सागरी वाहतूक थांबल्याने द्राक्षे इराणमार्गे पोचवा रशियाला

नाशिकमध्ये केंद्र सरकारच्या वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या 'अपेडा'तर्फे ‘भारत का अमृत'(Nectar of India’) महोत्सव कार्यक्रमातंर्गत द्राक्षासंबंधी काम करणाऱ्या घटकांची बैठक झाली. यावेळी द्राक्ष निर्यातीच्या समस्यांकडे निर्यातदारांनी 'अपेडा'च्या अध्यक्षांचे लक्ष वेधले.
Delivery of grapes to Russia via Iran
Delivery of grapes to Russia via Iran

नाशिक : रशिया-युक्रेन युद्धात रशियामध्ये सागरी वाहतुकीद्वारे होणारी द्राक्षांची निर्यात थांबली आहे. त्यामुळे रशियामध्ये इराणमार्गे द्राक्षे पाठवण्याची व्यवस्था व्हावी, अशी मागणी निर्यातदारांनी ‘अपेडा‘ अध्यक्ष डॉ. एम. अंगमुथु यांच्याकडे केली. द्राक्षपंढरी नाशिक जिल्ह्यातून गेल्यावर्षीच्या तुलनेत आतापर्यंत रशियासह युक्रेनमधील द्राक्षांची निर्यात ४० कोटींनी घटली आहे.

द्राक्षांची निर्यात १९९० पासून सुरु झाली. ३२ वर्षे झाली, तरीही ‘अपेडा‘(‘Apeda’) अध्यक्षांनी नाशिकला भेट दिली नव्हती. डॉ. अंगमुथु हे पहिल्यांदा नाशिकच्या दौऱ्यावर आले होते. नाशिकमध्ये केंद्र सरकारच्या वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या 'अपेडा'तर्फे ‘भारत का अमृत'(Nectar of India’) महोत्सव कार्यक्रमातंर्गत द्राक्षासंबंधी काम करणाऱ्या घटकांची बैठक झाली. यावेळी द्राक्ष निर्यातीच्या समस्यांकडे निर्यातदारांनी 'अपेडा'च्या अध्यक्षांचे लक्ष वेधले. कंटेनर भाड्यासाठी आर्थिक सहाय्य, रोडटेप योजनेतील आर्थिक सहाय्य, रशिया-युक्रेन युध्द (Russia-Ukraine war)पार्श्वभूमीवर निर्यात अशा विविध मुद्द्यांवर चर्चा झाली.

हे  हि पहा : बैठकीला राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे संचालक डॉ. आर. जी. सोमकुंवर, अखिल भारतीय द्राक्ष निर्यातदार संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ खापरे, ‘अपेडा‘चे विभागीय अधिकारी आर. रवींद्रन, निर्यात सल्लागार गोविंद हांडे, सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष विलास शिंदे, द्राक्ष निर्यातदार मयांक टंडन, मधुकर क्षीरसागर, प्रितम चंद्रात्रे, राजाराम सांगळे, राजेंद्र बोरस्ते आदी उपस्थित होते. इराणमार्गे रशियात द्राक्ष पाठवण्याच्या व्यवस्थेचा मुद्दा श्री. क्षीरसागर यांनी उपस्थित केला. तसेच यंदा चीनमध्ये द्राक्षांची निर्यात विविध कारणांमुळे झाली नसल्याची बाब डॉ. अंगमुथु यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली.

युरोपियन देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर निर्यात होत असली, तरी देशातील निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन वाढत असल्याने नवीन देशातील बाजारपेठ शोधून 'अपेडा'च्या माध्यमातून प्रयत्न व्हावेत, असा मुद्दा उपस्थित झाला.त्यावर यासंबंधाने लवकर प्रयत्न करण्याचे डॉ. अंगमुथु यांनी सांगितले. डॉ. अंगमुथु यांनी जिल्ह्यातील द्राक्ष निर्यात कामकाज व पॅकिंग हाऊसची पाहणी केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com