कापसाच्या वायदे दरात सुधारणा

युएसडीएनं मागील महिन्यातील दोन्ही आकडे कायम ठेवले. मात्र हंगामाचा विचार करता उत्पादनात ७ टक्के वाढ झाली आहे. तर वापरही २.१ टक्क्यांनी वाढला.
cotton production
cotton production
Published on
Updated on

पुणेः जागतिक कापूस वापर वाढल्याचं युएसडीएने आपल्या अहवालात म्हटले आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि ब्राझीलमध्ये उत्पादन वाढले. तर चीन आणि भारतात उत्पादन घटले. तर दराचा अंदाज कामय ठेवला आहे. या अहवालानंतर आंतरराष्ट्रीय कापूस बाजारात काहीशी सुधारणा झाली. याचे देशातील कापूस बाजारात काय पडसाद उमटले. देशात वायदे सुधारले तर बाजारातील दर स्थिर होते.

युएसडीएने(USDA) मार्च महिन्याचा जागतिक कापूस उत्पादन आणि वापराचा अंदाज जाहिर केलाय. युएसडीएनं मागील महिन्यातील दोन्ही आकडे कायम ठेवले. मात्र हंगामाचा विचार करता उत्पादनात ७ टक्के वाढ झाली आहे. तर वापरही २.१ टक्क्यांनी वाढला. यंदा उत्पादन (Production)१ हजार ५३१ लाख कोटी गाठींवर स्थिरावेल असं म्हटलंय. एक कापूस गाठ १७० किलोची असते. तर वापर १ हजार ५८२ लाख गाठींवर पोचेल, असे युएसडीएने म्हटले आहे.

जगात अमेरिकेच्या कापूस उत्पादनात(cotton production) सर्वाधिक २० टक्के वाढ झाली. अमेरिकेचे कापूस उत्पादन २२५ लाख गाठींवर राहिल. तर ब्राझीलमध्ये उत्पादन १८ टक्क्यांनी वाढले. आणि ऑस्ट्रेलियात उत्पादन दुप्पट झालं. मात्र भारत आणि चीनमधील उत्पादन घटले. भारतातील कापूस उत्पादन ३३८ लाख गाठींवर स्थिरावलं. तर चीनमध्ये ३४५ लाख गाठी कापूस झाला, असं युएसडीएने म्हटले. यंदा कापसाचा पुढील हंगामासाठीचा शिल्लक साठा यंदा ५ टक्क्यांनी कमी आहे. यंदा वापर वाढल्यानं शिल्लक साठा घटला, असेही अहवालात म्हटले आहे. तसेच हंगामातील सरासरी कापूस दराचा अंदाज कायम ठेवण्यात आला आहे. हंगामात कापसाला सरासरी ९० सेंट प्रतिपाऊंडचा दर मिळेल, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

हे हि पहा : 

युएसडीएच्या अंदाजानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर काहीसे सुधारले होते. इंटरनॅशनल काॅटन एक्सचेंजवर गुरुवारी कापसाचे मे महिन्याचे वायदे ११८.१०० सेंट प्रतिपाऊंटने झाले. दरात अर्धा टक्क्याने सुधारणी झाली होती. तर जुलै महिन्याचे वायदे ११४ सेंटने झाले. देशातील मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर कापसाचे मार्च महिन्याचे वायदे ३७ हजार ४०० रुपये प्रतिगाठीने झाले. तर एप्रिल महिन्याचे वायदे ३७ हजार ७२० रुपयांवर बंद झाले.

देशात सध्या कापसाची बाजारातील आवक खूपच कमी आहे. देशातील बाजारांत कापसाचा सर्वसाधारण दर ८ हजार ५०० ते १० हजार ५०० रुपयांच्या दरम्यान होता. देशातील कापसाचे दर मागील आठवडाभरापासून टिकून आहेत. दर टिकून असले तरी तेजी मात्र थांबलेली आहे. गुजरातमध्ये कापसाचा सर्वसाधारण दर ८ हजार ६०० ते १० हजार ५०० रुपयांवर होता. येथे कमाल दर १० हजार ७०० रुपये मिळाला. तर महाराष्ट्रातही सर्वसधारण दर ८ हजार ४०० ते १० हजार ६०० रुपये मिळाला. तर कमाल दर १० हजार ५०० रुपयांवर मिळाला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com