शेती अन शेतकऱ्यांसमोर इथूनतिथून सारखेच प्रश्न आहेत, असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. शेतीसाठी सरकार पुरेशी वीज पुरवत नसल्याची व्यथा केवळ महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांपुरती मर्यादित आहे का ? तस अजिबात नाहीय. पंजाबमधील शेतकरीही वीजपुरवठ्या अभावी हैराण झाल्याचं समोर आलंय.
गहू अन तांदूळ उत्पादनासाठी प्रसिद्ध पंजाबमधल्या शेतकऱ्यांना राज्य सरकार पिकपालटाचा सल्ला देतय, हा सल्ला मनावर घेतलेल्या शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात वीजच पुरवू शकत नसल्याचं समोर आलं आहे. अतिरिक्त तांदूळ अन गव्हाच्या उत्पादनामुळे पंजाब सरकार तिथल्या शेतकऱ्यांना इतर पीक घ्यायचा सल्ला देत आहे.
आता हा सल्ला गृहीत धरून गहू अन भातपिकाच्या जागी फलोत्पादनाकडं वळलेलया शेतकऱ्यांना सलग वीज पुरवायची जबाबदारी कोणाची ? असा सवाल पंजाबमधले शेतकरी उपस्थित करताहेत.
राज्य सरकारच्या आवाहनानुसार शेतकरी फलोत्पादनाकडे वळले आहेत. आता फळबागा वाढवायच्या तर त्यांना पुरेसा पाणी द्यायला नको का ? आठवड्यातून किमान दोनवेळा तरी फळबागेला पाणी यायला हवं. मात्र त्यासाठी सलग विद्युत पुरवठा असायला हवा. फलोत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना दिवसाकाठी किमान ४ तास सलग वीज पुरवठा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी नरिंदर सिंग शर्मा यांनी केलीय.
पुरेशा प्रमाणात वीजच उपलब्ध नसेल तर ते कशी शेती करणार ? असा सवाल उपस्थित करताना शर्मा यांनी, आजमितीस शेतकऱ्यांना दिवसा केवळ एक तास वीज पुरवली जात असल्याचं सांगितली. फळबाग लागवडीस प्रवृत्त झालेल्या शेतकऱ्यांसाठी दिवसाकाठी किमान ४ तास सलग वीजपुरवठा करण्यात यावा, यासाठी आपण पंजाब राज्य वीज महामंडळास (Punjab State Power Corporation Limited) २० पत्र लिहिली असल्याचं शर्मा म्हणालेत.
व्हिडीओ पहा-
फळबाग लागवडीस प्रवृत्त झालेल्या शेतकऱ्यांसाठी फलोत्पादन विभागाकडून (Horticulture Dept) प्रति हेक्टरी १९ हजारांचं अनुदान देण्यात येतंय, आता फलोत्पादन विभागानं राज्य वीज महामंडळाकडं (Punjab State Power Corporation Limited) या शेतकऱ्यांना सलग वीज पुरवठा करण्याची सूचना करावी म्हणजे पिकपालटाचे उद्दिष्ट साध्य होईल, अशी प्रतिक्रिया सुखविंदर सिंग यांनी व्यक्त केलीय.
मार्च ते जून या दरम्यान फलोत्पादकांना किमान ४ तास सलग वीज पुरवठा करण्यात यावा, अशी सूचना राज्याच्या फलोत्पादन विभागाने (Horticulture Dept) करूनही पंजाब राज्य वीज महामंडळाने त्याकडे दुर्लक्ष केलं असल्याचं सुखविंदर यांचं म्हणणं आहे.
पठाणकोट आणि पट्टी येथील हजारो शेतकरी आता गहू आणि भातपिकावरून फळबागा लागवडीकडे वळले आहेत. फलोत्पादनास प्रोत्साहन द्यायचं म्हणून राज्याच्या फलोत्पादन विभागाकडून शेतकऱ्यांना प्रति हेक्टर १९ हजारांचा अनुदान देण्यात येतंय. गांडूळ खत निर्मिती प्रकल्पासाठी प्रति युनिट ५० हजारांचा अनुदान, व्हर्मीबेडला प्रति युनिट ८ हजारांचे अनुदान देण्यात येतंय.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.