Animal Husbandry : पशुधनासाठीही पोषक भरडधान्य

Millet Update : भरडधान्यांची व्याख्याच ‘मानवी अन्न आणि जनावरांसाठी चारा म्हणून जगभरात मोठ्या प्रमाणावर उत्पादन होत असलेला एक वैशिष्ट्यपूर्ण पिकांचा गट’ अशी केली गेली आहे.
Animal Husbandry
Animal HusbandryAgrowon
Published on
Updated on

Animal Food Update : संपूर्ण जग २०२३ आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष म्हणून साजरे करीत आहे. या अनुषंगाने भरडधान्यांचे आपल्या पीक पद्धतीत, तसेच आहारातील महत्त्वाबाबत सर्वत्र चर्चा आहे. परंतु यात स्थानिक ते जागतिक पातळीवरील चर्चेत भरडधान्यांचे चारापीक म्हणून असलेल्या योगदानासंदर्भात फारसे कोणी बोलताना दिसत नाही.

राज्यात नुकतीच ‘महाराष्ट्र मिलेट मिशन’वर चर्चा झाली. त्यातही भरडधान्यांचा चाऱ्याच्या अनुषंगाने फारसा विचार झाला नाही. महाराष्ट्र दुग्धोत्पादनात आघाडीवरचे राज्य आहे. अशावेळी चाराटंचाईचा सामना सतत करावा लागतो.

दुष्काळात तर चाराटंचाईचे भीषण रूप पाहावयाला मिळते. राज्यात मागील तीन वर्षे चांगला पाऊस होता. तरीही वर्षभर चाराटंचाईचा सामना करावा लागला. सध्याच्या लांबलेल्या पावसाने तर ही टंचाई अधिक गंभीर झाली आहे.

भरडधान्य, तृणधान्य आपल्या पीक पद्धतीतून गायब झाली, हेही राज्यातील चाराटंचाईचे महत्त्वाचे कारण आहे. त्यामुळेच भरडधान्यांचा जनावरांसाठी चारा तसेच धान्य भरडून तयार होणाऱ्या पशुखाद्यांवर चर्चा झालीच पाहिजे.

ज्वारी, बाजरी, नाचणी, भगर, राजगिरा, कोदो, कुटकी ही आपल्या मातीतील पारंपरिक भरडधान्य. प्रतिकूल हवामान परिस्थितीतही भरडधान्य तग धरून शेतकऱ्यांना बऱ्यापैकी उत्पादन देतात. जोपर्यंत आपल्या पीक पद्धतीत आणि आहारातही पचनास हलकी, पोषणमूल्ययुक्त भरडधान्ये होती, तोपर्यंत आपले आरोग्यही चांगले राहत होते.

जनावरांच्या चाराटंचाईची समस्याही गंभीर होत नव्हती. परंतु भरडधान्यांच्या जागी पीक पद्धतीत नगदी पिके आली. आहारातही गव्हासह इतर धान्ये आली आणि पचनसंस्थेच्या आजारापासून इतरही गंभीर आजारांनी आपल्याला ग्रासले.

Animal Husbandry
Millet Seed : शेतकऱ्यांना भरडधान्य बियाण्यांचे मिनी किट देणार

मुळात भरडधान्यांची व्याख्याच ‘मानवी अन्न आणि जनावरांसाठी चारा म्हणून जगभरात मोठ्या प्रमाणावर उत्पादन होत असलेला एक वैशिष्ट्यपूर्ण पिकांचा गट’ अशी आहे. ज्वारी, बाजरी, नाचणीचा उपयोग ओला-सुका चारा म्हणून होतो. अनेक भरडधान्यांचा वापर जनावरांसाठी चराऊ कुरणे विकसित करण्यासाठी केला जाऊ शकतो.

भरडधान्यांची कोवळी हिरवी पाने आणि कोंब यात सर्वाधिक खाद्य मूल्य आहे. ‘जपानी बाजरी’ ही चराऊ कुरणासाठी उत्तम नवीन जात आहे. या जातीची उगवण चांगली होते, वाढ झपाट्याने होते शिवाय ती लवकर चारता येते.

ज्वारीच्या तुलनेत बाजरीच्या कडब्याने जनावरांचे वजन झपाट्याने वाढते. याचा सायलेज (मुरघास) उत्तम तयार करता येतो. बाजरीचा दुहेरी वाण आयसीएमव्ही १६७००५, आयसीएमव्ही १६७००६ डावनी रोगप्रतिकारक असून, शेळ्यांसाठी उत्तम चारा म्हणून वापरला जातो.

नाचणी धान्य कापणीनंतर मिळणारा पेंढा वाळला चारा म्हणून उपयुक्त असून तो जनावरांना थेट चारता येतो. राळेदेखील चारा पीक म्हणून घेतले जाऊ शकते, तसेच त्याचा मुरघासदेखील बनवता येतो.

भरडधान्य चारा पिकांना पाणी कमी लागते. यातील काही चारा पिके उन्हाळ्यातही कमी पाण्यात घेता येतात. रागी, नाचणी अनेक देशांत चारा गवत म्हणून लागवड होते. भरडधान्य उत्पादनांसाठी अत्यंत कमी खर्च येतो. याद्वारे चारा तसेच पशुखाद्यावर होणाऱ्या खर्चावर नियंत्रण आणता येते. भरडधान्यांचा चारा तसेच धान्य जनावरे, शेळ्या-मेंढ्या आवडीने खातात.

हंगामनिहाय वर्षभर चारा पिके घेण्याचे नियोजन शेतकरी करू शकतात. पारंपरिक भरडधान्यांना पुन्हा पीक पद्धतीत आणले तर अन्न सुरक्षेबरोबर (फूड) जनावरांचा चारा (फॉडर) समस्येवर मात करता येऊ शकते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com