कांद्याचे दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्राकडून बफर स्टॉक रिलीज 

कांद्याचा पुरवठा वाढविण्यासाठी महाराष्ट्रातील पिंपळगाव आणि लासलगाव बाजार समितीतही बफर स्टॉक उतरविण्यात आल्याचे केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाने सांगितले आहे.
Onion Buffer stock
Onion Buffer stock
Published on
Updated on

केंद्र सरकारने किरकोळ बाजारातील कांद्याचे (Oniaon Retail Rate) भाव नियंत्रणात आणण्यासाठी कांद्याचा बफर स्टॉक (Buffer stock) बाजारात आणला आहे. राज्यांच्या माध्यमातून सरकारने  कांद्याचा बफर स्टॉक (Onion Buffer Stock) बाजारात आणला आहे. कांद्याचा पुरवठा (Onion Supply) वाढविण्यासाठी महाराष्ट्रातील पिंपळगाव आणि लासलगाव बाजार समितीतही (Laslgaon APMC) बफर स्टॉक उतरविण्यात आल्याचे केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाने (Ministry Of Consumer Affairs) सांगितले आहे.

केंद्रीय मंत्रालयाच्या माहितीनुसार, राज्यांना २१ रुपये प्रति किलो दराने कांदा देण्यात आला आहे. तर मदर डेअरीच्या सफल (Mother Dairy's Safal Outlate) आऊटलेट्सना वाहतूक खर्चासह २६ रुपये प्रति किलो दराने कांद्याचा पुरवठा करण्यात आला आहे. बफर स्टॉमधील कांद्याचा पुरवठा वेगाने केल्यास दर नियंत्रणात येतील, असे मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटले आहे.

मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या काही आठवड्यांत किरकोळ बाजारातील कांद्याचे भाव हळूहळू वाढत आहेत. १८ फेब्रुवारीपर्यंत दिल्ली आणि चेन्नईमध्ये कांद्याचे दर प्रति किलो ३७, ३९ मुंबईमध्ये ३९ तर कोलकात्यामध्ये ४३ रुपये होते. लेट खरीप कांद्याची आवक स्थिर असून रब्बी कांद्याची आवक मार्चपासून सुरू होण्याची अपेक्षा आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत १७ फेब्रुवारीपर्यंत कांद्याचे सरासरी दर २२.३६ टक्क्यांनी कमी होते, असे मंत्रालयाने म्हटले आहे. राज्य स्तरावरील किंमत स्थिरीकरण निधीच्या (Price Stability Fund) माध्यमातून बाजारात झालेल्या हस्तक्षेपामुळे २०२१-२२ मध्ये कांद्याचे दर बऱ्यापैकी स्थिरावल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com