उन्हाळ हंगामात कडधान्य, तेलबियांचे क्षेत्र वाढणार ?

देशात यंदा उन्हाळ पिकांच्या लागवडीचे प्रमाण समाधानकारक असून यंदा कडधान्य, तेलबियांच्या लागवड क्षेत्रात वाढ होण्याचा अंदाज केंद्र सरकारकडून वर्तवण्यात आलाय.
Summer Crop
Summer Crop
Published on
Updated on

देशात यंदा उन्हाळ पिकांच्या लागवडीचे (Summer Crop Sowing) प्रमाण समाधानकारक असून यंदा कडधान्य (Pulses), तेलबियांच्या लागवड (Oilseed Sowing) क्षेत्रात वाढ होण्याचा अंदाज केंद्र सरकारकडून वर्तवण्यात आलाय. ११ मार्चपर्यंत देशभरात ३४.२३ लाख हेक्टर क्षेत्रावर उन्हाळ पिकांची लागवड झाली आहे. गेल्यावर्षीही उन्हाळ पिकांच्या लागवडीचे प्रमाण एवढेच होते. बिझनेस लाईनने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

यावर्षी उन्हाळ हंगामासाठी भात पिकाच्या (Summer rice Crop) एकूण लागवड क्षेत्रात घट झाली आहे. गेल्या वर्षीच्या २५.२८ लाख हेक्टरच्या तुलनेत यंदा उन्हाळी भात पिकाची लागवड २३.९८ लाख हेक्टरवर झाली आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या साप्ताहिक आकडेवारीनुसार, पश्चिम बंगालमध्ये ८.१९ लाख हेक्टर, तेलंगणा ६.७४ लाख हेक्टर, कर्नाटकामध्ये २.२३ लाख हेक्टर,  ओडीशात १.९० लाख हेक्टर आणि आसाममध्ये १.५९ लाख हेक्टर क्षेत्रात भातपिकाची लागवड झाली आहे.

कडधान्य -

मागील वर्षीच्या २.४८ लाख हेक्टरच्या तुलनेत यंदा कडधान्याखालील लागवड क्षेत्रात वाढ झाली आहे. यंदा २.८८ लाख हेक्टर क्षेत्रात कडधान्यांची लागवड  झाल्याची नोंद आहे. यावर्षी मूग (Moong) आणि उडीद (Urad) पिकाखालील क्षेत्र वाढल्याने कडधान्यांच्या एकूण लागवड क्षेत्रात वाढ झाली आहे.  तामिळनाडू १.७२ लाख हेक्टर, पश्चिम बंगाल ६० हजार हेक्टर, छत्तीसगड १७ हजार हेक्टर, कर्नाटक १० हजार हेक्टर, उत्तर प्रदेशात ९ हजार हेक्टर तर महाराष्ट्रात ५ हजार हेक्टर क्षेत्रात उन्हाळी कडधान्यांची लागवड करण्यात आली आली आहे.

तेलबिया -

४.१८ लाख हेक्टर क्षेत्रात तेलबियांची लागवड (sowing Of Oilseed) करण्यात आली आहे. मागील वर्षी याच कालावधित उन्हाळी तेलबियांखालील लागवड क्षेत्र  ४.२० लाख हेक्टर इतके होते. पश्चिम बंगालमध्ये ९९ हजार हेक्टर क्षेत्रात तेलबियांची लागवड झाली आहे. तर कर्नाटकात ९२ हजार हेक्टर , तेलंगणा ४६ हजार हेक्टर , महाराष्ट्र ३९ हजार हेक्टर, गुजरात ३९ हजार हेक्टर आणि तामिळनाडूमध्ये ३० हजार हेक्टरवर तेलबियांची लागवड झाली आहे.

भरडधान्यांच्या बाबतीत गेल्या वर्षीच्या २.०१ लाख हेक्टरच्या तुलनेत  यंदा २.७६ लाख हेक्टरवर मक्याची लागवड झाली आहे. ज्यामुळे एकूण भरडधान्य लागवडीचे क्षेत्र मागील वर्षीच्या २.२२ लाख हेक्टरवरून ३.२० लाख हेक्टरवर पोहोचले आहे. पश्चिम बंगालमध्ये ९९ हजार हेक्टरवर भरड धान्यांची लागवड  झाली आहे. तर छत्तीसगडमध्ये ९३ हजार हेक्टर , कर्नाटक ४५ हजार हेक्टर , उत्तर प्रदेशात  ३२ हजार हेक्टर , गुजरातमध्ये  २६ हजार हेक्टर , महाराष्ट्रात १८ हजार हेक्टर आणि तामिळनाडूत ७ हजार हेक्टर क्षेत्रात भरडधान्यांची लागवड करण्यात आली आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com