सरकार स्थापनेचा मान यांचा दावा

आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र आपण राज्यपालांकडे सादर केले असून त्यांनी देखील ते स्वीकारले असल्याचे मान राजभवनाबाहेर पत्रकारांशी बोलताना म्हणाले. मान यांची शुक्रवारी ‘आप’च्या विधिमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली होती.
भगवंत मान
भगवंत मान

चंडीगड ः पंजाबमधील आम आदमी पक्षाचे नेते भगवंत मान यांनी राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांची भेट घेत सरकार स्थापनेचा दावा केला. आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र आपण राज्यपालांकडे सादर केले असून त्यांनी देखील ते स्वीकारले असल्याचे मान राजभवनाबाहेर पत्रकारांशी बोलताना म्हणाले. मान यांची शुक्रवारी ‘आप’च्या विधिमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली होती. थोर क्रांतिकारक भगतसिंग यांचे जन्मगाव असलेल्या खातकर कालन (जि. नवानशहर) येथे १६ मार्च रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास मान हे आपल्या निवडक सहकाऱ्यांसोबत मुख्यमंत्रिपदाची (Chief Minister)शपथ घेतील. मान यांनी या समारंभासाठी ‘आप’चे समन्वयक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री(Chief Minister of Delhi) अरविंद केजरीवाल यांनाही निमंत्रण दिले आहे.

सावंत गोव्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री

गोव्यामध्ये सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाला असून प्रमोद सावंत यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा राज्यपालांकडे सादर केला. सावंत यांनी आज दुपारीच राज्यपाल पी.एस.श्रीधरन पिल्लई यांची राजभवनामध्ये जाऊन भेट घेतली. नवे सरकार स्थापन होईपर्यंत सावंत हे गोव्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहतील. दरम्यान सरकार स्थापनेचा दावा नेमका कधी करायचा याची तारीख अद्याप ठरली नसल्याचे सावंत पत्रकारांशी बोलताना म्हणाले. तीन अपक्ष आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या दोन आमदारांना सोबत घेऊन भाजप राज्यात सरकार स्थापन करणार आहे.

‘यूपी’मध्ये होळीनंतर नवे सरकार

उत्तरप्रदेशात होळीनंतर सरकार स्थापन होण्याची चिन्हे आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे उद्या ( ता.१३) दिल्लीत येत असून ते येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष जे.पी.नड्डा यांची भेट घेतील. उत्तर प्रदेशातील यशानंतरचा हा योगींचा पहिलाच दिल्ली दौरा असल्याने भाजपनेही त्यांच्या स्वागतासाठी कंबर कसली आहे. योगी हे याच भेटीमध्ये मोदी आणि शहा यांना शपथविधीला उपस्थित राहण्याचे निमंत्रण देऊ शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली. दुसरीकडे समाजवादी पक्षाने देखील २१ मार्च रोजी नवनिर्वाचित आमदारांची बैठक बोलाविली असून यावेळी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव हे देखील मार्गदर्शन करतील

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com