palm oil : पाम तेल तेजीत राहणार

इंडोनेशिया आणि मलेशियात शेतकऱ्यांनी खतांचा वापर कमी केल्यानंतर येथे २०१८ आणि २०१९ मध्ये पामची उत्पादकता घटली होती. अशीच परिस्थिती यंदा निर्माण होण्याची शक्यता आहे.
palm oil
palm oil
Published on
Updated on

पुणे ः खतांच्या वाढलेल्या किमती आणि मजूरांच्या टंचाईमुळे २०२२ मध्येही जागतिक पाम तेलाचे उत्पादन कमी राहण्याची शक्यता आहे. वाढलेल्या किमतीमुळे शेतकऱ्यांनी खतांचा वापर कमी केला. परिणामी यंदा उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाही पाम तेलाचे (palm oil) दर मजबूत राहील, असा अंदाज काऊन्सील ऑफ पाम ऑईल प्रोड्यूसिंग कंट्रीजने व्यक्त केला आहे.   नवीन वर्षात म्हणजेच २०२२ मध्ये जागतीक पाम तेलाचे उत्पादन आणि दराची काय स्थिती राहिल, याबाबत नुकतेच काऊन्सील ऑफ पाम ऑईल प्रोड्यूसिंग कंट्रीज अर्थात सीपीओपीसीच्या बैठकीत मंथन करण्यात आले. २०२१ च्या मध्यापासून नायट्रोजन आणि फाॅस्फेट खतांच्या किमतीत (fertilizers prices) तब्बल ५० ते ८० टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे लहान पाम उत्पादकांचा खर्च वाढला आहे. ते हा खर्च कमी करण्याला प्राधान्य देत आहेत. तर पामची लागवड करणाऱ्या संस्थांना या खतांचा पुरवठा करताना कसरत करावी लागत आहे. त्यातच दोन वर्षांपासून मजूरांची समस्या गंभीर बनली आहे. यामुळे यंदा मलेशिया (malesia) आणि इंडोनेशियात पाम तेल उत्पादनात जास्त उत्पादन होऊ शकणार नाही. परिणामी  असे सीपीओपीसीने म्हटले आहे. हे ही वाचा ः  सोयाबीन बाजार एका भावपातळीभोवती फिरतोय इंडोनेशिया आणि मलेशियात शेतकऱ्यांनी खतांचा वापर कमी केल्यानंतर येथे २०१८ आणि २०१९ मध्ये पामची उत्पादकता घटली होती. अशीच परिस्थिती यंदा निर्माण होण्याची शक्यता आहे. काय आहे दराचा अंदाज मागील काही महिन्यांपासून पाम तेलाचा पुरवठा कमी राहिल्याने दर तेजीत आहेत. सध्या पामतेलाचे दर ३१ टक्क्यांनी अधिक आहेत. सध्या जानेवारी आणि फेब्रुवारीचे वायदे ५ हजार २०० रिंगीट प्रतिटनांच्या पुढे गेले आहेत. यंदा पाम तेलाच्या उत्पादनात काहीशी वाढ होण्याची आशा असली तरी मात्र दर तेजीत राहण्याची शक्यता आहे. यंदा पाम तेलाचे दर १ हजार डाॅलर प्रतिटनांच्या दरम्यान राहतील, असेही सीपीओपीसीनं म्हटलंय. मागणी वाढण्याची शक्यता पाम तेलाची जागतीक मागणी २०२१-२२ च्या हंगामात वाढण्याची शक्यता आहे. चीनची अर्थव्यवस्था कोरोनानंतर उभारी घेत असल्यामुळे चीनची आयात वाढणार आहे. २०२०-२१ मध्ये चीनने ६८ लाख टन पाम तेल आयात केली होती, ती २०२१-२२ मध्ये ७२ लाख टनांवर पोचेल. सोबतच भारताची पामतेलाची आयातही ८५ लाख टनांवरून ८६ लाख टनांवर पोचण्याचा अंदाज आहे. तर युरोपियन देशांची आयात ६२ लाख टनांवरून ६९ लाख टनांवर पोचेल, असा अंदाजही सीपीओपीसीने व्यक्त केला आहे. भारतातील शेतकऱ्यांना लाभ मिळेल? जागतीक पाम उत्पादनात ८५ टक्क्यांपर्यंत वाटा असणाऱ्या देशांत उत्पादन वाढणार नाही, असे सीपीओपीसीचे म्हणणे आहे. भारतात गरजेच्या ६० टक्क्यांपर्यंत खाद्यतेलाची आयात होते. त्यात पामतेलाचा वाटा निम्म्यापेक्षा अधिक असतो. त्यामुळे पामतेलच्या दरात आंतरराष्ट्रीय बाजारात तेजी आल्यास त्याचा आधार देशांतर्गत तेलबिया दरालाही मिळू शकतो.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com