Madhabi Puri Buch Appointed SEBI Chief
Madhabi Puri Buch Appointed SEBI Chief

माधबी पुरी बुच सेबीच्या पहिल्या महिला अध्यक्ष

भारतीय शेतमाल वायदे बाजार आणि भांडवली बाजाराची नियामक असलेल्या सेबीच्या अध्यक्षपदी माधबी पुरी बुच यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
Published on

माधबी पुरी बुच यांची सेबीच्या (Securities and Exchange Board of India) अध्यक्षपदी तीन वर्षांच्या कार्यकाळासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. पुरी सेबीच्या पहिल्या महिला अध्यक्ष असतील. देशातील भांडवली आणि कमोडिटी बाजाराचे नियमन करण्याचे काम सेबी करत असते. मावळते अध्यक्ष अजय त्यागी यांचा कार्यकाळ काल 28 फेब्रुवारीला समाप्त झाला आहे.

पुरी याआधी सेबीच्या पूर्णवेळ सदस्य म्हणून काम पाहात होत्या. पुरी खाजगी क्षेत्रातून सेबीत येणाऱ्या पहिल्या व्यक्ती आहेत. आयसीआयसीआय बँकेतून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या पुरींनी आयसीआयसीआय सिक्युरिटिजचे सिइओ पदही भुषविले आहे.

2011 मध्ये त्या ग्रेटर पॅसिफिक कॅपिटल या कंपनीत काम करण्यासाठी सिंगापूरला गेल्या होत्या. अजय त्यागी हेच सेबीचे काम पाहतील की नवीन अध्यक्ष मिळेल, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. त्याचे उत्तर आता मिळाले आहे.

हा व्हिडिओ पाहिलात का? : 

सरकारच्या सांगण्यावरून सेबीने याआधी सोयाबीनसहित कित्येक शेतीमालाच्या वायद्यांवर बंदी आणली होती. आता नवीन अध्यक्ष मिळाल्याने धोरणांमध्ये बदल होणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com