NCP Foundation Day : शरद पवारांनी भाकरी फिरवली.. ; सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल यांच्या खांद्यावर राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षपदाची जबाबदारी

NCP New Working President : राष्ट्रवादीच्या २५ व्या वर्धापनदिना निमित्त आज दिल्लीत आयोजित कार्यक्रमात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नवीन पदाधिकाऱ्यांची निवड केली
Sharad Pawar
Sharad PawarAgrowon
Published on: 
Updated on: 

Sharad Pawar Announcement : राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाच्या २५ व्या वर्धापनदिनानिमित्त नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात खा. शरद पवार यांनी आज प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांच्या खांद्यावर कार्यकारी अध्यक्षाची जबाबदारी देण्यात आल्याची घोषणा केली.

Sharad Pawar
Sharad Pawar News : शरद पवारांचा अध्यक्षपदाचा राजीनामा निवड समितीने फेटळला

मागील महिन्यात लोक माझे सांगती या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. पवारांच्या निर्णयामुळे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना धक्का बसला. त्यानंतर सर्वांनी मनधरणी केल्यानंतर शरद पवारांनी राजीनाम्याचा निर्णय मागे घेतला. तेव्हापासून राष्ट्रवादीचे नेतृत्व कोण करणार अशी चर्चा रंगत होती.

शरद पवार यांनी आज ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांची कार्याध्यक्ष पदावर निवड करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. यावेळी व्यासपीठावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, छगन भुजबळ, खा. सुनील तटकरे, आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह ज्येष्ठ नेते उपस्थित होते.

Sharad Pawar
Sharad Pawar Update : शरद पवार यांच्या गुगलीमुळे राष्ट्रवादीचा खुंटा बळकट होणार?

कार्यकारी अध्यक्षपदासह सुप्रिया सुळे यांच्या महाराष्ट्र, हरियाणा आणि पंजाब या राज्यांच्या प्रभारी पदाची निवड करण्यात आली. तर प्रफुल्ल पटेल यांच्यावर मध्यप्रदेश, गोवा आणि गुजरात या राज्यांमध्ये पक्ष विस्ताराची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच जितेंद्र आव्हाड आणि सुनील तटकरे यांची राष्ट्रीय सरचिटणीस पदी निवड करण्यात आली. त्यांच्यावर ओडिसा, पश्चिम बंगाल यांची जबाबदारी देण्यात आली आहे

वर्धापन दिन कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांनी भाजपवर हल्ला चढवला. दहा वर्षांपूर्वी भाजप मोठमोठी आश्वासन देऊन सत्तेवर आले. पंरतु आज देशातील सर्व समाज घटकांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे देशात सत्ता बदलाचे स्थिती आहे. यासाठी विविध विचारांच्या पक्षांनी किमान समान कार्यक्रम ठरवून एकत्र आले पाहिजे. भाजपला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी आवश्यक ते सर्व काम आगामी काळात राष्ट्रवादी करणार असल्याचे पवारांनी सांगितले.

या निर्णयानंतर नवी दिल्लीतील राष्ट्रवादीच्या कार्यालयबाहेर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. कार्याध्यक्ष पदाच्या निवडीनंतर प्रफुल्ल पटेल यांनी आनंद व्यक्त केली. 'पक्ष स्थापनेपासून विविध भूमिका पार पडल्या आहेत. माझ्यावर शरद पवारांनी दाखवलेला विश्वास साथ ठरवण्याचा काम करणार आहे. तसेच पक्ष वाढवून पुन्हा राष्ट्रीय दर्जा मिळण्यासाठी काम करणार आहे', अशी प्रतिक्रिया प्रफुल्ल पटेल यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.