यूजीसीकडून ४ वर्षांचा नवा पदवी अभ्यासक्रम !

१० मार्च रोजी यूजीसीच्या (University Grants Commission) झालेल्या बैठकीमध्ये काही महत्त्वाच्या सुधारणांबाबत चर्चा झाली. यामध्ये चार वर्षांच्या पदवीचा अभ्यासक्रम (एफवाययूपी) पूर्ण करणाऱ्या विद्यार्थी पीएचडी प्रवेशासाठी पात्र ठरू शकेल, अशा प्रकारच्या सुधारणा करण्याचा विचार यूजीसीने (University Grants Commission) केला आहे.
Four years new degree course from UGC!
Four years new degree course from UGC!

विद्यापीठ अनुदान आयोग (University Grants Commission) चार वर्षाचा नवीन पदवी अभ्यासक्रम सुरु करणार असून पीएचडी नियमांमध्येसुद्धा महत्त्वाच्या सुधारणा करणार आहेत. १० मार्च रोजी यूजीसीच्या (University Grants Commission) झालेल्या बैठकीमध्ये काही महत्त्वाच्या सुधारणांबाबत चर्चा झाली. यामध्ये चार वर्षांच्या पदवीचा अभ्यासक्रम (एफवाययूपी) पूर्ण करणाऱ्या विद्यार्थी पीएचडी प्रवेशासाठी पात्र ठरू शकेल, अशा प्रकारच्या सुधारणा करण्याचा विचार यूजीसीने (University Grants Commission) केला आहे.

पदवी अभ्यासक्रम हा तीन किंवा चार वर्षांचा असेल, जर तुम्ही चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला. तर एफवाययूपी पात्रताधारक विद्यार्थी एक वर्षाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी किंवा थेट पीएचडी प्रवेशासाठी पात्र असतील.

व्हिडीओ पहा- 

हा नवा चार वर्षाचा पदवी अभ्यासक्रम तयार करताना सुद्धा विद्यार्थ्यांना मल्टी एन्ट्री आणि एक्झिट पॉईंट असतील. म्हणजे जर एखाद्या विद्यार्थ्याने चार वर्षे अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला आणि मध्येच त्यांनी अभ्यासक्रम सोडला तर त्याला सोडलेल्या वर्षापासून पुन्हा या अभ्यासक्रमात प्रवेश मिळू शकेल आणि पुढे हा अभ्यासक्रम पूर्ण करु शकतो.

या चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमात सेमिस्टर (Semester)एक ते तीन हे शिक्षणाच्या सर्व प्रमुख क्षेत्रांची समज विकसित करण्यासाठी असतील. सेमिस्टरमध्ये (Semester) चार ते सहा विद्यार्थी स्पेशलायझेशनसाठी किंवा आंतरविद्याशाखीय (Interdisciplinary) क्षेत्र निवडण्यासाठी आहेत. अंतिम दोन सत्रांमध्ये विद्यार्थी संशोधन प्रकल्प हाती घेतील.

चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम

अभ्यासक्रमाला प्रवेश घेतल्यानंतर एक वर्ष म्हणजेच २ सेमिस्टर  (Semester) विद्यार्थ्याने पूर्ण केल्यास त्याला निवडलेल्या अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र दिले जाईल. या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना दोन वर्ष म्हणजे ४ सेमिस्टर (Semester) पूर्ण केल्यास विद्यार्थ्याचा डिप्लोमा पूर्ण होईल. या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना तीन वर्ष म्हणजे सहा सेमिस्टर्स (Semester) पूर्ण केल्यास त्याला बॅचलर डिग्री मिळेल. हा विद्यार्थी आधी प्रमाणेच दोन वर्षाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी पात्र असेल. अभ्यासक्रमात विद्यार्थ्याने पूर्ण चार वर्ष आठ सेमिस्टर (Semester) पूर्ण केल्यास त्याला चार वर्षाची बॅचलर डिग्री मिळणार असून हा विद्यार्थी एक वर्षाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रम किंवा पीएचडी प्रवेशासाठी पात्र असेल. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com