
नगर ः वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पूर्वमोसमी पावसाने गुरूवारी तासभर शहरात हजेरी लावली. त्यात भिस्तबाग परिसरात महसूल विभागातील अव्वल कारकून ज्ञानेश्वर कांबळे यांच्या घरावर वीज कोसळली, विविध भागांत झाडे पडली. पारनेर, नगर, पाथर्डी तालुक्यातील काही भागांत पाऊस झाला.
नगर शहरासह सावेडी, गुलमोहर रस्ता, पाइपलाइन रस्ता, तारकपूर, औरंगाबाद रस्ता, मनमाड रस्ता आदी ठिकाणी पावसाने हजेरी लावली. भिस्तबाग परिसरात ज्ञानेश्वर कांबळे यांच्या घरावर वीज कोसळली. त्यात छतावरील सोलर पॅनलचे नुकसान झाले आणि छतालाही मोठे छिद्र पडले. कांबळे व घरातील सदस्य तळमजल्यावर होते. वादळी वाऱ्यामुळे कुष्ठधाम रोड, चैत्रबन कॉलनी, प्रोफेसर कॉलनी चौक, वसंत टेकडी आदी भागांत झाडे पडली. पारनेर शहर परिसरात गुरूवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास सुमारे पाऊण तास जोरदार पाऊस झाला. पुणेवाडी भागातही पाऊस झाला; मात्र पावसाचा जोर शहरातच अधिक होता.
दरम्यान, अनेक ठिकाणी शेतात काढून ठेवलेला कांदा झाकण्यासाठीही शेतकऱ्यांची धावपळ झाली. भाळवणी परिसरातही दुपारी साडेतीनच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली. जामगाव, सारोळा अडवाई, दैठणे गुंजाळ, टाकळी खातगाव, वडगाव आमली, काळकूप, माळकूप आदी गावांतही पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाले. या पावसात अनेकांचा कांदा भिजला. नगर, पाथर्डी तालुक्यातील काही भागात झालेल्या पावसाने पिकांचे नुकसान झाले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.