सरकारच्या गुंतवणुकीमुळे कृषी तंत्रज्ञान क्षेत्रात उत्साह

२०२१ सालात कृषी तंत्रज्ञान क्षेत्रात ५१५ दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक झाली. त्याचे परिणाम दिसून आले आहेत. त्यामुळेच या क्षेत्रात आता आणखी गुंतवणुकीची अपेक्षा आहे. गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळाल्यामुळे आणखी काही गुंतवणूकदार कृषी तंत्रज्ञान क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी उत्सुक आहेत.
Agricultural technology
Agricultural technology

शेतीसाठी तंत्रज्ञानाचा (Agricultural technology) वापर अपरिहार्य आहे. तंत्रज्ञानाच्या वापरानंतरच कृषी उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. नव्या युगातील तंत्रज्ञानाचा कृषी क्षेत्रात वापर करून घेताना आर्टीफिशियल इंटेलिजन्स (Artificial Inteligence), डाटा ॲनलटिक्स, (Data Anylitics) मशीन लर्निंग, (Machine Learning) क्लाउड कॉम्पुटिंग, ब्लॉकचेन, (Block Chain) इंटनेत ऑफ थिंग्ज (IOT) इत्यादीसह कृषी तंत्रज्ञान कंपन्या कृषी व्यवस्थेतील सांदी बुजवण्याचे काम करत असल्याचे प्रतिपादन ॲग्नेक्स्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी तरणजित सिंह ब्रम्हा यांनी  'हिंदू बिझनेस लाईन'ला दिलेल्या मुलाखतीत केले आहे.

काढणीनंतरचे (Harvesting) आव्हान पेलताना या कंपन्या कृषी माल अधिक काळापर्यंत टिकवता यावा, त्याचे दळणवळण, वाहतूक व्यवस्था, कृषी उत्पादने बाजारपेठांशी जोडून देणे, जागतिक बाजारात मागणी असलेल्या कृषी उत्पादनांची नोंदी ठेवणे, कोल्ड स्टोरेज सुविधा इत्यादींवर काम करत आहेत.       

२०२१ चे साल कृषी तंत्रज्ञान क्षेत्रासाठी (Agriculture Tecnology) अनुकूल राहिलेले आहे. मात्र त्यातुलनेत २०२२ साली आणखी नव्या कंपन्या या क्षेत्रात आपल्या नव्या संकल्पनांसह पदार्पण करत असल्यामुळे अधिक उत्साहवर्धक असल्याचा विश्वास ब्रम्हा यांनी व्यक्त केला आहे.

२०२२ सालच्या अर्थसंकल्पात सरकारकडून कृषी क्षेत्राच्या विकासातील कृषी- तंत्रज्ञानाचे योगदान आणि त्यासाठी आणखी चालना देण्याची गरज व्यक्त करत कृषी तंत्रज्ञान क्षेत्राच्या परिणामकारकतेची कबुलीच दिलेली आहे. शेती उत्पादनांच्या मूल्यवृद्धीसाठी कृषी तंत्रज्ञान क्षेत्रात सरकारी हस्तक्षेपाची घोषणा या क्षेत्राच्या उज्ज्वल भविष्याची नंदी ठरणार आहे. कृषी व कृषी तंत्रज्ञान क्षेत्रातील सरकारी गुंतवणुकीमुळे या क्षेत्राचा विकास झपाट्याने घडून येणार आहे.

कृषी क्षेत्रातील डिजिटायझेशन, उच्च तंत्रज्ञानाच्या प्रोत्साहनासाठी सरकारने पुढाकार घेऊन सार्वजनिक-खाजगी भागीदारी (पी-पी-पी) तत्वावर विकासास प्राधान्य दिले आहे. नेमकी हीच बाब कृषी तंत्रज्ञान क्षेत्राच्या पथ्थ्यावर पडणार असल्याचे ब्रम्हा म्हणाले आहेत.

२०२१ सालात कृषी तंत्रज्ञान क्षेत्रात ५१५ दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक झाली. त्याचे परिणाम दिसून आले आहेत. त्यामुळेच या क्षेत्रात आता आणखी गुंतवणुकीची अपेक्षा आहे. गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळाल्यामुळे आणखी काही गुंतवणूकदार कृषी तंत्रज्ञान क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी उत्सुक आहेत.

सकल राष्ट्रीय उत्पादनातील (GDP) कृषी क्षेत्राचा वाटा अभ्यासल्यास आजवर कृषी क्षेत्रातील संशोधन व विकासासाठी केवळ ०.३ ते ०.५ टक्केच राहिलेला आहे. त्यातुलनेत अमेरिका कृषी क्षेत्रातील संशोधन व विकासावर प्रतिवर्षी २. ८ टक्के आणि चीन २. ३ टक्के खर्च करत आलेला आहे.

व्हिडीओ पाहा -

भारतात आजवर या क्षेत्राच्या विकासाकडे दुर्लक्ष झालेले असले तरी अलीकडील काळात काढणीनंतरच्या नुकसानीचे प्रमाण लक्षात घेऊन भारतातही कृषी क्षेत्रातील संशोधन आणि विकासास प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  कृषी तंत्रज्ञान आणि संशोधन व विकास क्षेत्रातील सरकारचा हस्तक्षेप या क्षेत्राच्या वाटचालीस गतिमानता प्रदान करेल, असा विश्वासही ब्रम्हा यांनी व्यक्त केला आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com