पुणे : प्रत्येक भारतीयांच्या स्वयंपाकघरात हमखास सापडणार औषधी पदार्थ म्हणजे हळद! (Turmeric) शरीरावरील जखमेपासून ते त्वचेच्या सौंदर्यासाठी हळद वर्षानुवर्षे वापरण्यात येते. आयुर्वेदात (Aurveda) महत्त्वाचे स्थान असलेल्या हळदीला आधुनिक विज्ञानाच्या (Science) कसोटीवर खरे उतरण्यासाठी जनुकीय क्रमनिर्धारण आवश्यक होते. ती गरज आता भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था भोपाळच्या (IISER) शास्त्रज्ञांनी पूर्ण केली आहे. प्रथमच हळदीच्या डिएनएमधील ५० हजार ४०१ जनुकांचे क्रमनिर्धारण शास्त्रज्ञांनी पूर्ण केले आहे.
हळदीचे जगातील हे पहिले जनुकीय क्रमनिर्धारण (Genome Sequencing) असल्याचे आयसर भोपाळचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. विनीत शर्मा यांनी सांगितले. त्यांच्या नेतृत्वात श्रुती महाजन, अभिषेक चक्रवर्ती, शुभम जैस्वाल यांनी हे संशोधन केले आहे. या आधी गुळवेलाचेही जनुकीय क्रमनिर्धारण या गटाने केले होते. नेचरच्या कम्युनिकेशन बायॉलॉजी या शोधपत्रिकेत या संबंधीचा शोधनिबंध प्रकाशित झाला आहे. हळदीचे आयुर्वेदिक फायदे शास्त्रीय आधारावर सिद्ध करण्यासाठी या संशोधनाचा मोठा फायदा होणार आहे.
जनुकीय क्रमनिर्धारेची वैशिष्ट्ये - जगात प्रथमच हळदीच्या १७ प्रजातींचे जनुकीय क्रमनिर्धारण पूर्ण - १.०२ अब्ज बेस पेअर ज्यामध्ये १९ हजार ४७४ जनुकांचे निर्धारण करण्यात आले - दुय्यम चयापचय, पेशीतील संदेश यंत्रणा आणि जैविक व अजैविक क्रियांतून जनुकांची उत्क्रांती उलगडण्यास मदत - हळदीमधील प्रमुख औषधी संयुग ‘कर्क्यूमिनॉइड्स’च्या निर्मिती करणारे प्रमुख एन्झाईमची आनुवंशिक संरचना स्पष्ट झाली.
हे देखिल पहा-
संशोधनाचे फायदे - उत्तम प्रतीचे आयुर्वेदिक गुणधर्माच्या प्रजातींची निवड करता येईल - हळदीचे उत्पादन आणि आयुर्वेदिक मूल्य वाढविण्यासाठी संशोधनात उपयोगी - विविध रोगांवरील हळदीचा उपयोग वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध करता येईल - हळदीपासूनच्या दर्जेदार औषधांची निर्मिती आणि परिणामकारकता तपासता येणार
आयुर्वेदातील हळदीचा वापर शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढते, रक्त शुद्ध होते, त्वचेचा रंग उजळतो, ही जंतुनाशक आहे. ह्रदविकार,मधुमेह,कर्करोग,मेंदूचे विकार होण्यापासून प्रतिबंध होतो.पचनक्रिया सुधारते. त्याच प्रमाणे दुधामध्ये हळद टाकून घेतल्या नंतर रोगप्रतिकार शक्ती वाढते. जखम झाल्यास त्यावर हळद लावली असता रक्तस्राव बंद होतो.
आमच्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की हळदीतील अनेक जनुके पर्यावरणीय ताणतणावांना प्रतिसाद म्हणून विकसित झाली आहेत. हळदीच्या जनुकीय क्रमनिर्धारणामुळे औषधनिर्माणशास्रातील संशोधनाला मोठी चालना मिळेल. - डॉ. विनीत शर्मा, सहयोगी प्राध्यापक, आयसर भोपाळ
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.