हरियाणातील गारपीटग्रस्तांना मिळणार नुकसानभरपाई

२५ आणि २६ फेब्रुवारी रोजी राज्यातील काही जिल्ह्यांत गारपीट झाल्याचे (crop loss due to hailstorm) वृत्त असून या गारप्रितीने गारपिटीने बऱ्याच पिकांचे नुकसान झाल्याचे सांगताना खट्टर यांनी नुकसानीच्या पंचनाम्याचे काम १ मार्चपासून सुरु करण्यात आल्याची माहिती दिली आहे.
crop damaged due to hailstorm
crop damaged due to hailstorm

फेब्रुवारी महिन्यात झालेल्या गारपिटीमुळे हरियाणातील (Haryana) बऱ्याच जिल्ह्यांतील पिकांचे नुकसान झालं असून १ मार्चपासून गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्याचे सुरु करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर (Manohar Lal Khattar) यांनी शनिवारी (दिनांक ५ मार्च) दिलीय. 

आमदार बलराज कुंडू  (Balraj Kundu) यांनी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Budget session Haryana 2022) गारपिटीने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या  उपस्थित केला. त्याला लेखी उत्तर देताना मुख्यमंत्री खट्टर यांनी सभागृहात ही माहिती दिलीय.

२५ आणि २६ फेब्रुवारी रोजी राज्यातील काही जिल्ह्यांत गारपीट झाल्याचे (crop loss due to hailstorm) वृत्त असून या गारप्रितीने गारपिटीने बऱ्याच पिकांचे नुकसान झाल्याचे सांगताना खट्टर यांनी नुकसानीच्या पंचनाम्याचे काम १ मार्चपासून सुरु करण्यात आल्याची माहिती दिली आहे. 

व्हिडीओ पहा-   

गारपिटीने शेतकऱ्यांच्या शेतातील उभ्या पिकांचे नुकसान झाल्याची दखल घेत विशेष पंचनाम्याची  (special girdawari) मोहीम हाती घेतल्याचेही खट्टर म्हणालेत. 

याशिवाय गेल्या खरीप हंगामात अवकाळीमुळे शेतात पाणी साचल्यामुळे ज्यांच्या पेरण्या लांबल्या आहेत, अशा शेतकऱ्यांनाही नुकसानभरपाई देण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री दुष्यन्त चौटाला यांनी सभागृहात दिली आहे. येत्या १५ मार्चपर्यंत संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात ही नुकसानभरपाईची रक्कम जमा करण्यात येणार आहे.  

यापूर्वी अतिवृष्टी, गारपीट आणि अवकाळी पावसाने ऊस, कापूस, भातपीक, मुग, बाजरी या पिकांचे नुकसान झालेले आहे, अशा सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले असून १२ जिल्ह्यांतील ९,१४,१३९ शेतकऱ्यांच्या खात्यांत ५६१. ११ कोटी रुपये जमा करण्यात आले असल्याचेही माहिती राज्याचे महसूल व आपत्ती व्यवस्थापन मंत्री चौटाला यांनी सांगितले आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com