बिगर बासमती तांदूळ निर्यातीला सरकारी खरेदीचा फटका

आफ्रिकेकडून आतापर्यंत भारतीय तांदळालाच प्राधान्य देण्यात आलेले आहे. जर व्हिएतनाम आणि थायलंडने दरकपातीचा निर्णय घेतला तर मात्र तांदूळ निर्यातीतील भारताची वाटचाल खंडीत होऊ शकते, अशी शक्यता सागर आणि राव यांनी व्यक्त केली आहे.
rice export
rice export

सार्वजनिक वितरणासाठी केंद्र सरकारकडून होणाऱ्या परबॉइल्ड राईसच्या खरेदीमुळे या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारताच्या बिगरबासमती तांदळाची निर्यात प्रभावित झाली आहे.

देशांतर्गत खरेदीचे प्रमाण वाढल्यामुळे परबॉइल्ड तांदळाचे (Parboiled rice) दर प्रति टन १५०० ते २२२५ पर्यंत वाढला आहे. याखेरीज खरेदी यंत्रणांकडून (procurement agencies)पॅनिक बाईंगही करण्यात येत असल्याची माहिती बल्क लॉजिक्सचे संचालक व्ही.आर.सागर यांनी दिली आहे. नागपूर आणि छत्तीसगड आदी मध्य भारतात अशी पॅनिक बाईंग होत आहे. 

व्यापारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सरकार छत्तीसगड आणि बिहारमध्ये सार्वजनिक वितरणासाठी मोठ्या प्रमाणात परबॉइल्ड राईस (Parboiled rice) खरेदी करत आहे. छत्तीसगडमधून हा तांदूळ बिहारमध्ये वाहून नेता येणे सहजशक्य आहे. नोव्हेंबर- डिसेंबर २०२३ पर्यंत पुरु शकेल एवढ्या मुबलक प्रमाणात परबॉइल्ड राईसचा साठा सार्वजनिक वितरणासाठी म्हणून करण्यात आला असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

कोरोना व्हायरसच्या ओमिक्रोनच्या (Omicron variant ) वाढत्या प्रादुर्भावाची पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून परबॉइल्ड राईसची (Parboiled rice) मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात आली आहे. कारण बिहार आणि छत्तीसगड या राज्यांतील  लॉकडाऊनच्या शक्यतेचा विचार करून मुबलक साठा करण्यात आला आहे. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेच्या ( PM Garib Kalyan Anna Yojana) माध्यमातून २०२० साली गरीब कुटुंबियांना सार्वजनिक वितरण यंत्रणेच्या माध्यमातून सरकारकडून परबॉइल्ड राईस (Parboiled rice) उपलब्ध करून दिला होतो. त्यानंतर कोरोनाकाळातही सरकारकडून गरजू नागरिकांना त्याचे वाटप करण्यात येत आहे. 

दि राईस एक्सपोर्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष बी.व्ही. कृष्ण राव यांच्यामते, यंदा गैर बासमती तांदळाच्या निर्यातीची अवस्था मागील दोन वर्षांसारखीच राहिलेली आहे. बिगरबासमती तांदळाच्या निर्यातीचे चित्र फारसे आशादायक नाही. तांदूळ निर्यातदारांच्यामते, भारतीय तांदूळ निर्यातदारांना सध्या व्हिएतनाम, थायलंड, म्यानमार आणि पाकिस्तानशी स्पर्धा करावी लागत असल्यामुळे मनाजोगते दर मिळत नाहीत.  

आंतरराष्ट्रीय धान्य परिषदेच्यामते, बाजारात तांदळाच्या मुबलक उपलब्धतेमुळे भारतीय तांदळाचे दर १० टक्क्यांनी उतरले आहेत. थायलंड आणि व्हिएतनामच्या तांदळाच्या किंमती २० टक्क्यांनी घसरल्या आहेत.  

भारताच्या २५ टक्के नियमित तांदळाला ३६० डॉलर्स असा दर तर परबॉइल्ड तांदळाचा दर ३७५ डॉलर्स असा आहे. त्यातुलनेत थायलंडच्या ५ टक्के नियमित तांदळाला ३९८ डॉलर्स एवढा दर मिळाला आहे. तर व्हिएतनामच्या याच दर्जाच्या तांदळाला ३९० डॉलर्सचा दर मिळाला आहे.  

राव यांच्यामते, यंदा आम्हाला निर्यातीसाठी म्यानमारसोबत तीव्र स्पर्धा करावी लागत आहे. गेल्या दोन वर्षात या स्पर्धेत म्यानमार नव्हता. अगदी मलेशियासुद्धा सध्या पाकिस्तानकडून तांदूळ खरेदी करत आहे. पाकिस्तानकडून दर वाढवण्यात आल्यावर मलेशिया भारताकडून खरेदी करेल, अशी अपेक्षा आहे. 

व्हिएतनाम आणि इंडोनेशियाकडून भारतीय तांदळासाठी विचारणा होत नसतानाही तरीही भारताच्या नियमित बिगरबसमती तांदूळ आव्हान टिकवून आहे. कारण हा तांदूळ प्राधान्याने चीनकडून पशुखाद्यासाठी म्हणून खरेदी केला जातो. भारताचा शंभर टक्के तुकडा तांदूळ चीनकडून खरेदी करण्यात येत असल्याची माहिती  व्ही.आर.सागर यांनी दिली आहे.    

पहिल्या तिमाहीचा अपवाद वगळता भारतीय निर्यातदार त्यानंतरच्या हंगामात चांगली कामगिरी करतील, अस विश्वास निर्यातदारांकडून व्यक्त करण्यात येत आहे. आफ्रिकेकडून आतापर्यंत भारतीय तांदळालाच प्राधान्य देण्यात आलेले आहे. जर व्हिएतनाम आणि थायलंडने दरकपातीचा निर्णय घेतला तर मात्र तांदूळ निर्यातीतील भारताची वाटचाल खंडीत होऊ शकते, अशी शक्यता सागर आणि राव यांनी व्यक्त केली आहे. 

भारताची तांदूळ निर्यात गेल्या काही वर्षांच्यातुलनेत स्थिर असल्याचे सागर यांनी नमूद केले तर राव यांच्यामते भारताची तांदूळ निर्यात १६ दशलक्ष टनांच्या जवळपास असेल. २०१९-२०२० दरम्यान भारताने ५.०४ दशलक्ष टन तांदूळ निर्यात केली होती. २०२०-२०२१ दरम्यान भारताची तांदूळ निर्यात १३.०९ दशलक्ष टनांवर गेली.  चालू आर्थिक वर्षातील पहिल्या सात महिन्यात तांदळाची निर्यात ९६३ दशलक्ष टनांवर गेली आहे.     

दरम्यान निर्यातीत फारसे आशादायक चित्र नसले तरी उत्पादनात मात्र सातत्याने वाढ होत आहे. २०२९-२०२० साली भारताचे तांदूळ उत्पादन ११८.१७ मेट्रिक टन होते.  २०२०-२०२१ दरम्यान हे प्रमाण १२२.२७ मेट्रिक टन होते. यंदा जूनपर्यंत खरीपात १०७.०४ मेट्रिक टन तांदूळ उत्पादनाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com