अपेडाला निर्यातीचे उद्दिष्ट गाठण्याचा विश्वास

कृषी मालाच्या निर्यातीत तांदळाच्या (Rice) निर्यातीमधून (export) सर्वाधिक परकीय चलन मिळवण्यात आलं आहे. अपेडाने आजमितीस ८.६७ अब्ज डॉलर्सचा तांदूळ(Rice) निर्यात केला आहे. इतर तृणधान्यांच्या निर्यातीत १०५ टक्क्यांची वाढ झाली असून तृणधान्य (Cereals) निर्यात ८४७ दशलक्ष डॉलर्सवर गेलीय.
 APEDA has New Success Story by Achieving 90 per cent of the Export Target.
APEDA has New Success Story by Achieving 90 per cent of the Export Target.

२०२०-२०२१ या आर्थिक वर्षात (एप्रिल-जानेवारी) १७८२ दशलक्ष डॉलर्सचा गहू निर्यात करण्यात आला आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत भारताने ३५८ दशलक्ष डॉलर्सचा गहू निर्यात (Wheat export) केला होता.

कोरोनानंतरच्या काळात अपेडाने केंद्रीय उद्योग व वाणिज्य मंत्रालयाने(Union Ministry of Industry and Commerce) २०२१-२०२२ निर्धारित केलेल्या निर्यातीच्या उद्दिष्टापैकी ९० टक्के उद्दिष्ट साध्य केलं आहे.  २०२१-२०२२ या आर्थिक वर्षात अपेडासमोर २३.७१ अब्ज डॉलर्स निर्यातीचे (export) उद्दिष्ट होते. त्यातील ११ महिन्यांत अपेडाने २१.५ अब्ज डॉलर्सचा टप्पा पार केलाय. 

कृषी मालाच्या निर्यातीत तांदळाच्या (Rice) निर्यातीमधून (export) सर्वाधिक परकीय चलन मिळवण्यात आलं आहे. अपेडाने आजमितीस ८.६७ अब्ज डॉलर्सचा तांदूळ (Rice) निर्यात केला आहे. इतर तृणधान्यांच्या निर्यातीत १०५ टक्क्यांची वाढ झाली असून तृणधान्य (Cereals) निर्यात ८४७ दशलक्ष डॉलर्सवर गेलीय. 

  मांस, दुध व दुग्धजन्य पदार्थांच्या निर्यातीत वाढ झाली आहे. फेब्रुवारी २०२२ पर्यंत अपेडासमोर मांस (Nonveg), दुध (Milk) व दुग्धजन्य पदार्थांच्या ४२०५ दशलक्ष डॉलर्स निर्यातीचे उद्दिष्ट असून आजमितीस ३७७१ दशलक्ष डॉलर्सची निर्यात (Export) झाली आहे.  

एप्रिल ते जानेवारी २०२१-२०२२ दरम्यान भारताने १७४२ दशलक्ष डॉलर्सचा गहू निर्यात केला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ३५८ दशलक्ष डॉलर्सचा गहू निर्यात केला होता. गेल्या वर्षीच्या गहू निर्यातीत (Wheat Export) यंदा ३९७ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आलीय.

इतर तृणधान्यांच्या निर्यातीतही (Cereals Export)  या आर्थिक वर्षात ६६ टक्क्यांची वाढ पहायला मिळते आहे. चालू आर्थिक वर्षात तृणधान्याची निर्यात (Cereals Export) ८६९ दशलक्ष डॉलर्सवर गेलीय. गेल्या वर्षी याच कालावधीत तृणधान्यांची निर्यात ५२७ दशलक्ष डॉलर्सवर होती.  

२०१८ सालच्या निर्यात धोरणात राज्यांच्या सहकार्याने आम्ही निर्यातदारांना क्लस्टर दृष्टीकोनातून निर्यातवाढीवर लक्ष केंद्रित करायला लावले, त्यामुळे निर्यातीत लक्षणीय वाढ झाल्याची माहिती अपेडाचे अध्यक्ष एम.अंगमुथू यांनी दिली आहे. 

हा व्हिडिओ नक्की पाहा. 

निर्यात वाढावी म्हणून अपेडाकडून काही विशेष प्रयत्न करण्यात आले. विविध देशांत आयोजित केलेल्या कृषी उत्पादनांच्या (products) 'B2B' प्रदर्शनाचाही लाभ झाला. याशिवाय अन्य उपक्रमामुळे भारतीय मालाला अनेक नव्या बाजारपेठा उपलब्ध झाल्याचंही अंगमुथू यांनी नमूद केलं. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com