते. सीताफळाने बहरलेली झाडे शंकरला वर्षाला तब्बल दोन लाख रुपये नफा देत होती. आतील वावरातून खरिपात भुईमूग आणि रब्बीमध्ये गव्हाचे उत्पादन कायम सुरूच होते. शेताजवळ तवा नदी असल्याने हवेतून येणारी सूक्ष्म वाळू त्याच्या शेतात विसावत असे, नदीची ओल, वाळूमुळे खेळती हवा, मुळांना उपलब्ध प्राणवायू यामुळे भुईमुगाच्या वेली शेंगाने भरलेल्या तर तंतुमय मुळांमुळे गव्हाच्या उत्पादनात प्रति वर्षी भरच पडत असे..विशेष म्हणजे भुईमुगाचे नत्र गव्हाला मिळत असे. अतिशय सुखी, आनंदी असलेल्या शंकरचे त्याच्या बांधावर आणि सीताफळावर मनापासून प्रेम. त्याने बांधाशेजारी खाट टाकून सीताफळांच्या झाडांना आवर्जून भेट देणाऱ्या कृषी पर्यटकांना या फळाच्या गोडीचा एक वेगळाच आनंद दिला.शेती हा किती आनंदी व्यवसाय आहे हे फक्त चार पुस्तके कसे तरी शिकलेल्या शंकरने मला सांगितले. तो म्हणतो, ‘‘माझा बांध आडवा पसरलेला आहे, पण त्यामुळेच मी आज ताठ उभा आहे, ना कसले कर्ज ना कसली चिंता!’’.Sustainable Farming: शेती शाश्वत, उद्योगाभिमुख बनवणे काळाची गरज.उत्पन्नाचे साधन बांधशंकरच्या शेतात रासायनिक खते आणि कीडनाशकास प्रवेश नाही म्हणूनच त्याच्या शेतामधील शेंगा आणि गव्हासाठी नोकरदार लोक आगाऊ नोंदणी करतात. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीचे उत्पन्न दुप्पट करावयाचे असेल तर प्रथम रुंद बांधाची निर्मिती करा, त्यांची काळजी घ्या आणि बांध हे मुख्य शेतीला मदत करणारे असून एक महत्त्वाचे साधन म्हणून त्याच्याकडे लक्ष द्या. बांधावर नेहमी फळ उत्पादन घेतले तर ते शाश्वत होते. आपण शेतकरी मुख्य शेताकडे लक्ष देत, किडीने शेत खाल्ले, पावसाने वाहून गेले, डोक्यावर कर्ज झाले म्हणून चिंचोळ्या बांधावर कपाळाला हात लावून दु:ख व्यक्त करतो..त्याचवेळी ज्या बांधावर आपण बसलेलो असतो त्याचाच विश्वासू हात आपल्या खांद्यावर असतानाही ‘माझी मदत घे’ हे त्याचे शब्द आपणास ऐकू येत नाहीत. गेल्या पावसाळ्यात आपल्या राज्यात लाखो हेक्टर जमीन मॉन्सूनच्या पावसात वाहून गेली कारण जमिनीच्या रक्षणासाठी हवे असणारे मजबूत बांधच आमच्या शेताला नव्हते आणि बांधाला बळ देणारे झाडेही नव्हती.शेताचे बांध आपणास सुपीक माती देतात, ती माती आपण नियमित शेतात टाकणे आवश्यक आहे. मुख्य शेतीला पूरक असा कृषी व्यवसाय बांधाच्या मदतीने आपण सुरू करू शकतो. पूर्वी शेताच्या बांधाला चिटकून शेतकरी जवस, करडई, झेंडू यांचे उत्पादन घेत, आता तसे काहीच उरले नाही..Sustainable Farming: शाश्वत शेती, जैवविविधतेचे संरक्षण महिलांच्या नेतृत्वाखालील.बांधावरची बोरंपंजाब या राज्यात मुख्य दोनच पिके, खरिपामध्ये भात आणि रब्बीला गहू. आता या राज्यात शेतकऱ्यांनी बांधाची रुंदी वाढवत त्यावरून ओळीने बोराची झाडे लावण्यास सुरुवात केली आहे. पंजाब कृषी विद्यापीठाने विकसित केलेली बोरांची ही वाणे खास बांधावरच्या शेतीसाठीच आहेत. आकाराने लहान, चवीला अतिशय गोड असणारी ही पिवळसर फळे तेथील शेतकरी आता निर्यात करीत आहेत. पूर्वी तेथील बांध असेच पडून असत, आज ते भात आणि.गव्हाच्या बरोबरीने उत्पन्नाचे मुख्य साधन झाले आहे. विशेष म्हणजे या अशा बांध शेतीला, त्यावरील बोरांच्या झाडांना ना कसली खताची ना कीडनाशकाची गरज! या वाणाची बोरे हाताने सहज काढता येतात. संगरूर, मनसा आणि भटिंडा जिल्ह्यात जेथे पाहावे तेथे ही बोरे दिसतात. शीख लोकांसाठी बोर हे पवित्र समजले जाते. म्हणूनच लावलेले झाड कुणी तोडत नाही. अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात असलेले ४०० वर्षांचे बोराचे झाड अनेकांचे श्रद्धा स्थान आहे. फेब्रुवारी, मार्च अथवा जुलै, ऑगस्टमध्ये येथील शेतकरी बांधावर या वृक्षांना जागा करून देतात. डिसेंबर ते एप्रिलपर्यंत त्यांचा हंगाम असतो.विशेष म्हणजे या लहानशा वृक्षाला पाणी फारच कमी लागते आणि कमीत कमी १२ वर्ष सातत्याने उत्पादन मिळत राहते ते वेगळेच! पंजाबमध्ये सध्या अनेक शेतात ताज्या बोरांच्या पार्ट्या बांधावरच चाललेल्या पाहावयास मिळतात, हा बांधाचा सन्मानच नव्हे काय?.पूर्वी शेतांचे बांध म्हणजे शेतकऱ्यांची सकाळी न्याहरी, दुपारची भाकरी खाण्याचे हक्काचे ठिकाण! पोटात कष्टाचे दोन घास गेले, की बांधावरचाच मोठा वृक्ष त्यास मायेची सावली देत असे. बांधाला खेटूनच वाहणारे पाटाचे पाणी त्याची तृष्णा भागवत असे.आता हा जसा इतिहास आहे तसाच बांधावर चरणारी कपिला गाय आणि तिचे वासरू हा सुद्धा इतिहासच! पहिल्या पावसात येणारा पहिला सुगंध बांधावरच्या मातीचाच. रुंद बांध असलेल्या जमिनी नेहमीच शाश्वत कृषी उत्पादन देतात, बांधावरची जैवविविधता, तेथील लहान पक्षी यांचे शेतीसाठी फार मोठे योगदान आहे..बांधावरच्या शेतीसाठी विशेषतः वृक्ष शेतीसाठी शेतकऱ्यांना एका पैशाचाही खर्च येत नाही. बांधावरच्या वृक्षांची सावली वावरात पिकांचे उत्पादन कमी देते हा एक गैरसमज! हे वृक्ष उंचीने लहान असावेत आणि त्यांनी सावली दिली तरीही त्या सावलीत अनेक पालेभाज्या उत्तम वाढू शकतात. ही सावली हरितगृहाचेच कार्य करते.शेतीचे मजबूत बांध हे निसर्ग शेतीला पूरक आहेत. भविष्यात दुष्काळ आणि मॉन्सूनचे थैमान आपापसांत पाठशिवणीचा खेळ खेळणार आहेत म्हणूनच बांधाकडे आपण आपल्या शेतीचा खरा रक्षक म्हणून पाहावयास हवे. त्याबरोबरच शेतकऱ्यांसाठी शेतीच्या उत्पन्नात काहीही खर्च न करता त्यांच्यासाठी त्यात भर टाकणारा कुबेरच हे बांध म्हणावयास हवे.९८६९६१२५३१(लेखक शेती प्रश्नांचे अभ्यासक आहेत.).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.