कापड उद्योगाला जाणवते कापूस टंचाई

सध्या बाजारात येणाऱ्या मालात गुणवत्तापूर्ण कापूस कमी आहे. याचाही फटका सूतगिरण्यांना बसत आहे. देशातील कापड उद्योगाला कापसाची टंचाई जाणवत आहे, असे कापड उद्योगाचं म्हणणं आहे. सध्या कापूस स्थिर आहेत. देशभरात सध्या कापसाला ८ हजार ते १० हजार ५०० रुपये दर मिळत आहे.
shortage of cotton in cotton industry
shortage of cotton in cotton industry

पुणेः सध्या बाजारात येणाऱ्या मालात गुणवत्तापूर्ण कापूस कमी आहे. याचाही फटका सूतगिरण्यांना बसत आहे. देशातील कापड उद्योगाला कापसाची टंचाई जाणवत आहे, असे कापड उद्योगाचं (cotton industry) म्हणणं आहे. सध्या कापूस स्थिर आहेत. देशभरात सध्या कापसाला ८ हजार ते १० हजार ५०० रुपये दर मिळत आहे. हेही पाहा-  Cotton Rate 2022 मध्ये तेजीत राहण्याचा अंदाज

देशात सध्या कापसाचे दर तेजीत आहेत. मात्र बाजारात येणाऱ्या मालात गुणवत्तापुर्ण कापूस कमी आहे. यंदा बाजारातील कापूस (cotton) आवक घटली. गेल्यावर्षीपेक्षा यंदा राजकोट बाजारातील आवक ७५ हजार कापूस गाठींनी कमी झाली. मात्र कमीआवकेपेक्षा खरी भीती गुणवत्तेची आहे. कापसाच्या गुणवत्तेत मोठा बदल झाला. कमी गुणवत्तेचा कापूस जास्त विक्रीसाठी येत आहे, असे जिनिंगच्या (Ginning) सूत्रांनी सांगितले. सुतगिरण्यांच्या मालकांनी सांगितले की, कापूस कमी गुणवत्तेचा आहे. परिणामी कचरा जास्त येत आहे. याचा परिणाम सुतगिरण्यांच्या व्यवसायावर होत आहे. यापूर्वी एक क्विंटल कापसात ७५ टक्क्यांपर्यंत सूत निघत होते. मात्र यंदा कवडीयुक्त आणि कचरा असलेल्या कापूस जास्त आहे. त्यामुळे यंदा केवल ७० टक्क्यांपर्यंत सूत मिळत आहे.  तर तब्बल ३० टक्के माल कटरा निघत आहे. कचऱ्याचे प्रमाण यंदा पाच टक्क्यांनी वाढले. 

सध्या देशभरात कापासाला ८ हजार ते १० हजार ५०० रुपयांच्या दरम्या दर मिळत आहे. महाराष्ट्रासह (Maharashtra) राजस्थान (Rajsthan), गुजरात आणि पंजाबमध्ये हा दर शेतकऱ्यांना मिळत आहे. दर अधिक असूनही बाजारात कापसाची आवक कमीच दिसते. तर कापूस खंडीचे भाव ७५ हजार ते ७९ हजार रुपयांच्या दरम्यान आहेत. तर मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (multi commodity exchanger) मार्चचे वायदे ३८ हजार ३३० रुपयांवर झाले. तर एप्रिल महिन्याचे वायदे ३८ हजार ८३० रुपये प्रतिगाठीने झाले. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर कापूस दरात गुरुवारी काहीशी सुधारणा झाली होती. 

कोरोनानंतर जागतिक बाजारात कापसाची मोठी टंचाई निर्माण झाली होती. त्यामुळे कापासाला मागणी आल्या. देशातील बाजारापेक्षा आंतरराष्ट्रीय बाजारात दर अधिक होते. त्यामुळे देशातून निर्यात झाली. यंदाच्या हंगामातील निर्यात अधिक होती. परिणामी देशात सध्या कमी कापूस उपलब्ध आहे. बाजारात कापसाचे दर वाढले तरी कापूस आवक वाढत नाही. यामुळे देशातील कापूस उत्पादन कमी असल्याचे जाणकारांनी सांगितले. सध्या उद्योगाला कापूस टंचाई जाणवत आहे. देशातील कापूस खंडीचे दर किमान ७० हजार आणि कमाल ८० हजारांच्या दरम्यान आहेत. गुवत्तेनुसार कापसाचे दर ठरत आहेत. चांगल्या गुणवत्तेच्या कापसासाठी अधिक दर द्यावा लागत आहे.   

देशात कापसाची टंचाई जाणवत आहे. त्यामुळे उद्योगाला अडचणी येत आहेत. त्यामुळे शुल्करहित कापूस आयात करावी, अशी मागणी सरकारकडे करत आहेत. सरकार आयातीबाबत अनुकूल असू शकते, असे उद्योगाच्या सूत्रांनी सांगितले. असे असले तरी देशातील कापूस दर मागील काही दिवसांपासून स्थिर आहेत. दर कमी झाले नाही. मात्र दरातील तेजी थांबली. त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊन कापूस विक्री करावी, असे आवाहन जाणकारांनी केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com