Climate Resilient Agriculture: ‘एल निनो’ आणि बदलते हवामान ही समस्या नसून बदलती पर्यावरणीय व्यवस्था मानून त्याबद्दल समाजाने स्वतःला तयार केले पाहिजे. हा केवळ तात्पुरता उपायाचा भाग नसून दूरगामी धोरणाचा भाग बनला आहे..‘एल निनो’ परिस्थिती निर्माण झाल्यामुळे बदललेल्या हवामानाचे शेतीवर, जनजीवनावर आणि पर्यावरणावर झालेले प्रतिकूल परिणाम पाहता सर्वांत प्रभावी झालेले क्षेत्र म्हणजे शेती होय. शेती क्षेत्राला बसलेला फटका हा केवळ शेतकऱ्यांपर्यंत मर्यादित राहत नाही, तर तो संपूर्ण समाजावर प्रतिकूल परिणाम करतो. एल निनोच्या परिस्थितीच्या पुनरावृत्तीचा इतिहास पाहता भविष्यदेखील काही वेगळे असेल असे मानण्याचे कारण नाही. याचा अर्थ एल निनो आणि बदलते हवामान ही समस्या नसून बदलती पर्यावरणीय व्यवस्था मानून त्याबद्दल समाजाने स्वतःला तयार केले पाहिजे..Goat Farming Management: नियोजनबद्ध शेळीपालनात आरोग्य, खाद्य व्यवस्थापनावर भर.हा केवळ तात्पुरता उपायाचा भाग नसून दूरगामी धोरणाचा भाग बनला आहे. असे उपाय केवळ वैयक्तिक पातळीवर करून भागणार नाही तर त्यासाठी सामूहिक निर्धार व कृतीची गरज निर्माण झाली आहे. यासाठी हवामान अनुकूल शेती पद्धतीचा अंगीकार करणे गरजेचे आहे..सामूहिक उपायगाव ह घटक मानून हंगामाचे नियोजन करण्याची जबाबदारी कायद्यान्वये ग्रामपंचायतीची असून, राज्यशासनाने २०२० मध्ये निर्माण केलेल्या ग्राम कृषी विकास समितीने तत्काळ पुढाकार घेऊन हे काम सुरू केले पाहिजे. भारतीय हवामान विभागाकडून प्राप्त हवामान अंदाज तातडीने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे आणि त्यानुसार करावयाच्या शेतीच्या कामांबद्दल बैठकीमध्ये चर्चा केली पाहिजे. भारतीय हवामान विभागाकडून दिला जाणारा पावसाचा अंदाज आणि प्रत्यक्ष पडलेला पाऊस या दोन्ही माहितीच्या आधारे कृषी विभागाकडून महाविस्तार एआय ॲपच्या माध्यमातून तालुकानिहाय देण्यात येणारा पेरणीचा सल्ला लक्षात घेऊनच पेरणीचे नियोजन करावे. .दीर्घकालीन उपायांमध्ये सामूहिक आणि वैयक्तिक स्तरावर करावयाचे उपाय केले पाहिजेत. सामूहिक उपायांमध्ये गावाच्या शिवारात पडणाऱ्या पावसाचे पाणी गावातच अडवणे, मुरवणे आणि साठवणे यावर भर द्यावा लागेल. यासाठी गावांमध्ये शिवार फेरी करून पाण्याचा ताळेबंद तयार करावा लागेल. त्यानुसार मृद् व जलसंधारणाची कामे हाती घेतली पाहिजेत. त्याबरोबरच भूजल पुनर्भरण करणे, विहिरींचे पुनर्भरण करणे, इनलेट आउटलेटसह शेततळी घेणे या कामांना प्राधान्य द्यावे लागेल. शेततळे हा फारच महत्त्वाचा उपाय आहे हे लक्षात घेऊन नाल्याच्या काठावरील जमिनीवर जास्तीत जास्त शेततळी तयार करावीत. पावसाळ्यात उपलब्ध होणाऱ्या पाण्याचा संचय जेवढा महत्त्वाचा त्यापेक्षाही त्याचा काटकसरीने वापर महत्त्वाचा आहे. पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने ठिबक किंवा तुषार सिंचनाचा अवलंब केला पाहिजे. हा जरी वैयक्तिक उपाय असला तरी शेतकरी गटांनी याबाबत पुढाकार घेतला पाहिजे..‘बेड तारी त्याला कोण मारी’वैयक्तिक स्तरावर शेतीची पद्धती बदलणे गरजेचे आहे. पेरणीसाठी परंपरागत पद्धतीऐवजी मूलस्थानी जलसंधारण तत्त्वाचा अंगीकार करून जमिनीची तयारी करावी लागणार आहे. जे शेतकरी कोरडवाहू शेती करतात त्यांनी जमिनीची कमीत कमी हलवाहलव करून पेरणी किंवा टोकण करावी. येथे महत्त्वाचे आहे रुंद वरंबा सरी म्हणजेच बीबीएफ तंत्रज्ञान आणि हेच आहे, बदलत्या हवामानातील एक यशस्वी तंत्र! या तंत्राचा वापर बीबीएफ यंत्राचा वापर करून आणि बीबीएफ यंत्राशिवाय करता येतो. .Mosambi Farming Management : मोसंबीतील आंबिया बहराचे व्यवस्थापन.Pre Monsoon Farming Management: मॉन्सूनपूर्व मृद् आणि जलसंधारणाचे उपाय.सध्या बाजारात ४ ते ९ फणे असणारी बीबीएफ यंत्रे उपलब्ध झाली आहेत. त्यामुळे मुख्य पिकाबरोबर आंतरपिके घेणे देखील सोईचे झाले आहे. बीबीएफ यंत्राशिवाय रुंद वरंबे तयार करण्यासाठी बेड मेकर, बंड फॉर्मर, रिजर अशा यंत्रांचा वापर करून बेड तयार करता येतात आणि ४ ते ४.५ फूट माथा असलेले बेड जवळपास सर्व पिकांना उपयुक्त आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची सोय आहे आणि ज्यांची जमीन मध्यम ते भारी आहे त्यांनी जरूर बेड तयार करावेत. बेड पद्धतीचा उपयोग एल निनो आणि ‘ला निना’ या दोन्ही परिस्थितीमुळे निर्माण होणाऱ्या संकटात पिके वाचविण्यासाठी निश्चित होतो. म्हणून असे म्हटले जाते की ‘बेड तारी त्याला कोण मारी’!.बदलत्या हवामानात पिकांचे नियोजन करताना कमी कालावधीत येणारे आणि कमी पावसावर तग धरणारे पिकांचे वाण निवडावेत. कडधान्ये, तेलबिया, मिलेट्स यांसारख्या कमी पाण्यात येणाऱ्या व बदलत्या हवामानास अनुकूल असलेल्या पिकांना प्राधान्य देणे गरजेचे आहे. प्रत्येक गावात ‘बियाणे बँक’ तयार करणे गरजेचे आहे. दुबार पेरणीची वेळ आल्यास अशा बियाणे बँकांची मोठी मदत होणार आहे. लहरी हवामानात शेतीमधील जोखीम कमी करण्यासाठी आणखी एक चांगला उपाय म्हणजे एकल पिकाची लागवड न करता आंतरपीक पद्धत अवलंबावी. कापूस पिकाची सघन लागवड करणे जोखीम कमी करणारा उपाय आहे. भात पिकाची सरळ पेरणी पद्धत ही पारंपरिक चिखलणी व लावणी पद्धतीपेक्षा अनेक पटीने सरस असल्याचे सिद्ध झाले आहे. पाण्याचा कमीत कमी वापर करून भाताचे चांगले उत्पादन घेण्याचा हा हवामान अनुकूल मार्ग आहे..बदलत्या हवामानात पिकांचे पोषण करण्यासाठीचा विचार हा मातीच्या गुणधर्माशी निगडित आहे. मातीची जलधारण क्षमता लक्षात घेऊन ज्या जमिनींची जलधारण क्षमता कमी आहे तेथे मूलस्थानी जलसंधारणाचे उपाय करणे गरजेचे आहे. ज्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचे प्रमाण १% पेक्षा कमी आहे त्या जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण वाढविण्यासाठी संवर्धित शेती, नैसर्गिक शेती आणि हरित आच्छादन करणे गरजेचे आहे. याशिवाय शेतावरच नैसर्गिक आणि सेंद्रिय निविष्ठा तयार करण्यासाठी व्यापक मोहीम घेणे गरजेचे आहे. .बदलत्या हवामानात नव्याने काही किडींचा आणि रोगांचा प्रादुर्भाव होत आहे हे लक्षात घेऊन पीक संरक्षणासाठी केवळ रासायनिक उपायांवर अवलंबून न राहता एकात्मिक उपाय अवलंबणे गरजेचे बनले आहे. यामध्ये जैविक कीड नियंत्रण, नैसर्गिक कीड नियंत्रण, विविध सापळ्यांचा वापर करण्यावर भर देणे अपरिहार्य आहे. नैसर्गिक कीड व्यवस्थापनामुळे कीड-रोग नियंत्रण अधिक प्रभावीपणे करता येते तसेच उत्पादन खर्चात बचत होते..कृषी विभागामार्फत महाविस्तार ॲपद्वारे सांगितली जाणारी पेरणीची योग्य वेळ कोणती आहे हे समजून घेऊनच शेतकऱ्यांनी पेरणीचा निर्णय घेणे गरजेचे आहे. तसे न केल्यास यापूर्वी अनुभवलेले दुबार पेरणीचे संकट निर्माण होऊ शकते. नोंदणीकृत शेतकऱ्यांचे मोबाईलवर कृषी विभागामार्फत हवामानाचे इशारे आणि संदेश देणारे फोन येत असतात. त्याचाही उपयोग शेतकऱ्यांनी पेरणी, सिंचन, फवारणी, काढणी इत्यादी निर्णय घेताना करावा. असे सर्व उपाय शेतीतील जोखीम कमी करून उत्पादन स्थिर राखण्यास निश्चितच उपयुक्त आहे. ८३६९४७२१९८(लेखक नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातील सेवानिवृत्त कृषिविद्या व मृदा विज्ञान विशेषज्ञ आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.