महाराष्ट्रासह तीन राज्यात ४० बांबू FPO ला केंद्राची मान्यता

केंद्र सरकारने महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, आसाम आणि ओडीशामध्ये बांबूसाठी ४० शेतकरी उत्पादक कंपन्यांना (एफपीओ) मान्यता दिली आहे. छोट्या आणि सीमांत शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी प्रोत्साहित करण्यासाठी सरकारने या एफपीओना मान्यता दिली आहे.
Bamboo FPO
Bamboo FPO

केंद्र सरकारने महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, आसाम आणि ओडीशामध्ये बांबूसाठी (Bamboo) ४० शेतकरी उत्पादक कंपन्यांना (Farmers Producer Organization) (एफपीओ) मान्यता दिली आहे. छोट्या आणि सीमांत शेतकऱ्यांना (Marginal Farmers) बांबू लागवडीसाठी (Bamboo Cultivation) प्रोत्साहित करण्यासाठी सरकारने या एफपीओना मान्यता दिली आहे. केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर (Narendra Singh Tomar) यांनी शुक्रवारी (ता.११) राज्यसभेत बोलताना ही माहिती दिली.

हेही वाचा - इराणकडून खरेदी मंदावल्याने भारताच्या बासमती निर्यातीत घट छोट्या आणि सीमांत शेतकर्‍यांना बांबू लागवडीसाठी प्रोत्साहित करणे आणि त्यांना बाजार मूल्य साखळीशी (Value Chain) जोडण्यासाठी कृषी मंत्रालयाकडून बांबू उत्पादन क्षेत्रातील (Bamboo Producer)४० एफपीओना मान्यता दिली आहे, असे तोमर यांनी सांगितले आहे. या चार राज्यांतील २९ एफपीओसाठी अंमलबजावणी करणारी संस्था म्हणून नाफेडची (NAFED) नियुक्ती करण्यात आली आहे. आसाममधील १३, महाराष्ट्रात सात, मध्य प्रदेशातील सहा आणि ओडिशातील तीन एफपीओसाठी अंमलबजावणी करणारी संस्था नाफेड काम पाहणार आहे. त्याचप्रमाणे नॉर्थ ईस्टर्न रीजनल ऍग्रिकल्चरल मार्केटिंग कॉर्पोरेशन लिमिटेड ही आसाममधील पाच एफपीओसाठी अंमलबजावणी करणारी एजन्सी म्हणून नियुक्त करण्यात आली आहे. तर नॅशनल बँक फॉर अॅग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट म्हणजेच नाबार्ड (NABARD) ही महाराष्ट्रातील सहा एफपीओसाठी अंमलबजावणी करणारी संस्था म्हणून नियुक्त करण्यात आली आहे.

हेही वाचा - चार गायी विकून मी चार एकर शेती घेतली, पण... आधुनिक बांधकामांमध्ये बांबूच्या वापरास प्रोत्साहन देण्याचे धोरण राबवण्यात येत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने बांबू उत्पादनांचा समावेश दिल्ली दरांच्या यादीत समावेश केला आहे. बांबू आधारित बांधकाम साहित्य आणि संरचना यासह बांबू उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य बांबू अभियानातर्फे वेळोवेळी प्रदर्शने आणि जनजागृती मोहीम आयोजित करतात, असे तोमर म्हणाले. याशिवाय केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने बांधकामांमध्ये बांबूच्या चटईवर आधारित उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. केंद्र सरकारने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना प्रधानमंत्री आवास योजनेच्या (ग्रामीण) बांधकामांमध्ये बांबूचे बांधकाम साहित्य आणि तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्याची विनंती केली आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com