top 5 news -कोणत्या देशांत १० वर्षांतील निचांकी सोयाबीन उत्पादनाचा अंदाज?

जागतिक सोयाबीन उत्पादनात घट होण्याचा अंदाज युएसडीएनं व्यक्त केला आहे. तर महत्वाच्या काही देशांत सोयाबीन उत्पादन मागील १० वर्षांतील निचांकी पातळीवर राहिल, असे म्हटले आहे. हे देश कोणते आहेत? याचा सोयाबीन बाजारावर काय परिणाम होऊ शकतो?
soyabean
soyabean

1. मध्य महाराष्ट्रात विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागानं वर्तविलाय. राज्यातील जळगाव, नाशिक, औरंगाबाद, जालना, नाशिक, नगर, पुणे, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, सातारा, सांगली आणि कोल्पापूर जिल्ह्यातील काही भागांत पावसाचा अंदाज आहे. तर इतर जिल्ह्यांध्ये वातावरण सामान्य राहिल, असा अंदाज हवामान विभागानं वर्तविलाय. मागील दोन दिवसांत राज्यातील काही भागांत पाऊस झाला. काही ठिकाणी गारपीटही झाली. या पाऊस आणि गारपीटीने द्राक्ष, डाळींब, पपई, आंबा, केळी आदी फळपिकांसह गहू, हरभरा, कांदा, मका पिकांचे नुकसान झाले. तसेच ढगाळ वातावरणामुळे किड-रोगांचा धोका वाढला आहे. 

2. भारताला युक्रेनकडून जवळपास ८० टक्के सूर्यफूल तेल पुरवठा होतो. देशातील उत्पादन खूपच कमीये. मात्र युध्दामुळे सध्या सूर्यफूल तेल पुरवठा पुर्णपणे थांबलाय. देशात सध्या सूर्यफूल तेलाचा जो पुरवठा होत आहे तो युध्दापुर्वीचा साठाये. नवा माल देशात दाखल होत नाहीत. युक्रेनमधून तेलाची नवीन शिपमेंट होत नाहीये. आत्तापर्यंत सूर्यफूल तेलाच्या दरात जवळपास ४० टक्क्यांनी वाढ झालीये. पुरवठा कमी असल्याने तेलाचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. सूर्यफूल तेलाचा पुरवठा कमी झाल्यास इतर तेलाचा वापर वाढेल. त्यामुळे पुढील काळात सोयातेल आणि पामतेलाला मागणी वाढेल. परिणामी या तेलाचेही दर वाढण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केलीये. 

3. शेतीमालाचे घटते उत्पादन आणि युध्दामुळे कमोडिटी बाजारात तेजीये. अनेक देशांनी परिस्थिती लक्षात घेऊन निर्यातीवर निर्बंध आणले आहेत. पाम तेल उत्पादनात अग्रेसर इंडोनेशियाने निर्यात कमी करण्याचा निर्णय घेतलाय. तर युक्रेनने यापुर्वीच अत्यावश्यक मालाची निर्यात बंद केली. तसंच धान्य निर्यात मर्यादीत केली. आता सर्बियाने गहू, मका, मैदा आणि खाद्यतेल निर्यातीवर बंधनं आणली. तर हंगेरी देशाने सर्व प्रकारची धान्य निर्यात थांबविली. बुल्गारियानेही देशातील साठा वाढविण्यासाठी निर्यात बंद केली. यामुळे जागतिक अन्नधान्य बाजार तेजीत आलाय.

4. बांगलादेश भारतीय मालाचा मोठा ग्राहक. मात्र भारताप्रमाणंच बांगलादेशही खाद्यतेलासाठी आयातीवर अवलंबूनये. बांगलादेशची वार्षिक गरज २५ लाख टनांच्या दरम्यान असते. तर येथे केवळ ३ लाख टनांच्या दरम्यान उत्पादन होते. बांगलादेशात दरवर्षी जवळपास १८ लाख टन आयात होते. यात ११ लाख टन कच्चे पामतेल असते. मात्र मागील वर्षभरापासून पामतेलाचे दर तेजीत आहेत. परिणामी बांगलादेशच्या आयातीवर परिणाम होतोय. तसेच रशिया, युक्रेनमधील युध्दामुळे इतरही खाद्यतेलांचे दर वाढले. त्यामुळे आयात महाग होतेय. त्यामुळे यंदा बांगलादेशची खाद्यतेल आयात कमी होण्याचा अंदाये. 5. अमेरिकेच्या कृषी विभागानं अर्थात युएसडीएनं मार्च महिन्याचा अहवाल प्रसिध्द केलाय. या अहवालात जागतिक सोयाबीन उत्पादन घटण्याचा अंदाज व्यक्त केलाय. गेल्यावर्षीपेक्षा यंदा तब्बल १२५ लाख टनांनी सोयाबीन उत्पादन कमी होणारे, असं युएसडीएनं म्हटलंय. ब्राझील, अर्जेंटीना आणि पेरुग्वे या देशांत दहा वर्षांतील निच्चांकी उत्पादनाचा अंदाजये. या देशांत यंदा उत्पादन ९५ लाख टनांनी कमी राहिल. तर विशेष म्हणजे ब्राझीलमध्ये यंदा उत्पादन ७० लाख टनांनी कमी होईल. ब्राझील जगात सोयाबीन उत्पादन आणि निर्यातीत आघाडीवरे, हे तुम्हाला ठाऊक आहेच. त्यानंतर अर्जेंटीनातही सोयाबीन उत्पादन १५ लाख टनांनी कमी होण्याची शक्यताये. अर्जेंटीनात यंदा ४३५ लाख टन उत्पादनाचा अंदाये. तर पेरुग्वे देशातही उत्पादन १० लाख टनांनी कमी होणारे. येथील सोयाबीन उत्पादन ५३ लाख टनांवर स्थिरावण्याची शक्यताये. चीनची  सोयाबीन आयात ३० लाख टनांनी कमी राहिल. चीन  यंदा ९४० लाख टन सोयापेंड आयात करेल, असंही युएसडीएनं म्हटलंय. तर जागतिक सोयाबीनचा साठा ९०० लाख टनांच्या दरम्यान असल्याचं म्हटलंय. मागील हंगामात हा साठा १ हजार  लाख टनांवर होता. सोयातेलाचा व्यापारही यंदा ६४ लाख टनांनी कमी राहिल, असं म्हटलंय. परंतु सध्या युध्दामुळं सोयातेलाला मागणी वाढलीये. त्यातच जागतिक सोयाबीन उत्पादन घटलं. ब्राझील, अर्जेंटीना आणि पेरुग्वेतही सोयाबीन कमी झालं. अमेरिकेची लागवड सुरु व्हायची. म्हणजेच अमेरिकेचे पीक बाजारात यायला उशीर आहे. म्हणजेच पुढील काही दिवस तरी सोयाबीन भाव खाणार, हे नक्की.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com