Water Grid Project in Marathwada
Water Grid Project in Marathwada

मराठवाडा वॉटर ग्रीडसाठी हवंय राज्याचं सहकार्य !

मराठवाड्यातील पाण्याच्या दुर्भिक्षावर मात करण्यासाठी आजवर विविध प्रकारचे उपाय सुचवण्यात आले आहेत, त्यात मराठवाड्यासाठी वॉटर ग्रीडप्रकल्पही सुचवण्यात आलेला आहे. या वॉटर ग्रीड प्रकल्पाची चर्चा पुष्कळ झालीय पण हा प्रकल्प प्रत्यक्षात कधी येणार हे मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाहीय.

मराठवाड्यातील पाण्याच्या दुर्भिक्षावर मात करण्यासाठी आजवर विविध प्रकारचे उपाय सुचवण्यात आले आहेत, त्यात मराठवाड्यासाठी वॉटर ग्रीड प्रकल्पही (Water gird project) सुचवण्यात आलेला आहे. या वॉटर ग्रीड प्रकल्पाची चर्चा पुष्कळ झालीय पण हा प्रकल्प प्रत्यक्षात कधी येणार हे मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाहीय. 

आता इस्रायल येथील राष्ट्रीय जलव्यवस्थापन कंपनी महत्वाकांक्षी अशा मराठवाडा (Marathvada) वॉटर ग्रीड प्रकल्पासाठी बृहत आराखडा तयार करीत असल्याचं समोर आलंय.  कोरोनामुळे लांबणीवर पडलेला हा प्रकल्प पुनरुज्जीवित करण्यासाठी राज्य शासनाने इस्रायलच्या कंपनीस सहकार्य करावं, असं आवाहन इस्रायलच्या (Israel) अधिकाऱ्यांनी राज्य सरकारकडं केल्याचं समोर आले आहे. 

हेही वाचा- नदी कायापालटाचा महत्वाकांक्षी प्रकल्प

इस्रायलच्या एशिया व पॅसिफिक विभागाचे उपमहासंचालक (Deputy Director General of Israel for Asia and Pacific) राफाएल हर्पाज (Rafael Harpaz) सध्या भारत भेटीवर आले असून त्यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेतली. या भेटीत त्यांनी मराठवाडा वॉटर ग्रीडसाठी कंपनीकडून करण्यात आलेल्या आराखड्याची माहिती दिली, तसेच राज्य सरकारच्या सहकार्याने हा प्रकल्प कसा राबवता येईल, यावरही प्राथमिक चर्चा केली. 

इस्रायलची राष्ट्रीय जलव्यवस्थापन कंपनी मराठवाड्याच्या वॉटर ग्रीड प्रकल्पावर काम करण्यास उत्सुक असून कंपनीनं त्यासाठीचा जल व्यवस्थापन आराखडाही तयार केला असल्याचं हर्पाज यांनी कोश्यारींना सांगितलंय. यावेळी इस्रायलचे मुंबईतील वाणिज्यदूत कोबी शोशानी (Kobbi Shoshani ) व राजकीय सल्लागार अनय जोगळेकर उपस्थित होते. 

इस्रायल येथे फार कमी पाऊस पडतो. मात्र सूक्ष्म जलव्यवस्थापनासाठी इस्रायल पूर्वीपासूनच प्रसिद्ध आहे. इस्रायल येथे मोठ्या प्रमाणावर खाऱ्या पाण्याचे निःक्षारीकरण केले जाते तसेच वापरलेल्या पाण्यापैकी ८५ टक्के पाण्यावर पुनर्प्रक्रिया केली जाते. त्यामुळे आज आपला देश पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्णच नाही तर जॉर्डनला देखील पाणी निर्यात करीत असल्याचे सांगताना राफाएल हर्पाज यांनी मराठवाड्यातही हे शक्य असल्याचा विश्वास कोश्यारी यांच्याकडे व्यक्त केला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com