कापूस तेजीताल ब्रेक; मात्र बाजारात दर टिकून

दोन देशांतील युध्द जागतिक पातळीवर पसरते की काय? अशी भीती होती. रशिया आणि युक्रेन समर्थक देश असे गट निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात होती.
cotton market
cotton market

पुणेः दोन देशांतील युध्दाचे रुपांतर विश्व युध्दात होते की काय? या भीतीने कापूस बाजारात नरमाई आली होती. मात्र बाजारात काहीशी अनिश्चितता कायम असतानाही कापूस दर स्थिरावले आहेत. सध्या देशात कापसाचे दर ८ हजार ते १० हजार ७०० रुपयांच्या दरम्यान आहेत. असे असले तरी दरवाढ मात्र थांबली आहे. युध्द थांबून परिस्थिती सामान्य झाल्यानंतर दर पुन्हा सुधारू शकतात, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला. रशिया युक्रेन(Russia Ukraine) युध्द सुरु झाल्यानंतर कापूस दर काहीसे नरमले होते. मात्र आता कापूस दरातील घसरण थांबली. दोन देशांतील युध्द जागतिक पातळीवर पसरते की काय? अशी भीती होती. रशिया आणि युक्रेन समर्थक देश असे गट निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र इतर देशांनी युध्दात थेट सहभाग न घेता रशियावर आर्थिक निर्बंध(Economic restrictions) लादले. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजार ठप्प झाला नाही, मात्र बाजारातील अनिश्चितता काही प्रमाणात कायम आहे. परंतु या स्थितीमुळे कापूस बाजारातील घसरण थांबली. युध्द सुरु होण्यापूर्वी इंटरनॅशनल काॅटन एक्सचेंजवर कापसाचे दर ११७.१९० सेंट प्रतिपाऊंडवर (Pound)आहेत. युध्द थांबून परिस्थिती सामान्य झाल्यावर कापूस दर पुन्हा सुधारतील. कारण बाजरातील मूलभूत घटक अर्थात फंडामेंटल्स कापूस दरवाढीस पुरक आहेत, असं जाणकारांनी सांगितलं.

हे हि पहा :  युध्दामुळे कापूस दरात घसरण झाली होती, मात्र युध्दात केवळ दोनच देश असल्याने घसरण थांबली, असे कापूस तज्ज्ञ गोविंद वैराळे यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय बाजारासोबतच देशातील बाजारातही दरातील नरमाई दूर झाली. सध्या मागील ४ ते ५ दिवसांपासून दर टिकून आहेत. युध्द सुरु झाल्यानंतर देशातील कापूस दर ४०० ते ७०० रुपयांनी नरमले होते. मात्र आता दराने जवळपास पूर्वपातळी गाठले आहे. सोमवारी देशातील बाजारांत कापूस दर ८ हजार ते १० हजार ७०० रुपयांच्या दरम्यान होता. कापूस दर हळूहळू पूर्वपातळी गाठतील, असे अकोला येथील माधव पतोंड यांनी सांगितलं. देशातील कापूस दर आधीच्या पातळीवर पोचले. मात्र कापसातील तेजी थांबली आहे. सूत आणि कापूस निर्यात कमी होत असल्यानं दरातील तेजी मात्र कमी झाली. त्यामुळे निर्यात सुरळीत होईपर्यंत दर कायम राहण्याचा अंदाज आहे. दर ८ हजार ते १० हजार ७०० रुपयांवर आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील अनिश्चितता दूर झाल्यानंतर दरात तेजी पाहायला मिळू शकते, असे जाणकारांनी सांगितले. ………….. प्रतिक्रिया आंतरराष्ट्रीय बाजारात अजूनही अनिश्चितता आहे. परिणामी कापूस दर पुर्वपातळीवर येण्यास काही काळ लागू शकतो. १२३ सेंटवर असलेला कापूस ११६ सेंटपर्यंत आला होता. आता त्यात काही सुधारणा झाली. मात्र आधीच्या पातळीवर आला नाही. बाजारातील अनिश्चितता पूर्णपणे दूर झाल्यानंतर दर पुन्हा सुधारतील. कारण कापूस उत्पादन कमी आणि वापर अधिक आहे. - गोविंद वैराळे, जेष्ठ कापूस तज्ज्ञ विश्व युध्द होण्याच्या भीतीने कापूस बाजारभाव कमी झाले होते. मात्र आता कापूस बाजारातील घसरण थांबून दर सुधारले आहेत. देशांतर्गत बाजारात कापसाला मागणी आहे. त्यामुळे दर आधीच्या पातळीवर आले. - माधव पतोंड, श्री रामदेव काॅटन यार्न, अकोट, जि. अकोला

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com