दिल्ली जगातील सर्वाधिक प्रदूषित राजधानी

वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट २०२१ नुसार (World Air Quality Report 2021), गेल्या वर्षी दिल्लीच्या पीएम २.५ मध्ये १४.६ टक्के वाढ झाली होती. दिल्लीमध्ये प्रदूषणाची समस्या खूपच गंभीर बनली आहे.
Delhi continues to be most polluted capital city for fourth year
Delhi continues to be most polluted capital city for fourth year

नुकताच वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट २०२१ (World Air Quality Report 2021) जाहीर करण्यात आलाय, या रिपोर्टनुसार मोकळा श्वास घ्यायला आता जागाच उरलेली नाही. प्रदूषणाचा विचार करता कोणत्याच देशातील कोणतेच शहर सध्या सुरक्षित उरले नाही.  

हा रिपोर्ट जगातील ११७ देशांमधील ६,४७५ शहरांमधील पीएम २.५ डाटावर आधारित आहे. या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, मध्य तसेच दक्षिण आशियातील काही शहरांमध्ये जगातील सर्वाधिक प्रदूषित हवा आहे. जगातील सर्वाधिक प्रदूषित (Most Polluted) १०० शहरांत भारतातील ६३ शहरांचा समावेश होतो आहे. 

दिल्ली ही जगातील सर्वाधिक प्रदूषित राजधानी (most polluted capital)बनलीय.  प्रदूषणाबाबत बांगला देशाची राजधानी ढाका सध्या दुसऱ्या क्रमांकावर आहे. जगातील सर्वाधिक प्रदूषित राजधानी होण्याचा हा मान दिल्लीला सलग चौथ्यांदा मिळालाय.  २०२१ मध्ये मध्य तसेच दक्षिण आशियाच्या १५ सर्वांत प्रदुषित शहरांमधील १२ शहरे भारतातील होती. आफ्रिकन देश चाडची राजधानी नजामिना तिसऱ्या स्थानावर तर तजाकिस्तानची राजधानी दुशांबे चौथ्या आणि ओमानची राजधानी मस्कत  पाचव्या क्रमांकावर आहे. 

जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organisation) एअर क्वालिटी इंडेक्सच्या मानकांनुसार कोणत्याच देशातील कोणतेच शहर सध्या सुरक्षित उरले नाही आहे. तसेच भारतातील कोणतेच शहर डब्ल्यूएचओच्या एक्यूआयच्या गाईडलाईन्सनुसार नाही. 

व्हिडीओ पहा- 

वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट २०२१ नुसार (World Air Quality Report 2021), गेल्या वर्षी दिल्लीच्या पीएम २.५ मध्ये १४.६ टक्के वाढ झाली होती. दिल्लीमध्ये प्रदूषणाची समस्या खूपच गंभीर बनली आहे. नोव्हेंबरच्या महिन्यामध्ये हरियाणा तसेच पंजाबमध्ये शेतकऱ्यांकडून पराली जाळली जाते, त्यामुळेही प्रदूषण वाढते. प्रदुषणावर योग्य पद्धतीने उपाय न केल्यामुळे देखील सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारवर अनेक वेळा ताशेरे ओढले आहेत.

भिवडी सर्वांत प्रदूषित क्षेत्रीय शहरमध्य तसेच दक्षिण आशिया क्षेत्रातील देशांमध्ये इराण, नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगला देशदेखील सामील आहे. राजस्थानमधील भिवडी सर्वाधिक प्रदूषित क्षेत्रीय शहर आहे. हवा प्रदुषण वाढण्यामध्ये पीएम २.५ ची भूमिका सर्वाधिक महत्त्वपूर्ण ठरते. हवेत जर याची मात्र अधिक असेल तर अस्थमा, स्ट्रोक, हृदय आणि फुप्फुससंदर्भातील आजार होण्याची शक्यता सर्वाधिक असते. आरोग्य तज्ज्ञांचे असे म्हणणे आहे की, पीएम २.५ मुळे जगभरातील लाखो लोकांचा दरवर्षी मृत्यू होतो.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com