सुमीमधून हजारो जण बसमधून शहराबाहेर

रशियन सैनिकांच्या बाँबवर्षावामुळे(Bombardment) नागरिकांना सुरक्षित मार्ग उपलब्ध करून देण्याचे दोन प्रयत्न फसले होते. हल्ला न करण्याचे आश्‍वासन देऊनही रशियाने गोळीबार आणि तोफगोळ्यांचा मारा केल्याने नागरिकांना शहराबाहेर पडता आले नव्हते.
Moripole
Moripole

लव्हिव : युद्धग्रस्त युक्रेनमधून नागरिकांना बाहेर पडण्यासाठी सुरक्षित मार्ग उपलब्ध झाल्याने आज मोठ्या संख्येने नागरिकांनी शेजारील देशांकडे धाव घेतली. मोठ्या संख्येने भारतीय असलेल्या सुमी शहरातून नागरिकांसाठी बस तैनात करण्यात आल्या होत्या. या बस निर्धोकपणे दक्षिणेकडील मॉरिपोल शहराच्या दिशेने गेल्या.  

रशियन सैनिकांच्या बाँबवर्षावामुळे(Bombardment) नागरिकांना सुरक्षित मार्ग उपलब्ध करून देण्याचे दोन प्रयत्न फसले होते. हल्ला न करण्याचे आश्‍वासन देऊनही रशियाने गोळीबार आणि तोफगोळ्यांचा मारा केल्याने नागरिकांना शहराबाहेर पडता आले नव्हते. शांतता चर्चेच्या तिसऱ्या फेरीनंतर मात्र रशियाने(Russia) सुरक्षित मार्ग उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली. सुरुवात म्हणून आज सुमी शहरातून अनेक बसमधून नागरिक दक्षिण किनाऱ्यावरील मॉरीपोल(Moripole) या शहराकडे रवाना झाल्या. या बसवर रेडक्रॉस संघटनचे चिन्ह लावण्यात आले होते. सुमी शहरात सातशे भारतीय अडकून पडले आहेत. याच शहरातून बाहेर पडण्यासाठी सुरक्षित मार्ग उपलब्ध झाल्याने भारतीयांना दिलासा मिळाला आहे.

रशियाच्या आक्रमणानंतर युक्रेनमधून बाहेर पडणाऱ्यांची संख्या वीस लाखांवर गेली असल्याचे संयुक्त राष्ट्रांनी सांगितले. सुरक्षित मार्ग उपलब्ध झाल्याने त्यात वाढ होण्याची शक्यता आहे. सुमी शहराला ‘ग्रीन कॉरिडॉर’ उपलब्ध करून दिल्याचे युक्रेनच्या अधिकाऱ्यांनीही जाहीर केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com