Seafood Exports : भारताची मत्स्य निर्यात पोहोचली ८०० कोटी डॉलरवर

Marine products : भारताने सागरी उत्पादनांच्या निर्यातीत मोठी झेप घेतली आहे. एप्रिल-जून २०२३ या कालावधीत सागरी उत्पादनांच्या निर्यातीत डॉलर्सनुसार ४.३१ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे.
Seafood Exports
Seafood ExportsAgrowon
Published on
Updated on

Frozen shrimp exports : भारताने सागरी उत्पादनांच्या निर्यातीत मोठी झेप घेतली आहे. एप्रिल- जून २०२३ या कालावधित सागरी उत्पादनांच्या निर्यातीत (Exports of Marine Products) ४.३१ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे सागरी उत्पादनांची निर्यात ही ८ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली आहे. सागरी उत्पादनांच्या निर्यातीत फ्रोझन कोळंबीचा (Frozen shrimp)४१ टक्क्यांसह सर्वात मोठा वाटा आहे.

Seafood Exports
Fish Farming : डिंभे धरणात मत्स्य व्यवसायासाठी उभारला ‘पेन कल्चर’ प्रकल्प

अनेक अडचणींच्या काळात आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारताने  ६३ हजार ९६९ कोटी रुपये इतकी निर्यात केली. ही मागील वर्षीच्या तुलनेत २७ टक्के जास्त झाली.  भारताने १७ लाख ३५ हजार २८६ टन सागरी उत्पादनांची निर्यात केली. त्यामध्ये  फ्रोझन कोळंबी हे प्रमाण आणि मूल्याच्या दृष्टीने प्रमुख निर्यात वस्तू बनली आहे, यूएस आणि चीन हे प्रमुख आयातदार ठरले. फ्रोझन कोळंबीची निर्यात रुपया मूल्याच्या दृष्टीने एक टक्क्याने वाढून ४२ हजार ७०६ .०४ कोटींवरून ४३ हजार १३५.५८ कोटी रुपयेपर्यंत पोहोचली. 

अमेरिकेसारख्या बाजारपेठांमध्ये अनेक आव्हाने असतानाही भारताने निर्यातीचा आतापर्यंतचा उच्चांक केला.
डीव्ही स्वामी, अध्यक्ष, सागरी उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण

सीफूड निर्यातीमध्ये फ्रोझन कोळंबीने आपली लोकप्रियता कायम ठेवली असून ४३ हजार १३५. ५८ कोटी कमावले. तिचा निर्यातीत ४१ टक्के वाटा आहे. फ्रोझन कोळंबीची एकूण निर्यात ७ लाख ११ हजार ०९९ टन इतकी होती. सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या यूएसने २ लाख ७५ हजार ६६२ टन, चीन १ लाख ४५ हजार ७४३ टन, युरोपियन युनियन ९५ हजार ३७७ टन, दक्षिण पूर्व आशिया ६५ हजार ४६६ टन, जपान ४०  हजार ९७५ टन आणि पश्चिम आशिया ३१ हजार ६४७ टन आयात केली. 

एकूण निर्यातीमध्ये दुसरा क्रमांक फ्रोझन फिशचा लागतो. त्याच्या निर्यातीतून ५ हजार ५०३.१८ कोटी रुपये मिळाले. तर सुरीमी २ हजार ०१३. ६६ कोटींसह तिसरी सर्वात मोठी निर्यात वस्तू बनली. त्यानंतर ऑक्टोपसने ७२५.७१ कोटी, सुरीमी अॅनालॉग उत्पादनांनी ५५८.५१ कोटी आणि कॅन केलेला उत्पादनांनी  ३२६.४८ कोटी मिळवले. 

दरम्यान,  कमी मागणीमुळे अमेरिकेतील निर्यातीत डॉलरच्या तुलनेत २२ टक्क्यांनी घट झाली. काळ्या कोळंबीसाठी जपान ही प्रमुख बाजारपेठ बनली, त्यानंतर युरोपियन युनियन आणि अमेरिकेची बाजारपेठ उपलब्ध आहे. तर दुसरीकडे व्हन्नेमी कोळंबीची निर्यात 8 टक्क्यांनी घट झाली. ती ५२३ करोड डॉलरवरून ४८० करोड डॉलर झाली. रशिया, कॅनडा, चिली, तुर्की, डोमिनिकन रिपब्लिक, बांगलादेश, ट्युनिशिया इत्यादी इतर देशांमध्येही भारताच्या सागरी उत्पादनांची निर्यात करण्यात आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com