२०२३ हे वर्षे संयुक्त राष्ट्रसंघाकडून आंतरराष्ट्रीय मिलेट्स (भरडधान्य) वर्ष म्हणून साजरी करण्यात येणारंय. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitarman) यांनी २००२-२०२३ सालासाठी मांडलेल्या अर्थसंकल्पातही त्याचा उल्लेख करण्यात आलाय.
भारत हा जगातील प्रमुख भरडधान्य (Millets) उत्पादक देशांपैकी एक मानण्यात येतो. त्यामुळं आता केंद्र सरकारकडून देशभरात पिकणाऱ्या भरडधान्याला जगभरात बाजारपेठ आणि प्रतिष्ठा मिळवून देण्यात येत आहे. यासोबतच देशातील भरडधान्य लागवडीखालील क्षेत्र वाढवण्यासाठीही विशेष लक्ष्य केंद्रित करायला सुरुवात केलीय.
त्यासाठी शेतकरी उत्पादक कंपन्या (Farmer Producer Organisations) , शेतकरी बचत गटांना हाताशी धरून अधिकाधिक प्रमाणात भरडधान्य (Millets) लागवडीचा कार्यक्रम राबवण्यात येतोय. आजमितीस देशातील कर्नाटक (Karnataka), राजस्थान (Rajasthan), उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) गुजरात (Gujrat) ,मध्य प्रदेश (Madhya Pardesh) महाराष्ट्र (Maharashtra) या राज्यांत भरडधान्यांचं उत्पादन घेतलं जात.
या राज्यांत भरडधान्याचे (Millets) बरेच प्रकार पिकवल्या जातात. विशेषतः फॉक्सटेल (foxtail), रगी (ragi), बर्नयार्ड (barnyard), प्रोसो (proso) ब्राऊन टॉप (brown top) कोडो (kodo) हे प्रकार मोठ्या प्रमाणात घेतल्या जातात. या राज्यांतली भरडधान्य लागवड वाढवण्यासाठी केंद्र सरकार या शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या (FPO) मदतीने प्रयत्न करतेय.
भरडधान्याचे (Millets) उत्पादन वाढवण्यासोबतच वाढीव उत्पादनाला प्रक्रिया उद्योगाची जोड देण्यात येणारे. या वाढीव उत्पादनापासून विविध पौष्टीक उत्पादने, पदार्थ विकसित करणे आणि पुरवठा साखळी मजबूत करण्यावर भर देण्यात येणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनीही केंद्र सरकारच्या खाद्य सुरक्षा अभियानात भरडधान्याचा समावेश करण्याचा निर्णय घेतलाय. त्यानुसार माध्यान्ह भोजन योजनेत भरडधान्यांचा समावेश करण्यात आलाय.
व्हिडीओ पहा-
सार्वजनिक वितरण (Public Distribution System) कार्यक्रमासाठी सरकार हमीभावाने (MSP) शेतकऱ्यांच्या भरडधान्य (Millets) उत्पादनाची खरेदी करणार आहे. मधुमेह आणि ह्रदयासंबंधीचे आजार टाळण्यासाठीचा आहार टाळण्याचा उत्तम उपाय म्हणून रोजच्या आहारात भरडधान्याचा वापर सुचवण्यात येतो. रोग्याला पोषक मूल्य देण्याची क्षमता असलेल्या या उत्पादनापासून मानवी आरोग्याच्या पोषणाची गरज भागविता येते.
दुबईच्या एक्स्पोमध्येही भरात सरकार भारतीय भरडधान्य (Millets) विकास कार्यक्रमावर जोर देणार असल्याचंच सांगितलंय. भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (Indian Council of Agricultural Research) मते ,शेतकऱ्यांनी गहू आणि भातपिकाऐवजी भरडधान्य लागवडीवर फोकस करावा. गहू (Wheat) आणि भातपिकाच्या (Paddy)तुलनेत भरडधान्याचे उत्पादन कमी पाण्यात शक्य होते. भरधान्ये कोरडवाहू क्षेत्रातही घेता येऊ शकतात. शिवाय केंद्र सरकारकडून प्रमुख भरडधान्य (Millets) उत्पादक राज्यांशिवाय इतर राज्यातही भरडधान्य लागवडीला प्रोत्साहन देण्यात येतंय.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.