पंतप्रधान मोदी करणार अर्थसंकल्पावर भाष्य 

अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलेल्या योजना, विविध क्षेत्राबद्दलच्या तरतुदींच्या पार्श्वभूमीवर विविध क्षेत्रांच्या समस्या, त्यावरील उपाय यावर या वेबिनारमध्ये सर्वांगाने चर्चा केली जाणार आहे. फायनान्सिंग फॉर ग्रोथ ॲस्पायरेशनल इकॉनॉमी ( Financing for growth and aspirational economy) या नावाने हे वेबिनार होणार आहे.
Financing for growth and aspirational economy
Financing for growth and aspirational economy

२०२२-२०२३ सालच्या अर्थसंकल्पातील घोषणांची प्रभावी व तत्काळ अंमलबजावणी करण्याच्या हेतूने केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडून या विषयावर उद्या (८ मार्च ) वेबिनार आयोजित करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi )या वेबिनारमध्ये संबोधित करणार आहेत.   

अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलेल्या योजना, विविध क्षेत्राबद्दलच्या तरतुदींच्या पार्श्वभूमीवर विविध क्षेत्रांच्या समस्या, त्यावरील उपाय यावर या वेबिनारमध्ये  सर्वांगाने चर्चा केली जाणार आहे. फायनान्सिंग फॉर ग्रोथ ॲस्पायरेशनल इकॉनॉमी ( Financing for growth and aspirational economy) या नावाने हे वेबिनार होणार आहे.

अर्थमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार,  निती आयोग, क्षमता निर्माण आयोग, केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण विभागासह १६ खात्यांचे मंत्री, सर्व राज्यांचे आणि केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधी  या वेबिनारमध्ये सहभागी होणार आहेत.  

सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील तज्ञ उद्योजक, विचारवंतांचाही सहभाग वेबिनारमद्ये असणार आहे. आरबीआय (Reserve Bank of India), सेबी (Securities and Exchange Board of India), नाबार्ड (National Bank for Agriculture and Rural Development), आयएफएससीए (International Financial Services Centres Authority),  आयआरडीएआय (Insurance Regulatory and Development Authority of India), गिफ्ट सिटी आणि उद्योग क्षेत्रातील अभ्यासकही या वेबिनारमध्ये सहभागी होणार आहेत. 

व्हिडीओ पहा- 

पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी वित्त पुरवठा, रोजगारनिर्मिती क्षेत्रासाठी वित्तपुरवठा, बँकिंग व वित्तीय क्षेत्रातील डिजिटल संधी, हवामान आणि शाश्वत विकास क्षेत्रासाठी वित्तपुरवठा, सौर ऊर्जा क्षेत्रासाठी वित्तपुरवठा अशा पाच सत्रांत हे वेबिनार होणार आहे. 

प्रत्येक घटकाच्या सहभागामुळे संबंधित क्षेत्रातील अनुभव आणि अभ्यासाचा आधार घेत त्या-त्या क्षेत्रातील निर्णयांच्या अंमलबजावणीचा कृती आराखडा साकारण्यात येणार असल्याचेही अर्थमंत्रालयाने निवेदनात नमूद करण्यात आले आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com