युक्रेनमधील सूर्यफूल गाळप प्लांट्स ठप्प

युद्धाचा केवळ उद्योगांवरच परिणाम झाला, असं नाही. तर शेतीलाही याचा फटका बसतोय. याची चर्चा होत नसली तरी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आणि होणार आहे. युध्द असेच दोन किंवा तीन आठवडे सुरु राहिल्यास याचा पेरणीवर परिणाम होऊ शकतो.
Untitled design (60).png
Untitled design (60).png

पुणेः भारत सूर्यफूल तेलासाठी युक्रेनवर अवलंबून आहे. मात्र युद्धामुळे येथील सूर्यफूल गाळप प्लांट्स ठप्प आहेत. त्यामुळे सूर्यफूल तेल पुढील कळात मिळणे कठिण होईल. तसेच येथे एप्रिलपासून सुरु होणाऱ्या सूर्यफूल लागवडीवर युध्दाचा परिणाम होऊ शकतो, असं जाणकारांनी सांगितले. रशिया आण युक्रेनचे युद्ध नवव्या दिवशीही सुरु होते. यामुळं युक्रेनमधील(Ukraine) जनजिवनावर परिणाम तर झालाच. शिवाय युक्रेनमधील सूर्यफूल तेल पुरवठा साखळी विस्कळीत झाली. युक्रेन सूर्यफूल तेल(Sunflower oil) उत्पादनात जगात आघाडीवर आहे. युक्रेनमधील शहरे, बंदरे आणि वाहतुकीचे मार्ग बंद आहेत. त्यामुळे आधीच कच्चे तेल, गॅस आणि शेतीमालाचे दर वाढले आहेत. युक्रेनमधील खारकीव आणि लूहान्स्क(Luhansk) या भागात सूर्यफूलाची साठवण अधिक आहे. मात्र या भागात नेमकं रशियाचं सैन्य पोचलं. त्यामुळं येथील गोदामातून सूर्यफूलाची  गाळप प्लांट्सपर्यंत वाहतूक शक्य नाही. कारण रेल्वे आणि रस्ते बंद आहेत. परिणामी युक्रेनमधील सूर्यफूल गाळप आणि तेल उद्योग पुर्णपणे ठप्प झाला. यामुळे तेल उपलब्ध होणार नाही.

हे हि पहा :  युक्रेनच्या निकोलायव, चोरनोमोर्स्क, निप्रो, ओडेस्सा, खेरसन आणि युझनी या बंदरांवरून सूर्यफूल निर्यात होते. काळा समुद्र प्रदेशातून निर्यातीसाठीसुध्दा ही बंदरे महत्वाची आहेत. याच बंदवरांवरून सूर्यफूल तेल भारत, युरोपियन युनियन आणि मध्य आशियातील देशांत पाठवले जाते. मात्र युद्धामुळे ही सर्व बंदरे बंद आहेत.

युद्धाचा केवळ उद्योगांवरच परिणाम झाला, असं नाही. तर शेतीलाही याचा फटका बसतोय. याची चर्चा होत नसली तरी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आणि होणार आहे. युध्द असेच दोन किंवा तीन आठवडे सुरु राहिल्यास याचा पेरणीवर परिणाम होऊ शकतो. पुढील महिन्यापासून सूर्यफूल लागवड सुरु होईल. युक्रेनमध्ये एप्रिल आणि मे महिन्यात सूर्यफुलाची लागवड केली जाते. तर साधारणपणे सप्टेंबर महिन्यात काढणी होते. परंतु ग्रामिण भागासह शेतशिवारांतही युध्द सुरु असल्याने परिस्थिती तणावपूर्ण आहे. त्यामुळे लागवडीसाठी खते आणि बियाणे मिळेल कि नाही, हे सांगता येत नाही. परिणामी लागवड कमी होण्याची शक्यता आहे. तसेच रशियाने हा भाग ताब्यात घेतल्यास लागवड कमी होईल, असे जाणकारांनी सांगितले. असे झाल्यास जागतिक खाद्यतेल बाजाराला मोठा हादरा बसू शकतो. ………… युक्रेनमधील सूर्यफूल लागवड युक्रेनच्या कृषी विभागाच्या मते, २०२०-२१ मध्ये देशात ६५ लाख हेक्टरवर सूर्यफूल लागवड होती. निप्रॉपेट्रोव्स्क, किरोवोह्राड, खारकिव, झापोरिझिया, निकोलायव, लुहान्स्क, ओडेस्सा आणि पोल्टावामध्ये अधिक पीक होते. या भागात देशाच्या ६२ टक्के उत्पादन घेतले जाते. गोदामांपासून गाळप प्लांट्सपर्यंत सूर्यफुलाची वाहतुक रेल्वे आणि रस्तेमार्गे होते. मात्र युद्धामुळे हे मार्ग बंद झाले. येथील प्रक्रिया प्लांट्सनी फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात खेरदी करार केले. मात्र सध्या किती खरेदी झाली हे सांगणे कठिण आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com