Financial Assistance for Drone Purchase
Financial Assistance for Drone Purchase

ड्रोन खरेदीसाठी केंद्राकडून अनुदान

जर कस्टम हायरिंग सेंटर (Custom Hiring Centers) कृषी पदवीधारकांकडून सुरु करण्यात आलं असेल तर त्याला ड्रोन खरेदीसाठी ५० टक्के अनुदान अथवा ५ लाख रुपये, यातील जी रक्कम मोठी असेल ती देण्यात येणार असल्याचं तोमर म्हणालेत.

कृषी क्षेत्रातील तंत्रज्ञानाच्या (Agricultural Technology) वापरासाठी केंद्र सरकार राज्यांना विविध योजनांच्या माध्यमातून आर्थिक मदत करत असते. ज्यात कृषी क्षेत्रातील ड्रोन (Agricultural Drone)वापरासाठी केंद्र सरकारकडून अनुदान देण्यात येणार असल्याचं केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी लोकसभेत सांगितलं आहे.  

शेतकरी आणि शेती क्षेत्रातील सहभागी घटकांना ड्रोन तंत्रज्ञान वापरणं परवडावं यासाठी केंद्र सरकारच्या कृषी यांत्रिकीकरण उप अभियायानांतर्गत ( Sub-Mission on Agricultural Mechanisation) ड्रोन खरेदीसाठी अनुदान देण्यात येणार आहे.

भारतीय कृषी संशोधन परिषद (Indian Council of Agricultural Research), कृषी विज्ञान केंद्र  (Krishi Vigyan Kendra)आणि राज्याची कृषी विद्यापीठे (State Agricultural Universities) शेतकऱ्यांसाठी ड्रोन वापराची प्रात्यक्षिके घेणार आहेत.  

शेतकऱ्यांच्या प्रात्यक्षिकांसाठी ड्रोन खरेदी करणाऱ्या शेतकरी उत्पादक कंपन्यांना (Farmer Producer Comapany) ७५ टक्के अनुदान देण्यात येणार आहे. ड्रोनच्या माध्यमातून कृषी सेवा देणाऱ्यांना ४० टक्के अनुदान देण्यात येणार आहे. हे अनुदान ४ लाख रुपयांपर्यंत असेल. यातील जी रक्कम मोठी असेल ती वितरित करण्यात येणार आहे. 

शेतकरी उत्पादक कंपन्यांसोबतच (Farmer Producer Comapany) सहकारी पतसंस्थांच्या अंतर्गत शेतकऱ्यांनी स्थापन केलेल्या बचत गटांनाही (Self Help Groups) या अनुदानाचा लाभ घेता येणार आहे. या बचत गटांच्या माध्यमातून कस्टम हायरिंग सेंटर्स (Custom Hiring Centers) उभारण्यात येतील.  

जर कस्टम हायरिंग सेंटर (Custom Hiring Centers) कृषी पदवीधारकांकडून सुरु करण्यात आलं असेल तर त्याला ड्रोन खरेदीसाठी ५० टक्के अनुदान अथवा ५ लाख रुपये, यातील जी रक्कम मोठी असेल ती देण्यात येणार असल्याचं तोमर म्हणालेत.

व्हिडीओ पहा-   

शेतीकामात ड्रोनचा वापर (Agricultural Drone) करण्याची संकल्पना आपल्याकडे नवी आहे. कृषी तंत्रज्ञान क्षेत्राला चालना देण्यासाठी २०१८-२०१९ साली राष्ट्रीय कृषी विकास योजने (Rashtriya Krishi Vikas Yojana) अंतर्गत इंनोव्हेशन अँड आंत्रप्रिन्युअरशिप डेव्हलपमेंट  (Innovation and Entrepreneurship Development) हा कार्यक्रम राबवण्यात येत आहे. कृषी क्षेत्रातील ड्रोन वापराचा (Agricultural Drone) समावेश या योजनेत करण्यात आल्याचेही तोमर म्हणालेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com