मोठी लोकसंख्या, शेती व्यवसाय, ग्रामीण अर्थकारण, मोठी बाजारपेठ अशा अनेक पातळीवरील साधर्म्यातून भारत आणि चीनची विकासाच्या बाबतीत कायम तुलना केली जाते.China rural development policy: चीनने शेतीमाल उत्पादन क्षमता, गुणवत्ता आणि कार्यक्षमता वाढविण्यासाठी पुढील पाच वर्षांचा कृती आराखडा तयार केला आहे. झोननिहाय शेती-पशुपालन विकासातून शेतीमालाची उत्पादकता आणि गुणवत्ता वाढवायची, एवढेच नव्हे तर सर्वांच्या समन्वयातून चीनमधील शेतीमालाचा ब्रॅंड तयार करून तो जगभर पोहोचला पाहिजे, यावर या कृती आराखड्याचा भर आहे.खरे तर ध्येय निश्चिती, त्यासाठी धोरणात बदल, निधीची तरतूद, ध्येयपूर्तीसाठी कृती आराखडा तयार करून तो प्रत्यक्षात उतरवायचा, शेती आणि एकंदरीतच ग्रामविकासाबाबत ही चीनची सुरुवातीपासूनची नीती राहिली आहे. त्यामुळेच जागतिक पातळीवर एक मोठी शेतीमाल बाजारपेठ म्हणून चीनने नावलौकिक मिळविला आहे..सुमारे तीन दशकांपूर्वी शेती आणि ग्रामीण विकासात चीन खूपच मागे होता. ग्रामीण भागात अन्नधान्याअभावी लोकांची उपासमार होत होती. आपल्या देशापेक्षाही दारिद्र्याच्या बाबतीत चीनची अवस्था भीषण होती.त्यानंतर मात्र त्यांनी खुल्या अर्थव्यवस्थेत बदलते जागतिक संदर्भ आणि समीकरणानुसार नियोजनबद्ध पद्धतीने पावले टाकण्यास सुरवात केली. १९७८ ला चीनने आपली साम्यवादी धोरणे लवचिक करून बाजारपेठेवर आधारित अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला. त्यानंतर या देशाने केलेली आर्थिक प्रगती केवळ थक्क करणारी आहे..China Agriculture Plan: शेतीसाठी चीनचा आक्रमक कृती आराखडा तयार.चीनचे लक्ष जागतिक महासत्तेकडे होते, यात ग्रामीण भागातील गरिबी अडसर ठरू शकते हे त्यांनी ताडले. ग्रामीण अर्थव्यवस्था सुधारायची असेल तर शेतीत गुंतवणूक वाढविली पाहिजे हे त्यांनी ठाणले आणि शेतीसाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक तरतूद करून चिनी शेतकऱ्यांना पायाभूत तसेच अत्याधुनिक सोईसुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिल्या.शेतकऱ्यांना कमी व्याज दरात अधिक सुलभतेने भांडवल पुरवठा केला. एवढेच नव्हे तर भौगोलिक परिस्थिती आणि हवामानानुसार पिकांच्या लागवडीचे नियोजन कृषी खात्यातील तज्ज्ञ शेतकऱ्यांना देतात..पिकांच्या उत्पादकता वाढीसाठी पाणी, वीज, अत्याधुनिक यंत्रे शेतकऱ्यांना मोठे अनुदान देऊन पुरविली जातात. त्यामुळे फळे-भाजीपाल्यासह अनेक पिकांची उत्पादकता चीनमध्ये अधिक आहे.चीनची शेती प्रगतिपथावर असताना सुद्धा कोरोना आपत्ती त्यानंतर सातत्याने युद्धजन्य परिस्थिती, व्यापार युद्धाचा रेटा यामुळे अन्नसुरक्षा असो की शहरी-ग्रामीण एकात्मिक विकास याबाबत चीन अधिक सजग झाले आहे. काळाची पावले ओळखत शेतीला अत्याधुनिक बनविण्याबरोबर जगाची बाजारपेठ काबीज करण्याचा आताचा त्यांचा हेतू कौतुकास्पद म्हणावा लागेल..China Agricultural: शेतीचा चेहरामोहरा बदलण्यासाठी चीनची नवी रणनीती.मोठी लोकसंख्या, शेती व्यवसाय, ग्रामीण अर्थकारण, मोठी बाजारपेठ अशा अनेक पातळ्यांवरील साधर्म्यातून भारत आणि चीनची विकासाच्या बाबतीत कायम तुलना केली जाते. चिनी ड्रॅगन आणि भारतीय हत्ती अशी ही तुलना प्रसिद्ध असून यात ड्रॅगन सुसाट वेगाने पुढे जात आहे.खुली अर्थव्यवस्था आणि हवामान बदलाच्या काळातच आपण शेतीकडे दुर्लक्ष केले आहे. शेतीसाठी पायाभूत, अत्याधुनिक सुविधा तर पुरविल्या जात नाहीत, उलट कष्टाने पिकविलेल्या मालाच्या निर्यातीवरही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अनेक निर्बंध लादले जातात..या देशातील शेती संरक्षित नाही आणि शेतकरीही सुरक्षित नाही. आजही शेती विकासाची फारच चिंता असल्याचे केवळ भासविले जाते. प्रत्यक्ष शेती क्षेत्रात गुंतवणूक असो अथवा निधीची तरतूद असो, त्यात मात्र हात आखडता घेतला जातो. आपल्या देशात सरकारची ध्येयधोरणे शेतीस पूरक नाही तर मारकच राहिली आहेत. शेतीसह एकात्मिक ग्रामविकासाचा धडा चीनपासून आपण केव्हा घेणार, हा खरा प्रश्न आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.