Market News: युक्रेनमध्ये सूर्यफूल पेरणी घटण्याचा अंदाज

युध्दात युक्रेनची होरपळ होत आहे. मात्र युक्रेनचे कृषिमंत्री ज्युलियन दोमिंग्वेझ यांनी देशात अन्नधान्याचा मुबलक साठा असल्याचे सांगितले. लवकरच देशात वसंत ऋतुतील पेरणी सुरु होईल. शेतकऱ्यांनी केवळ देशाला गरज असलेल्या पिकांचीच पेरणी करावी, असे आवाहनही दोमिंग्वेझ यांनी केले.
Sunflower
Sunflower

पुणेः युध्दामुळे युक्रेनमधील शेतीची कामे ठप्प आहेत. शेतीसह पूरक व्यवसायांनाही (Allied Activity) फटका बसतोय. त्यातच शेतकऱ्यांनी मका (Maize) आणि सूर्यफुलाची (Sunflower) पेरणी कमी करा आणि आवश्यक पिकांची पेरणी करावी, असे आवाहन सरकारने केले आहे. असे झाल्यास सूर्यफूल तेलासाठी युक्रेनवर अवलंबून असणाऱ्या भारतावर मोठा परिणाम होईल. खाद्यतेल टंचाई (Edible Oil Scarcity) भासेल आणि दर चढेच राहू शकतात, असे जाणकारांनी सांगितले. 

युध्दात युक्रेनची होरपळ होत आहे. मात्र युक्रेनचे कृषिमंत्री ज्युलियन दोमिंग्वेझ यांनी देशात अन्नधान्याचा मुबलक साठा असल्याचे सांगितले. लवकरच देशात वसंत ऋतुतील पेरणी सुरु होईल. शेतकऱ्यांनी केवळ देशाला गरज असलेल्या पिकांचीच पेरणी करावी, असे आवाहनही दोमिंग्वेझ यांनी केले. तसेच शेतकऱ्यांना मका आणि सूर्यफुलाची पेरणी कमी करून अन्नधान्याचे उत्पादन वाढण्यास सांगितले. कृषिमंत्र्यांच्या आवाहनानंतर अर्जेंटीनातील सूर्यफूल पेरणी कमी होण्याचा अंदाज आहे. जाणकारांच्या मते येथील सूर्यफूल आणि मका लागवड ३० टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकते. असे झाल्यास सूर्यफूल तेल कमी उपलब्ध होईल.  हे ही वाचाः खाद्याच्या दरवाढीमुळे पोल्ट्री उद्योग मेटाकुटीला

भारताला दरवर्षी दरवर्षी २२ ते २५ लाख टन सूर्यफूल तेलाची गरज असते. देशात केवळ ५० हजार टन उत्पादन होतं. बाकी सर्व सूर्यफूल तेल आयात केले जाते. भारत युक्रेनमधून जवळपास १९ लाख टन आयात होते. तर रशियातून ३.८ लाख टन आणि अर्जेंटीनातून २.८ लाख टन सूर्यफूल तेल आयात होते. यावरून सूर्यफूल तेलासाठी युक्रेनवरील भीस्त लक्षात येते. सध्या युध्दामुळे निर्यात थांबली तरी खाद्यतेल दराचा भडका उडाला.

युक्रेनच्या कृषी विभागानं दिलेल्या माहितीनुसार, युद्ध सुरु होण्याआधी देशात आवश्यकेच्या तुलनेत रासायनिक खतांची उपलब्धता ८४ टक्के होती. तर बियाणे ७८ टक्के उपलब्ध होते. सध्या युक्रेनमध्ये कृषी यंत्रांसाठी लागणाऱ्या इंधानाची मोठी टंचाई जाणवत आहे. सध्या युक्रेनमध्ये थंड वातावरण आहे. त्यामुळे वसंत ऋतुतील पेरणी एप्रिल ते मे या काळात करावी. तसेच पुढील काळात युद्धाची काय स्थिती राहील, यावर पेरणी अवलंबून राहील, असं जाणकारांनी सांगितलं.   

असं असलं तरी युध्दामुळे पेरणी अडचणीत आली आहे. सध्या युक्रेनचा बराच भाग रशियन सैन्याच्या ताब्यात आहे. युक्रेनची खेरसन, ओडेसा आणि मायकोलायव्ह या प्रांतातील एक तृतीयांश शेतजमीन युध्दाच्या छायेत आहेत. जवळपास सव्वा लाख हेक्टर शेती रशियन सैन्याच्या ताब्यातील क्षेत्रात आहे. हे ही वाचाः Soybean price: सोयाबीन दरात का होतेय सुधारणा

शेतीसह पुरक व्यवसायानांही युध्दाचा फटका बसतो आहे. यात पोल्ट्रीचे सर्वाधिक नुकसान झाले. खेरसन, ओडेसा आणि मायकोलायव्ह प्रांतातील पोल्ट्री उद्योग बंद पडला. जवळपास ३१ लाख पक्षी मरण पावले. याचा मोठा फटका येथील शेतकऱ्यांना बसला. 

युध्दाचे शेतीवरील परिणाम

  • खेरसन, ओडेसा, मायकोलायव्ह प्रांत रशियाच्या ताब्यात
  • एक तृतीयांश शेतजमीन युध्दाच्या छायेत
  • सव्वा लाख हेक्टर शेती रशियान सैन्याच्या ताब्यात
  • पोल्ट्रीचे सर्वाधिक नुकसान
  • युद्धामुळे पोल्ट्री उद्योग बंद 
  • ३१ लाख पक्षी मरण पावले
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com