भारताकडून विक्रमी १ लाख टन अमेरिकन सोया तेलाची खरेदी

भारतीय व्यापाऱ्यांनी अमेरिकेतून विक्रमी १ लाख टन सोयाबीन तेल आयातीसाठी करार केले आहेत. दक्षिण अमेरिकेतील देशांमध्ये पडलेल्या दुष्काळामुळे पुरवठ्यावर ताण आला आहे. शिवाय पाम तेलाच्या किमतीही वाढल्या आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांनी अमेरिकेकडून सोयातेल आयातीला पसंती दिल्याचे वृत्त रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिले आहे.
Soyoil Import
Soyoil Import

भारतीय व्यापाऱ्यांनी (Indian Trader) अमेरिकेतून विक्रमी १ लाख टन सोयाबीन तेल आयातीसाठी (SoyOil Import) करार केले आहेत. दक्षिण अमेरिकेतील देशांमध्ये पडलेल्या दुष्काळामुळे पुरवठ्यावर ताण आला आहे. शिवाय पाम तेलाच्या किमतीही (Price Of Palm Oil) वाढल्या आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांनी अमेरिकेकडून सोयातेल आयातीला (Import Of SoyOil) पसंती दिल्याचे वृत्त रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिले आहे.

अमेरिकेतून जास्त खरेदी केल्याने तिथल्या सोयातेलाच्या किमतींना आधार मिळण्याची शक्यता आहे. ज्या यावर्षी २० टक्क्यांनी वधारल्या असून दशकातील सर्वोच्च पातळीच्या जवळ पोहोचल्या आहेत. जगातील सर्वात मोठा खाद्यतेल आयातदार (Edible OIl Importer) असलेला भारत सहसा अर्जेंटीना (Argentina) आणि ब्राझीलमधून (Brazil) सोयातेलाची  खरेदी करतो. परंतु या दोन प्रमुख निर्यातदार देशांमध्ये सोयाबीन उत्पादन कमी झाल्यामुळे भारतीय व्यापाऱ्यांना अमेरिकेकडे जाण्याशिवाय पर्याय नव्हता, असे व्यापाऱ्यांनी रॉयटर्सला सांगितले.

"अमेरिकेतील सोयातेलाचे दर आकर्षक होते. तर दुसरीकडे दक्षिण अमेरिकन देशांमध्ये पुरवठा मर्यादित होता. परिणामी, भारतीय खरेदीदारांनी अमेरिकन सोयातेलाची खेरदी केली," असे एका जागतिक ट्रेडींग फर्मच्या भारतातील प्रमुखाने रॉयटर्सला सांगितले. तसेच, येत्या काही दिवसांमध्ये आणखी दोन जहाज सोयातेल खरेदी करणार असल्याचेही ते म्हणाले.

भारताला लागणाऱ्या तेलापैकी साधारणतः दोन तृतीयांश सोयातेल अर्जेंटिनाकडून आणि उर्वरित ब्राझीलकडून मिळते. परंतु गेल्या हंगामात सोयाबीनचे उत्पादन कमी झाल्यामुळे अर्जेंटीनामधील तेलाच्या साठ्यावर ताण आलाय. त्यामुळे भारतीय खरेदीदारांना पर्याय शोधावे लागत आहेत. त्यात काळ्या समुद्राच्या आसपासच्या प्रदेशातून सूर्यफूल तेल खरेदी करावी लागत आहे.

सुर्यफुल तेल पाम आणि सोयातेलापेक्षा स्वस्त आहे. परंतु रशिया-युक्रेन यांच्यातील तणावामुळे काही खरेदीदार पुरवठ्याबाबत साशंक असल्याचे सनवीन ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप बजोरीया यांचे म्हणणे आहे.

कच्च्या सोयाबीन आणि सुर्यफूल तेलासाठी अनुक्रमे १६२० आणि १५१५ डॉलरच्या तुलनेत विमा आणि मालवाहतुकीसह भारतामध्ये शिपमेंटसाठी कच्च्या पाम तेलाचे दर प्रति टन १५७५ डॉलर इतके असल्याचे व्यापारी सांगतात. गेल्या महिन्यात पाम आणि सूर्यफूल तेलाच्या तुलनेत सोयातेल स्वस्त होते, परंतु सोयातेलाच्या मागणीत अचानक वाढ झाल्याने एका महिन्यात किमती 16 टक्क्यांनी वाढून 14 वर्षातील सर्वोच्च पातळीवर पोहोचल्याचे व्यापारी सांगतात.

आपल्या खाद्यतेलाच्या गरजेपैकी दोन तृतीयांश पाम तेलाची आयात भारताला प्रामुख्याने इंडोनेशिया आणि मलेशियामधून करावी लागते. परंतु इंडोनेशियाने पाम तेलाच्या निर्यातीवर निर्बंध घातले आहेत. त्यामुळे तेलाच्या किमती विक्रमीरित्या वाढल्या आणि खाद्यतेल बाजारात टंचाई निर्माण झाल्याचे मुंबईस्थित जागतिक ट्रेडींग फर्मच्या एका डिलरने सांगितले. ''खाद्यतेल आयातदार  दक्षिण अमेरिकेतील सोयातेलाला पर्याय शोधत होते. तेथील सोयाबीन उत्पादनात मोठी घट आहे,'' असेही डिलरने म्हटले आहे.

दरम्यान, या महिन्यात २०२१-२२ या हंगामात सोयाबीनचे उत्पादन १५० लाख टनांनी कमी होणार असल्याचा अंदाज ब्राझीलमधील कोनॅब या सरकारी संस्थेने वर्तविला आहे. सोयातेलाचा प्रमुख निर्यातदार असलेल्या अर्जेंटीनाच्या उत्पादनात ५० लाख टनांची घट झाली आहे. याशिवाय अर्जेंटिनाच्या पराना नदीची पाणी पातळी कमी झाल्यामुळे सोयाबीन वाहतूक करणारी जहाजे पूर्णपणे लोड करता येत नाहीत, ज्यामुळे जहाजांमधील माल ३० टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे.

दुसरीकडे बायडेन प्रशासनाने बायोफ्युएल मिश्रण कमी करण्याचा प्रस्ताव दिल्यानंतर अमेरिकेत मात्र सोयातेलाचा साठा शिल्लक राहू शकतो. भारत २०२१-२२ मध्ये अमेरिकेतून तब्बल १ लाख ६० हजार टन सोयातेलाची आयात करू शकतो, जी एका वर्षापूर्वी फक्त ३६ हजार टन होती. भारतीय व्यापाऱ्यांनी काळ्या समुद्राच्या प्रदेशातूनही ३० हजार टन सोयातेल आयातीचे करार केले आहेत. परंतु बंदरांमध्ये जहाजांची गर्दी असल्याने शिपमेंटला विलंब होत असल्याचं एका जागतिक व्यापारिक संस्थेच्या भारतातील प्रमुखाने सांगितले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com