रब्बी पेरणीत मक्याचे वर्चस्व

चालू रब्बीहंगामात १४ जानेवारीपर्यंत भरड धान्यांखालील क्षेत्र एक लाख हेक्टरने घटले आहे.कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, मका, ज्वारी, जव, नाचणी आणि बाजरी या भरड धान्यांची ४७.८२ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.
Maize
Maize

वृत्तसेवा - चालू रब्बी हंगामात (Rabbi Season) १४ जानेवारीपर्यंत भरड धान्यांखालील क्षेत्र एक लाख हेक्टरने घटले आहे. कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, मका, (Maize) ज्वारी, जव, नाचणी आणि बाजरी या भरड धान्यांची ४७.८२ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी (Sowing) झाली आहे. मागील वर्षी याच कालावधीत हा आकडा ४९.९१ लाख हेक्टर इतका होता. रब्बी हंगामातील भरड धान्याखालील सरासरी क्षेत्र ५६.०५ लाख हेक्टर इतके असते. यंदाच्या हंगामात मका आणि बार्ली या पिकांकडे शेतकऱ्यांचा ओढा वाढला असून ज्वारी, बाजरी, आणि नाचणी सारख्या इतर पिकांमध्ये त्यांचा रस कमी होत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. लुधियानास्थित इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेझ रिसर्चचे संचालक सुजय रक्षित (Sujay Rakshit) यांनी बिझनेस लाईन या इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार खरीपाच्या तुलनेत रब्बीत मक्याचे उत्पादन चांगले असते. बिहार, कर्नाटक, तेलंगाणा, आंध्र प्रदेश, आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये मक्याचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. तर पश्चिम बंगालमध्ये मक्याची लागवड झपाट्याने वाढत असून बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये उत्पादनहीे वाढत असल्याचं रक्षित यांनी सांगितले.  

भात पिकाला (Paddy Crop) जास्त प्रमाणात पाणी लागत असल्याने खरिपात जास्तीत जास्त शेतकरी भातापेक्षा मक्याला पसंती देत आहेत. मक्याला पाण्याच्या तीन ते चार पाळ्या लागतात. पंजाब, बिहार आणि पश्चिम बंगालमधील मक्याला पशुखाद्य उद्योगाकडून (Feed Industry) मागणी आहे. या हंगामात आम्हाला मका पिकवणाऱ्या राज्यांमध्ये चांगले उत्पादन अपेक्षित असल्याचेही रक्षित पुढे म्हणाले.

सध्याच्या बाजारपेठेतील दर पाहता पश्चिम बंगालसारख्या राज्यात मक्याचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज आहे. सध्या दर्जेदार खरीप मक्याची दक्षिण भारतात आवक होत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. बिहारमध्ये मक्याचे क्षेत्र वाढले असते पण अवकाळी पावसामुळे मका पेरणीवर काही प्रमाणात परिणाम झाल्यामुळे शेतकरी गव्हाकडे वळाले आहेत, असे एएमडीडी फूड्स प्रायव्हेट लिमिटेडचे सरव्यवस्थापक सुरेश सिंह चौहान (Suresh singh Chauhan) यांनी सांगितले. गुजरातमध्ये मक्याचे पेरणी क्षेत्र ८८,७१५ हेक्टर नोंदवले गेले असून १.०८ लाख हेक्टरच्या तीन वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत यामध्ये १८ टक्क्यांनी कमी आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत पेरणी किरकोळ कमी झाली असली तरी, अवकाळी पावसामुळे पिकांवर परिणाम होऊ शकतो. महाराष्ट्रात मकाखालील क्षेत्र सुमारे २.७५ लाख हेक्टर आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com